AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UGC Regulations 2026: सोप्या शब्दात समजा काय आहे युजीसीचा नवा नियम, का होत आहे देशभरात विरोध ?

आता बार असोसिएशनने सरकारला या बिलास तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. तज तज्ज्ञांच्या मते या समस्यांचे वेळेत उत्तर शोधले नाही तर येणाऱ्या दिवसात आंदोलन अधिक उग्र होऊ शकते. ज्यामुळे शिक्षण क्षेत्रावर याचा वाईट परिणाम होईल असेही संघटनेने म्हटले आहे.

UGC Regulations 2026: सोप्या शब्दात समजा काय आहे  युजीसीचा नवा नियम, का होत आहे देशभरात विरोध ?
UGC Regulations 2026 Controversy
| Updated on: Jan 27, 2026 | 6:51 PM
Share

UGC Regulations 2026 Controversy : विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) १५ जानेवारी २०२६ पासून संपूर्ण देशात नवे नियम लागू केले आहेत. आयोगाच्या मते या नियमांचा उद्देश्य कॉलेज आणि विद्यापीठातील भेदभाव समाप्त करणे आणि सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देणे हा आहे. सरकार एकीकडे या नियमाला क्रांतीकारक पाऊल म्हणत आहे. ते शिक्षण तज्ज्ञांच्या मते या कठोर नियमांमुळे शिक्षणाचा दर्जा घसरु शकतो. यामुळे कॉलेज आणि विद्यापीठांवर अनाकारण दबाव वाढला जाईल. चला तर पाहूयात काय आहे नवा नियम आणि देशभरात त्या ने गोंधळ काय निर्माण झाला आहे.

UGC Regulations 2026: काय आहे यूजीसी रेगुलेशन्स 2026

युजीसीचा नवा नियमानुसार उच्च शिक्षण संस्थांमध्ये ‘इक्विटी’ म्हणजे समानता सिद्ध करण्यावर भर देण्यात आला आहे. यात म्हटले आहे की युजीसीच्या नव्या इक्विटी रेगुलेशन्स २०२६ चा हेतू कॉलेजात धर्म, जाती, जेंडर आणि पार्श्वभूमीच्या आधारे होणारे भेदभाव मूळापासून नष्ट करणे हा आहे. या अंतर्गत युनिव्हर्सिटीत एक तक्रार सेल स्थापन करणे गरजेचे असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा होईल. नियमात स्पष्ट केले आहे की प्रवेश आणि हॉस्टेलमध्ये रुम देणे या कामात संपूर्णपणे पादर्शकता असायला हवी. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळेल. तसेच या नियमांना न मानणाऱ्या संस्थांची सरकारी फंडींग रोखता येईल आणि त्यांच्या भरमसाठ दंड आकारता येईल.

UGC Regulations 2026 Controversy: नियमांना विरोध का ?

महाविद्यालयांच्या स्वातंत्र्याला धोका : जाणकारांचे म्हणणे आहे की या नियमांच्या बहाण्याने सरकार युनिव्हर्सिटीच्या काम करण्याच्या पद्धतीत दखल देत आहेत.त्यांचे म्हणणे आहे की कॉलेजना त्यांचे निर्णय स्वत: घेण्याचे स्वातंत्र्य असायला हवे, हे स्वातंत्र्य नव्या नियमांनी हिरावले जात आहे.

निधीवर परिणाम :नव्या नियमांत म्हटले आहे की जे कॉलेज या नियमांना पाळणार नाही, युजीसी त्यांची सरकारी मदत रोखू शकणार आहे. विरोधकांना भीती आहे की सरकार या नियमांचा वापरुन कॉलेजकडून त्यांचे आदेश पाळण्यासाठी भीती म्हणून याचा वापरु शकते.

नोकरीत दखल: कॉलेजात होणाऱ्या नवीन भरती आणि नियुक्त्यांचे नियमातही बदल करण्यात आले आहे. त्यामुळे अध्यापक नाराज झाले आहे. त्यांना वाटते की या नियुक्त्यांतील निष्पक्षता नष्ट होऊ शकते.

UGC Equity Regulations 2026: यूजीसी आणि सरकारचे मत

दुसरीकडे युजीसीचे म्हणणे आहे की नवे नियम 2012 जून्या नियमांची जागा घेणार आहेत. नेहमीच कॉलेजात भेदभाव करण्याच्या तक्रारी प्राप्त होत असतात.ज्यांना रोखण्यासाठी एक मजबूत नॅशनल फ्रेमवर्क तयार करणे गरजेचे आहे. या नव्या नियमांमुळे संपूर्ण सिस्टीमध्ये पारदर्शकता येईल आणि मागास वर्गाच्या विद्यार्थ्यांविरोधात कँपसमध्ये एक सुरक्षित आणि बरोबरची माहोल मिळू शकेल.सरकारचे म्हणणे आहे की यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला कोणत्याही भीतीशिवाय पुढे जाण्याची संधी मिळेल. युजीसीच्या मते जुने कायदे आता आऊटडेटेड झाले आहेत. यामुळे त्यांना अधिक कठोर आणि सोपे बनवले आहेत.त्यामुळे प्रत्येक विद्यार्थांना समान संधी मिळाली आहे.

General Category Protest against UGC Bill: सामान्य वर्गात भीती आणि नाराजगी का ?

सिव्हील सिद्धार्थ बार असोसिएशन सह अनेक संघटनांनी या बिलाचा कडाडून विरोध केला आहे. सामान्य वर्गातील विद्यार्थी आणि तज्ज्ञाचे म्हणणे आहे की या नव्या नियमाचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो. या नव्या नियमांच्या बहाण्याने सरकार युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत कामकाजात दखल वाढवत आहे. नियम न मानला गेल्याने संस्थांचा सरकारी निधी रोखणे आणि दंड आकारणे या नियमाला विरोध होत आहे. या नियमांमुळे विद्यार्थ्यांदरम्यानची दरी आणखी खोल होण्याचा धोका आहे.

अंजली भारतींना वादग्रस्त वक्तव्य भोवलं महिला आयोगाने घेतला मोठा निर्णय
अंजली भारतींना वादग्रस्त वक्तव्य भोवलं महिला आयोगाने घेतला मोठा निर्णय.
पद्मभूषण : विरोधकांची कोश्यारींवर टीका, पण मुख्यमंत्र्यांचे समर्थन...
पद्मभूषण : विरोधकांची कोश्यारींवर टीका, पण मुख्यमंत्र्यांचे समर्थन....
समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश.
छोटा पुढारी गावागावात... काय आहे गावगाड्यात सुरू; गुलाल कुणाचा उधळणार?
छोटा पुढारी गावागावात... काय आहे गावगाड्यात सुरू; गुलाल कुणाचा उधळणार?.
तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले
तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले.
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध.
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी...
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी....
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी.
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस.
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट.