पाकव्याप्त काश्मीरही आमचाच, जीवाचं रान करेन : अमित शाहांची गर्जना

अमित शाह (Amit Shah) म्हणाले, “काश्मीरसाठीही संसदच सर्वोच्च सभागृह आहे. कश्मीरच्या संविधानातही याची स्पष्टता नाही. कश्मीरप्रश्नी वेळप्रसंगी प्राणाच बलिदान देऊ. काश्मीरच्या सीमेमध्ये पाकव्याप्त काश्मीरही येतं. त्यासाठी जीवही देऊ”

Amit Shah Jaan de denge iske liye, पाकव्याप्त काश्मीरही आमचाच, जीवाचं रान करेन : अमित शाहांची गर्जना

Jammu Kashmir Article 370 नवी दिल्ली : “जम्मू काश्मीरमध्ये केवळ काश्मीर नव्हे तर पाकव्याप्त काश्मीरचाही समावेश होतो. तो सुद्धा भारताचाच भाग आहे. त्यासाठी जीव द्यावा लागला तरी बेहत्तर, पण पाकव्याप्त काश्मीरही आमचाच”, अशी गर्जना गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत केली. जम्मू काश्मीरमधील 370 कलम रद्द करण्याची घोषणा राज्यसभेत केल्यानंतर, आज अमित शाहांनी लोकसभेत निवेदन दिलं.

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. काश्मीरसाठीही संसदच सर्वोच्च आहे. काश्मीरबाबत नवे कायदे आणि संविधानात बदल करण्यापासून कोणी रोखू शकत नाही. ज्यावेळी मी जम्मू काश्मीर असा उल्लेख करतो, त्यावेळी त्यामध्ये पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन अर्थात चीनव्याप्त काश्मीरचाही समावेश होतो. हे दोन्हीही भाग भारताचाच हिस्सा आहे, असं अमित शाहांनी ठणकावून सांगितलं.

अमित शाह (Amit Shah) म्हणाले, “काश्मीरसाठीही संसदच सर्वोच्च सभागृह आहे. कश्मीरप्रश्नी वेळप्रसंगी प्राणाच बलिदान देऊ. काश्मीरच्या सीमेमध्ये पाकव्याप्त काश्मीरही येतं. त्यासाठी जीवही देऊ”

काँग्रेसचा सेल्फ गोल

दरम्यान, लोकसभेत काश्मीर मुद्द्यावरुन काँग्रेसने एकप्रकारे सेल्फ गोल केला. खासदार अधीर रंजन यांनी जम्मू कश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात प्रलंबित असल्याचं नमूद करताच, काँग्रेसवर सत्ताधाऱ्यांनी आगपाखड केली.

अमित शाह यांनीही त्याला उत्तर देत, काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, त्याबाबत संयुक्त राष्ट्राने ढवळाढवळ करावी असं तुम्हाला का वाटतं, असा सवाल त्यांनी काँग्रेसला केला.

काश्मीरबाबत निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार संसदेला आहे, असं शाहांनी नमूद केलं. त्यावेळी काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी सरकारने नियमांचं उल्लंघन केल्याचं म्हटलं. मग अमित शाहांनी कुठल्या नियमांचं उल्लंघन केलं ते सांगा, अशी विचारणा केली.

याप्रसंगी गृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली.

Lok sabha LIVE

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *