VIDEO: मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करणारा गडकरी मंत्र; दानवे, कराड यांना काय सांगितलं?

मराठवाडा आणि विदर्भाचा काही भाग कायम दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. 1972मध्ये तर मराठवाड्यात मोठा दुष्काळ पडल्याने हजारो लोकांनी पुण्या-मुंबईची वाट धरली. (union minister nitin gadkari suggest formula of marathwada water crisis)

VIDEO: मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करणारा गडकरी मंत्र; दानवे, कराड यांना काय सांगितलं?
नितीन गडकरी
Follow us
| Updated on: Jul 30, 2021 | 11:33 AM

नवी दिल्ली: मराठवाडा आणि विदर्भाचा काही भाग कायम दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. 1972मध्ये तर मराठवाड्यात मोठा दुष्काळ पडल्याने हजारो लोकांनी पुण्या-मुंबईची वाट धरली. त्यानंतर हे लोक मराठवाड्यात पुन्हा राहण्यासाठी गेले नाहीत. कारण मराठवाड्याचा पाणी प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. मात्र, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करणारा मंत्रच दिला आहे. गडकरींच्या या मंत्रांचं तंतोतंत पालन झाल्यास काही वर्षात मराठवाड्याचा पाणी प्रश्न निकाली लागणार आहे. (union minister nitin gadkari suggest formula of marathwada water crisis)

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते दिल्लीत मराठी केंद्रीय मंत्र्यांचा सत्कार झाला. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराडही उपस्थित होते. यावेळी गडकरींनी या दोन्ही मराठवाड्यातील नेत्यांचा सत्कार केल्यानंतर मराठवाड्यातील सर्वात कळीच्या मुद्द्याला म्हणजे पाणी प्रश्नाला हात घातला. आज मराठवाडा आणि विदर्भाचा प्रश्न पाण्याचाच आहे. नदीजोड प्रकल्प सध्या देशात सुरू आहे. महाराष्ट्रातील तापी, नाग, नर्मदा, उत्तर प्रदेशातील केन, बेतवा आणि गुजरात-महाराष्ट्रातील मधल्या नद्यांच्या प्रकल्पाचा यात समावेश आहे. यातील तीन नदीजोड प्रकल्प मराठवाड्यात आले तर मराठवाड्यात शंभर टक्के इरिगेशन होईल. मराठवाड्याला इतकं पाणी मिळेल. आज ठाणे जिल्ह्यातील वरचं जे पाणी आहे ते समुद्रात जातं. ते जर अडवून एकएका धरणात सोडत गेलो तर अहमदनगरपासून ते मराठवाड्यातील सर्व धरणं शंभर टक्के भरतील, असं गडकरी यांनी सांगितलं.

दानवे-कराड यांनी प्रश्न लावून धरावा

मराठवाड्यातील पाणी प्रश्न सुटला पाहिजे. नदीजोड प्रकल्पातून ते शक्य आहे. त्यामुळे रावसाहेब दानवे आणि डॉ. कराड यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न दिल्लीत लावून धरला पाहिजे. मी त्यांना नक्कीच मदत करेल. कारण पाणीपुरवठा मंत्री आताच माझ्याकडे येऊन गेले. पाणी पुरवठा मंत्र्यांसोबत बैठक लावू. त्या बैठकीला महाराष्ट्रातील मंत्र्यांनाही बोलावू. महाराष्ट्र सुखी व्हावा, समृद्ध व्हावा आणि संपन्न व्हावा हीच आपल्या सर्वांची आशा अपेक्षा आहे, असं गडकरी यांनी स्पष्ट केलं.

भागवत कराड कोण आहेत?

-1995 ते 2009 या कालावधीत औरंगाबाद महापालिकेत तीन वेळा नगरसेवक -1997 ते 1998 औरंगाबादचे उपमहापौर -2000 ते 2001 आणि 2006 ते 2007 औरंगाबादचे महापौर -2009 मध्ये औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी

डॉ. भागवत किशनराव कराड यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील चिखली गावात झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कराड यांचे दहावीपर्यंतचे जिल्हा परिषद शाळेत झाले. अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालयातून त्यांनी प्री-मेडिकलचे शिक्षण पूर्ण केले. औरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस आणि एम.एस. (जनरल सर्जरी) ही पदवी संपादन केली. एमएस. शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई विद्यापीठातील वैद्यकीय क्षेत्रातील अती उच्च एम.सीएच (पेडियाट्रीक) ही मिळवली. मराठवाड्यातील अशा प्रकारची पदवी घेणारे वैद्यकीय क्षेत्रातील पहिले डॉक्टर असल्याचा भागवत कराड यांचा दावा आहे. (union minister nitin gadkari suggest formula of marathwada water crisis)

संबंधित बातम्या:

Video: जेव्हा गडकरींनी दिल्लीत ‘भारत सरकार’चा बोर्ड उखडला आणि ‘महाराष्ट्रा’चा लावला, मराठी माणसाच्या अभिमानाच्या जागेचा किस्सा

मोदींच्या सूचनेनंतर गडकरींनी घेतली शरद पवारांची भेट; गुप्त भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण

VIDEO | नितीन गडकरींचा कोकण विकास मंत्र, नारायण राणे पूर्ण करणार?

(union minister nitin gadkari suggest formula of marathwada water crisis)

Non Stop LIVE Update
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.