AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sergio Gor On Kashmir : भारताला जे अपेक्षित नाही ते घडलं, गोर यांचा दौरा रद्द, काश्मीरच्या बाबतीत अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने का?

Sergio Gor On Kashmir : काश्मीरच्या बाबतीत अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने आहे का? असं वाटावं अशी एक घटना घडली आहे. कालच अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जियो गोर यांनी जम्मू-काश्मीर भारताचं अविभाज्य अंग असल्याचं म्हटलं होतं.

Sergio Gor On Kashmir : भारताला जे अपेक्षित नाही ते घडलं, गोर यांचा दौरा रद्द, काश्मीरच्या बाबतीत अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने का?
Sergio Gor
| Updated on: Aug 20, 2026 | 1:37 PM
Share

जम्मू-काश्मीर भारताचं अविभाज्य अंग आहे असं म्हणणारे अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जियो गोर यांचा आज होणारा लडाख दौरा रद्द झाला आहे. लडाख दौरा रद्द झाल्यानंतर जम्मू-काश्मीरवरुन ते दिल्लीला परत जात आहेत. सूत्रांनी ही माहिती दिली. गोर जम्मू-काश्मीर आणि लडाख दौऱ्यावर होते. जम्मू-काश्मीर भारताचा भाग आहे, असं म्हटल्यानंतर पाकिस्तानने इस्लामाबादमधील अमेरिकन दूतावासातील प्रभारीला लगेच तलब केलं. लडाख दौऱ्यात ते नियंत्रण रेषेवर जाणार होते. पण आता त्यांचा दौरा रद्द झाला आहे. लडाख दौरा रद्द होण्याचं कारण अजून समोर आलेलं नाही. बुधवारी गोर यांनी जम्मू-काश्मीरचा दौरा केला. श्रीनगरमध्ये असताना गोर यांनी, जम्मू-काश्मीर भारताचं अविभाज्य अंग असून तो खूप सुंदर प्रदेश असल्याचं म्हणाले. पण आता त्यांच्या या वक्तव्यावर पाकिस्तान चिडला आहे. बुधवारी पाकिस्तानने अमेरिकी दूतावासाच्या प्रभारी नताली बेकर यांना तलब केलं. गोर यांच्या वक्तव्यानंतर काही तासांनी पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने इस्लामाबादमधील अमेरिकी दूतावासाच्या प्रभारीला तलब केलं. गोर यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला. ट्रम्प यांनी गोर यांची दक्षिण आशियात विशेष दूत म्हणून नियुक्ती केली आहे.

अमेरिकी राजदूताने सर्वातआधी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. ओमर यांच्या भेटीनंतर गोर यांनी जम्मू-काश्मीर भारताचं अविभाज्य अंग असल्याचं वक्तव्य केलं. सोबतच हे सुद्धा म्हटलं की, अमेरिका जम्मू-काश्मीरसाठी जारी करण्यात आलेल्या ट्रॅव्हल एडवायजरीची समीक्षा करेल. जम्मू-काश्मीरला अधिक सुरक्षित बनवण्यासाठी केंद्र सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी अनेक पावलं उचलली आहेत. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह सर्जियो गोर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की, “जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. तो खूप सुंदर प्रदेश आहे. ट्रॅव्हल एडवायजरीबद्दल गोर म्हणाले की, “अमेरिकेकडून प्रवासाशी संबंधित एडवायजरी जारी केली जाते. आम्ही वेळोवेळी समीक्षा सुद्धा करत असतो. मी इथे कुठली मोठी घोषणा करु शकत नाही. पण आम्ही या मुद्यावर विचार करु”

काश्मीरसाठीच्या अमेरिकन ट्रॅव्हल Advisory बद्दल काय म्हणाले?

“नवी दिल्ली आणि इथले मुख्यमंत्री यांनी मिळून हा भाग सुरक्षित करण्यासाठी म्हणून काही चांगली पावलं उचलली आहेत. म्हणून आम्ही अमेरिकेकडून जारी करण्यात आलेली ट्रॅव्हल अडवायजरीचा अलर्टचा स्तर कमी करता येईल का यावर विचार करु. ही एक सुंदर जागा आहे. बऱ्याच अमेरिकन नागरिकांना इथे येऊन काश्मीरचं सौंदर्य पहायला आवडेल” असं ते म्हणाले. त्यांनी श्रीनगर येथील प्रसिद्ध डल झीलमध्ये शिकारा सफरीचा आनंद घेतला. गोर जवळपास एक तास डल तलावात विहाराचा आनंद घेत होतं.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा