AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेकडून रात्रीच्या अंधारात इराणच्या विरोधात छुपा डाव; डोनाल्ड ट्रम्प यांच्या चोरीचा खेळ जगासमोर

अमेरिकेकडून रात्रीच्या अंधारात इराणच्या विरोधात छुपा डाव खेळला जात आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चोरीचा खेळ जगासमोर आला आहे.

अमेरिकेकडून रात्रीच्या अंधारात इराणच्या विरोधात छुपा डाव; डोनाल्ड ट्रम्प यांच्या चोरीचा खेळ जगासमोर
donald trump Image Credit source: tv9
| Updated on: Aug 20, 2026 | 9:56 AM
Share

अमेरिकेच्या सैन्याचा कारनामा जगासमोर आला आहे. अमेरिकेचा होर्मुझच्या सामुद्रधुनीवर रात्रीच्या अंधारात चोरीचा खेळ सुरू आहे. एका नव्या रिपोर्टमुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या सैन्याचं सिक्रेट समोर आलं आहे. अमेरिकी सैन्याने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल घेऊन जाण्यासाठी एक विशेष मार्ग तयार केला आहे. इराणची नाकेबंदी असतानाही दररोज 1 कोटी बॅरेल तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीतून काढण्यात येत आहे. एका वेबसाइटने अमेरिकेच्या दोन अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या माध्यमातून हा दावा केला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, मागील काही आठवड्यांपासून अमेरिकेच्या सैन्याकडून चोरी सुरू आहे. या ऑपरेशनच्या माध्यमातून 15 ते 20 तेल टँकर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून चोरी छुपे नेले जात आहेत. अमेरिकीचे ही जहाजे ओमानच्या किनाऱ्याजवळील दक्षिण मार्गाने जात आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, होर्मुझकडून दररोज अंदाजे 1 कोटी बॅरेल काढले जात आहे. संकटाच्या काळातील अमेरिकेची ही महत्वपूर्ण कामगिरी मानली जात आहे. हेच तेल जागतिक बाजारपेठेत दाखल होत आहे.

रात्रीच्या अंधारात चोरीचा खेळ

अमेरिकी सैन्य फक्त तेलवाहू जहाजांचं संरक्षण करत नाही, तर अरबी समुद्रातून होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे रिकाम्या जहाजांनाही रिकाम्या जहाजांनाही प्रवेश करण्यास मदत करत आहे. याच रिकाम्या जहाजांमध्ये तेल भरले जात आहेत. त्यानंतर सामुद्रधुनीतून बाहेर पडली जात आहेत. या संपूर्ण मोहिमेची कोणतीही माहिती पूर्णपणे उघड झालेली नाही. अॅक्सिऑसच्या वृत्तानुसार, अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितलं की, आम्ही गेल्या दोन महिन्यांपासून होर्मुझच्या सामुद्रधुनीकडे दक्षिणेतील मार्गावर नियंत्रण ठेवण्याचे काम करत आहे. इराणचे रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स त्रास देऊ शकतात. परंतु सामुद्रधुनीवर त्यांचं नियंत्रण नसून ते आमचे आहे’.

होर्मुझच्या संपूर्ण मोहिमेवर नॉर्थ कॅरोलिनामामधील फोर्ट ब्रॅग येथील अमेरिकी लष्कराच्या मुख्यलयातून लक्ष दिले जात आहेत. आखाती प्रदेशातील मित्र देशांचंही सहकार्य मिळत आहे. तेलवाहू जहाज आणि रिकाम्या जहाजांची यादी तयार केली जाते. तेलवाहू जहाजे अरबी समुद्रातून होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे आखाती बंदरापर्यंत आणली जातात. तिथे इंधन भरून नंतर परत जातात. प्रत्येक रात्री जहाजांच्या येण्या-जाण्याच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. रात्रीच्या वेळी जहाजांची एक मोठी रांग बाहेर पडते. तर दुसरीकडून रिकाम्या टँकरची मोठी रांग आत येते. अमेरिकेची हवाई दलाची लढाऊ विमाने या जहाजांचं संरक्षण करतात. इराणकडून येणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्र आणि ड्रोनपासून संरक्षणासाठी विमाने देखील तैनात केली आहेत.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा