AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेचा पाकिस्तानला झटका, TRF दहशतवादी संघटना घोषित, पहलगाम हल्ल्याची घेतली होती जबाबदारी

Pahalgam Attack: अमेरिकेने टीआरएफला परदेशी दहशतवादी संघटना म्हणून नियुक्त केल्याने त्याच्या सदस्यांवर कठोर आर्थिक निर्बंध लादले जातील. या संघटनेला दहशतवादी घोषित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे आभार मानले आहे.

अमेरिकेचा पाकिस्तानला झटका, TRF दहशतवादी संघटना घोषित, पहलगाम हल्ल्याची घेतली होती जबाबदारी
PahalgamImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 18, 2025 | 7:40 AM
Share

Pahalgam Attack: अमेरिकेने पाकिस्तानला झटका दिला आहे. अमेरिकेन सरकारने पाकिस्तानमधील द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) ला या संघटना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. ही संघटना जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याबाबत दोषी आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी ही माहिती दिली. टीआरएफने या वर्षी २२ एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केली होती.

लष्कर-ए-तैयबाची आघाडी

रेझिस्टन्स फ्रंट (TRF) ही पाकिस्तानस्थित दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबाची एक आघाडी संघटना आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी या दहशतवादी संघटनेचे वर्णन लष्कर-ए-तैयबाची आघाडी म्हणून केले आहे. लष्कर-ए-तैयबावर संयुक्त राष्ट्राने यापूर्वीच बंदी घातली आहे. या दहशतवादी संघटनेचे मुख्यालय पाकिस्तानमध्ये आहे. अमेरिकेचे या निर्णयामुळे दहशतवादविरोधी प्रयत्नांमध्ये भारतासोबत वॉशिंग्टनचे सहकार्य आणखी मजबूत होईल.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियो म्हणाले की, टीआरएफला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करणे हे ट्रम्प प्रशासनाच्या राष्ट्रीय सुरक्षा हितांचे रक्षण करण्यासाठी, दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी आणि पहलगाम हल्ल्यासाठी न्याय मिळवण्याच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. या दहशतवादी गटाचा भारतीय सुरक्षा दलांवर होणाऱ्या अनेक हल्ल्यांशीही संबंध आहे. २००८ मध्ये लष्कर-ए-तैयबाने केलेल्या मुंबई हल्ल्यानंतर भारतातील नागरिकांवर सर्वात घातक हा दहशतवादी हल्ला झाला.

काय होणार परिणाम

अमेरिकेने टीआरएफला परदेशी दहशतवादी संघटना म्हणून नियुक्त केल्याने त्याच्या सदस्यांवर कठोर आर्थिक निर्बंध लादले जातील. या संघटनेवर बंदी घालताना अमेरिकेने म्हटले आहे की, दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अमेरिका भारतासोबत उभी आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, या भ्याड हल्ल्यातील गुन्हेगारांना आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भारत कटिबद्ध आहे. यानंतर ७ मे रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला होता. ज्यामध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले होते. या हल्ल्यास ऑपरेशन सिंदूर नाव दिले होते.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.