AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अमेरिकेनं अखेर इराणसमोर गुडघे टेकवले, युद्धविरामाची घोषणा होणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या पोस्टने मोठी खळबळ

मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नवी पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. ट्रम्प यांच्या नव्या पोस्टमुळे अमेरिकेनं या युद्धातून माघार घेतली आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

मोठी बातमी! अमेरिकेनं अखेर इराणसमोर गुडघे टेकवले, युद्धविरामाची घोषणा होणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या पोस्टने मोठी खळबळ
donald trump Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 01, 2026 | 8:00 PM
Share

अमेरिकेकडून अनेकदा असा दावा करण्यात आला आहे की, इराण युद्धविरामासाठी तयार आहे. मात्र इराणने अमेरिकेचा हा दावा फेटाळून लावला आहे. पुढचे सहा महिने जरी युद्ध सुरू राहिलं तरी देखील आमची हे युद्ध लढण्याची तयारी असल्याचं इराणने म्हटलं आहे. दरम्यान यापूर्वी देखील एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या माध्यमातून इराणकडे 15 सुत्री कार्यक्रम पाठवून युद्धविराम घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र इराणने ट्रम्प यांचा हा प्रस्ताव फेटाळून लावला, उलट इराणनेच ट्रम्प यांच्याकडे आपल्या पाच अटी पाठवल्या होत्या, जर या पाच अटी अमेरिकेला मान्य असतील तर आम्ही युद्धविराम करू असं इराणने म्हटलं होतं. अमेरिकेनं आमच्यावर पुन्हा कधीही हल्ला होणार नाही, याची गॅरंटी द्यावी. तातडीने सर्व हल्ले एकाचवेळी थांबवावेत, युद्धात आम्हाला जेवढं नुकसान झालं आहे, त्याची नुकसान भरपाई द्यावी, अशा अटींचा त्यामध्ये समावेश होता. दरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे.

ती म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मिडिया ट्रूथवर एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या या पोस्टमध्ये एकीकडे इराणच्या राष्ट्रपतींचं कौतुक केलं आहे, तर दुसरीकडे इराण युद्धविरामासाठी याचना करत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. होर्मूज हा एकमेव असा मार्ग आहे, ज्याच्या माध्यमातून युद्धविरामाची घोषणा होऊ शकते, असंही या पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. तसेच जर युद्धविराम नाही झाला तर आम्ही इराणला अश्मयुगात पोहोचू अशी धमकी देखील ट्रम्प यांनी दिली आहे.

ट्रम्प यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या नव्या पोस्टमध्ये इराणच्या राष्ट्रपतींची कौतुक केलं आहे. इराणचे नवे राष्ट्रपती हे आपल्या पूर्वीच्या राष्ट्रपतींपेक्षा कमी कट्टरपंथी आणि जास्त बुद्धीवान आहेत. त्यांच्याकडून युद्धविरामासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र होर्मूजची सामुद्रधुनी हा आता एकमेव मार्ग आहे, ज्यामुळे युद्धविरामाची डील होऊ शकते, हा मार्ग इराणने पुन्हा सुरू केल्यास युद्धविराम होऊ शकतो. मात्र तोपर्यंत आम्ही इराणवर बॉम्ब हल्ले सुरूच ठेवू, आम्ही इराणला अश्मयुगात पोहोचवू अशी धमकी देखील ट्रम्प यांनी दिली आहे.

दरम्यान सुरुवातील युद्धविरामासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अनेक अटी घालण्यात आल्या होत्या. मात्र सध्याच्या त्यांच्या पोस्टवरून तरी असंच वाटत आहे की, त्यांनी आता माघार घेतली आहे, त्यांनी आता इराणसमोर फक्त एकच अट ठेवली आहे, ती म्हणजे त्यांनी पुन्हा एकदा होर्मूजची सामुद्रधुनी वाहतुकीसाठी सुरू करावी, यावर आता इराण काय निर्णय घेणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?