नाम से समाजवादी सोच परिवारवादी; काम दंगावादी; उत्तर प्रदेशचे राजकारण तापले

उत्तर प्रदेशचे राजकारण तापले असतानाच गोव्यातही राजकारणाची हवा जोरदार सुरु आहे. कॉंग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी म्हटले की, गोवा हे राज्य समृद्ध असले, निसर्ग सौंदर्याची देण असली तरी गोव्याला आणखी समृद्ध करता आले पाहिजेय यासाठी सगळ्यात आधी बेरोजगारीचा प्रश्न संपवला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

नाम से समाजवादी सोच परिवारवादी; काम दंगावादी; उत्तर प्रदेशचे राजकारण तापले
Yogi Akhilesh
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 7:33 PM

नवी दिल्लीः मेरठमध्ये उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री (Chief Minister) योगी आदित्यनाथ यांनी कॉंग्रेस (Congress) आणि समाजवादी पक्ष सत्तेत असायचा तेव्हा दंगली होत. दंगली झाल्या की, जमावबंदिची आदेश दिल जात. त्यामुळे गरीब आणि व्यापारी प्रचंड त्रासून गेले होते. मुजफ्फरनगरची दंगल, सहारनपूरची, बिजनौर दंगलींची उल्लेख करून त्यांनी समाजवादी पक्ष हा फक्त नावापुरताच समाजवादी आणि विचार घराणेशाहीचा तर त्यांची कामं ही दंगली घडवण्याची अशी जोरदार टीका त्यांनी केला. उत्तराखंडमधील पिथौरागडमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी टीका करताना सांगितले की, देशातील अनेक पक्ष हे कोणी आपल्या मुलाला बरोबर घेऊन जात आहे, तर कोण कुटुंबाला घेऊन पुढे जात आहे. तर दुसरीकडे विचाराबरोबरच समाजसेवा करण्यावर आणि देशसेवा करण्यावर जर कोणता पक्ष प्राधान्य करत असेल तर तो आहे भाजप.

माध्यमांच्या सर्वेक्षणानुसार ४८ टक्के मतदार हे भाजपसोबत आहेत. तर स्वामी प्रसाद मोर्या यांच्या समाजवादी पक्षाबरोबर 41.7 टक्के मतदार हे ओबीसी असून ते समाजवादी पक्षाबरोबर आहे. तर ५ टक्के मतदार हे बसपाला मतदान करणार आहेत. तर कॉंग्रेसला 3.4 टक्के असलेले ओबीसीची मतं मिळू शकणार आहेत. अन्य पक्षाला मतदान करणार लोकं ही 1.7 टक्क आहेत.

गोवा आणखी समृद्ध करु याः प्रियंका गांधी

उत्तर प्रदेशचे राजकारण तापले असतानाच गोव्यातही राजकारणाची हवा जोरदार सुरु आहे. कॉंग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी म्हटले की, गोवा हे राज्य समृद्ध असले, निसर्ग सौंदर्याची देण असली तरी गोव्याला आणखी समृद्ध करता आले पाहिजेय यासाठी सगळ्यात आधी बेरोजगारीचा प्रश्न संपवला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

भाजपकडून बनावट मतदान

राजकारणात सध्या पाच राज्यातील निवडणूकांमुळे सगळा देश राजकीय चर्चांनी ढवळून निघाला आहे. या पाच राज्यातील निवडणूकीत अखिलेश यादव यांनी भाजपवर निशाना साधताना म्हटले की, ललितपूर ते सहारनपूरपर्यंत बनावट पोस्टल बॅलेट मतांसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कनिष्ठ कर्मचाऱ्यांची ओळखपत्रे घेतली आहेत. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. भाजपचा नेता जितका मोठा तितका खोटारडेपणा करत असून भाजपचे नेते हे स्वतःला देव समजत आहेत.

आप 403 जागांवर लढणार

देशातील पाच राज्यांची निवडणूक लक्षणीय झाली ती आप पक्षामुळेही कारण त्यांनी 403 जागांवर लढणार असल्याचे निश्चित केले आहे. आम आदमी पक्षाने उत्तर प्रदेशच्या निवडणूकीसाठी नव्या दहा उमेदवारांची नाव घोषित केली आहेत. आपचे राज्यसभेचे खासदार संजय सिंग यांनी ट्विविट करून दहा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आपकडून तीन उमेदवारांमध्ये बदल केले आहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणूकीसाठी आपकडून 353 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत, तर पक्षाकडून 403 जागांवर आपले उमेदवार देणार आहेत .

राजनाथ सिंग यांनीही निशाना साधला

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही कॉंग्रेस, समाजवादी आणि बहुजन समाज पक्षावर जोरदार निशाना साधला. या पक्षांना समाजात तिरस्काराचे राजकारण पेरले आहे. समाजातील वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांमध्ये त्यांना एकमेकांविषयी तिरस्कार आणि द्वेष करण्याचे राजकारण केले असल्याची टीका त्यांनी केली.

तुमची सुरक्षा आमच्या हातातः नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, गुन्हेगारांची अशी इच्छा आहे की, पाच वर्षांपासून ठप्प असलेले सगळे दोन नंबरचे धंदे बंद आहेत ते पुन्हा चालू केले पाहिजेत. त्यासाठी आमचे विरोधक ताकद लावत असून भाजपला जातीयतेच्या मुद्यावर आडवायचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मतदारांनी यापासून सावध राहा, कमळ सोडून तु्म्ही इतर गोष्टींकडे लक्ष देऊ नका आणि जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत तुमची सुरक्षा आमच्या हातात असल्याचे अश्वासनही त्यांनी दिले.

संबंधित बातम्या

TV9 Final Opinion Poll: : उत्तर प्रदेशात कोणत्या टप्प्यात कोण बाजी मारणार? सात टप्प्यातील नेमकं चित्रं काय?; वाचा ‘टीव्ही9 ओपिनियन फायनल पोल’

TV9 Final Opinion Poll: यूपीत भाजपच नंबर वन, सपा दुसऱ्या क्रमांकावर, बसपा आणि काँग्रेसची सर्वात वाईट अवस्था; टीव्ही9चा ओपिनियन पोल काय सांगतो?

TV9 Final Opinion Poll : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतदार समाजवादी पार्टीसोबत, भाजप चौथ्या क्रमांकावर

Non Stop LIVE Update
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो.