Ghaziabad Crowd | गाझियाबादमध्ये हजारो मजुरांची गर्दी, 500 मीटरच्या परिघात कोरोनाग्रस्त

उत्तर प्रदेश वेगवेगळ्या भागात आणि बिहारला जाण्यासाठी कामगार रामलीला मैदानात जमलेले होते. गर्दी इतकी होती की कामगार एकमेकांना अक्षरशः चिकटून उभे होते (Ghaziabad Huge Crowd gathered at Ramleela Maidan)

Ghaziabad Crowd | गाझियाबादमध्ये हजारो मजुरांची गर्दी, 500 मीटरच्या परिघात कोरोनाग्रस्त
Follow us
| Updated on: May 18, 2020 | 3:53 PM

लखनौ : लॉकडाऊनच्या चौथा टप्प्यातील पहिल्याच दिवशी उत्तर प्रदेशमध्ये अडकलेल्या बिहारच्या कामगारांची गर्दी उसळली. घरी जाण्याच्या ओढीने गाझियाबादमधील रामलीला मैदानात जमलेल्या हजारो मजुरांनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला. या गर्दीपासून 500 मीटर परिघात कोरोनाग्रस्त असल्याची माहिती समोर आल्याने ‘कोरोना’ रुग्णसंख्येचा स्फोट होण्याची भीती वर्तवली जात आहे. (Ghaziabad Huge Crowd gathered at Ramleela Maidan)

योगी सरकारने यूपीमध्ये अडकलेल्या परराज्यातील कामगारांना आपापल्या घरी पाठवण्यासाठी ट्रेनची व्यवस्था केली आहे. या मजुरांना गाझियाबादमध्ये थांबवून ट्रेनने पाठवण्यासाठी नोंदणी सुरु करण्यात आली.

उत्तर प्रदेश वेगवेगळ्या भागात आणि बिहारला जाण्यासाठी कामगार रामलीला मैदानात जमलेले होते. गर्दी इतकी होती की कामगार एकमेकांना अक्षरशः चिकटून उभे होते. गर्दी अनियंत्रित झाली होती. त्यांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास सांगितले जात होते, पण कोणीही ऐकण्यास तयार नव्हते.

हेही वाचा : मजूर चालून चालून थकले, भुकेने वाट रोखली, जळगावात उपासमारीने दोघांचा मृत्यू, एकाची पू्र्णा नदीत उडी

या गर्दीविषयी भयकंप उडवणारी बाब ‘आरोग्य सेतु’ अॅप पाहिल्यानंतर समोर आली. घटनास्थळी उपस्थित पत्रकाराने कोरोनाच्या रुग्णांविषयी माहिती देणारे ‘आरोग्य सेतु’ अॅप तपासले, तेव्हा कोरोनाग्रस्त रुग्ण 500 मीटर अंतरावर असल्याचं समजलं. त्यामुळे गर्दीत ‘कोरोना’ पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

गाझियाबादमधील रामलीला मैदानावर सरकारने कामगारांना थांबवले. त्यांना ट्रेनने घरी पाठवण्यास सांगितले आहे. यावेळी पोलिस आणि प्रशासनाची पथके तैनात करण्यात आली आहेत. कामगारांकडून फॉर्म भरुन घेणे आणि थर्मल स्कॅनिंग करणे हे या पथकांचे काम होते. परंतु हजारो कामगार एकत्र आल्याने चेंगराचेंगरीसदृश्य स्थिती निर्माण झाली होती.

(Ghaziabad Huge Crowd gathered at Ramleela Maidan)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.