AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vice Presidential Election 2025 : उद्या मतदान, संख्याबळ किती, कोणाचं समर्थन कोणाला ? उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबद्दल A टू Z माहिती एका क्लिकवर

Vice Presidential Election 2025 : भारताच्या उपराष्ट्रपतीपदासाठी उद्या, अर्थात 9 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन आणि इंडिया अलायन्सचे सुदर्शन रेड्डी यांच्यात ही स्पर्धा आहे. लोकसभेत एनडीएचे बहुमत असल्याने राधाकृष्णन जिंकण्याची शक्यता जास्त आहे, परंतु रेड्डींच्या समर्थनासाठी विरोधी पक्षही एकवटले आहेत. त्यामुळे ही लढत चुरशीची मानली जात आहे. भारताचे नवे उपराष्ट्रपती कोण, हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

Vice Presidential Election 2025 : उद्या मतदान, संख्याबळ किती, कोणाचं समर्थन कोणाला ? उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबद्दल  A टू Z माहिती एका क्लिकवर
सीपी राधाकृष्णन वि. सुदर्शन रेड्डी Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Sep 08, 2025 | 1:12 PM
Share

देशाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उद्या, म्हणजेच मंगळवार 9 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीपूर्वी, सत्ताधारी एनडीए आणि इंडिया आघाडीतर्फे आपापल्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. विशेष गोष्ट म्हणजे या निवडणुकीत, दोन्ही आघाडींना त्यांच्या विजयाची खात्री आहे, परंतु हा मार्ग इतका सोपा नाही. खरंतर, गेल्या महिन्यात जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव तडकाफडकी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता, त्यानंतर ही निवडणूक होत आहे.

ही उपराष्ट्रपतीपदाची17 वी निवडणूक आहे. हे पद लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सदस्यांचा समावेश असलेल्या निवडणूक मंडळाद्वारे निवडले जाते. राष्ट्रपती निवडणुकीत कोणत्या पक्षाचे पारडे जड आहे, कोण कोणाला पाठिंबा देतोय आणि मतदानाची प्रक्रिया कशी असते ते जाणून घेऊया?

सीपी राधाकृष्णन वि. सुदर्शन रेड्डी

यावेळी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत तामिळनाडूचे ज्येष्ठ भाजप नेते सी.पी. राधाकृष्णन आणि आंध्र प्रदेशचे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात स्पर्धा आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन हे भाजप संघटनेचे एक निष्ठावंत आणि विश्वासू चेहरा मानले जातात आणि दक्षिण भारतात आपल्या पक्षाची मांड ठोकण्यासाठी पक्षाच्या रणनीतीचा हा एक भाग आहे. तर दुसरीकडे सुदर्शन रेड्डी हे न्यायव्यवस्थेत त्यांच्या प्रामाणिक आणि निष्पक्ष प्रतिमेसाठी ओळखले जातात. संविधान आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी काम करत असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. राजकारण आणि न्यायव्यवस्थेतील या थेट संघर्षामुळे ही निवडणूक आणखी ऐतिहासिक बनली आहे.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदार कोण ?

उपराष्ट्रपतीची निवड एका निर्वाचक मंडळाद्वारे केली जाते, ज्यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य असतात. इतकेच नाही तर नामनिर्देशित सदस्य देखील त्यात भाग घेतात. या निवडणुकीत राज्य विधानसभांची कोणतीही भूमिका नाही. 2025 मध्ये, रिक्त जागा वगळता दोन्ही सभागृहांमध्ये 782 खासदार असतील, त्यापैकी 543 लोकसभेत, 233 राज्यसभेत आणि 12 नामनिर्देशित सदस्य असतील. प्रत्येक खासदाराच्या मताचे मूल्य समान असते.

व्होटिंगची प्रक्रिया कशी असते , कशी होते मतमोजणी ?

उपराष्ट्रपतीची निवड संविधानाच्या अनुच्छेद 66 अंतर्गत एकल हस्तांतरणीय मत (STV) वापरून प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीने केली जाते. मतदार गुप्तपणे त्यांचे मतदान करतात. ते उमेदवारांना पसंतीच्या क्रमाने (1, 2 3, अशा पद्धतीने) क्रमवारी लावतात. ही निवडणूक जिंकण्यासाठी, उमेदवाराला एकूण वैध मतांच्या निम्म्याहून अधिक मते मिळणे आवश्यक आहे. जर कोणत्याही उमेदवाराला पहिल्या पसंतीची बहुमत मिळाली नाही, तर सर्वात कमी मते मिळवणाऱ्या उमेदवाराला बाद केले जाते आणि त्याचे/तिचे मतपत्रिका पुढील उपलब्ध पसंतींमध्ये ट्रान्सफर केले जातात. निवडणुकीतील उमेदवार बहुमत मिळवेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहते.

निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली उपराष्ट्रपतींची निवडणूक घेतली जाते. मतदानावर नजर ठेवण्यासाठी एक निवडणूक अधिकारी नियुक्त केला जातो, जो सहसा एक वरिष्ठ संसदीय अधिकारी असतो. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक नियम, 1974 च्या नियम 8 अंतर्गत संसद भवनात मतदान होते.

कोणाचं समर्थन कोणाला ?

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएकडे लोकसभेत मजबूत बहुमत आहे आणि अनेक प्रादेशिक पक्षही त्यांना पाठिंबा देत असल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकरीत सीपी राधाकृष्णन यांचा विजय जवळजवळ निश्चित मानला जातोय. मात्र असे असले तरीही विरोधी पक्ष इंडिया आघाडी देखील पूर्वीपेक्षा अधिक एकजूट आणि मजबूत दिसत आहे. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष, राजद, डावे पक्ष आणि इतर विरोधी पक्षांनी सुदर्शन रेड्डी यांच्या समर्थनार्थ सक्रिय प्रचार केला आहे. शिवसेनेने (यूबीटी) देखील रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे. त्याशिवाय याशिवाय, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या विनंतीवरून न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी द्रमुक अध्यक्ष आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्याशी संपर्क साधून पाठिंबा मागितला होता, परंतु स्टॅलिन यांनी कोणतेही विधान करणे टाळले. याशिवाय, वायएसआर काँग्रेस पक्षाने एनडीएला पाठिंबा देणार असल्याचे म्हटले होते. लोकसभेत त्यांचे चार आणि राज्यसभेत सात सदस्य आहेत. गेल्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीत त्यांनी एनडीएच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. सध्या बीजेडीचे प्रमुख आणि ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक दिल्लीत आहेत. उपाध्यक्षपदासाठी मतदान करण्याबाबत त्यांनी आपले पत्ते उघड केलेले नाहीत. बीजेडीच्या ज्येष्ठ आमदार प्रमिला मलिक यांनी निश्चितपणे म्हटले आहे की पक्षप्रमुख ओडिशाचे हित सर्वोपरि ठेवून योग्य वेळी निर्णय घेतील.

बहुमत कोणाकडे ?

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचं पारडं जड असल्याचंदिसून येतंय कारण लोकसभेत त्यांचे बहुमत आहे. जर आपण आकडेवारी पाहिली तर लोकसभेत एनडीएच्या खासदारांची संख्या 293 इतकी आणि राज्यसभेत हा आकडा 130 इतका आहे. याशिवाय, 12 नामांकित सदस्य आहेत. अशाप्रकारे, एनडीएकडे एकूण 435 खासदार आहेत. निवडणुकीत 783 खासदार भाग घेतील, त्यामुळे 392 हा बहुमताचा आकडा आहे. जर क्रॉस व्होटिंग झाले नाही तर एनडीएचा विजय जवळजवळ निश्चित मानला जात आहे. अखेर उद्या कोण जिकंतं आणि उपराष्ट्रपती कोण बनतं याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.