Video : साडीमध्ये महिलेचा खास स्टंट, व्हिडीओ पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल

Video : साडीमध्ये महिलेचा खास स्टंट, व्हिडीओ पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
डान्सर रुक्मिणी विजयकुमारचा साडीतील स्टंट

या व्हिडीओत एक महिला स्टंट करताना पाहायला मिळतेय. तिचा हा स्टंट सध्या चांगलाच चर्चेत आलाय.

सागर जोशी

|

Apr 12, 2021 | 8:03 PM

मुंबई : चर्चेच राहण्यासाठी लोक अनेक क्लुप्त्या लढवतात. काही लोक यात यशस्वी ठरतात तर काहींचं स्वप्न तुटतं. सोशल मीडियावर अशा अनेक गोष्टींची चर्चा कायम सुरु असते. लोकही अशा विविध गोष्टींमध्ये इंटरेस्ट दाखवतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक महिला स्टंट करताना पाहायला मिळतेय. तिचा हा स्टंट सध्या चांगलाच चर्चेत आलाय. (Dancer Rukmini Vijaykumar’s stunt in saree)

कुठलाही स्टंट करणं सर्वसाधारण बाब नाही. अशा प्रकारच्या स्टंटसाठी मोठी प्रॅक्टिस करावी लागते. काही लोक विचित्र प्रकारच्या स्टंटमुळे आपला जीवही गमावतात. मात्र, सध्या चर्चेत आलेला या महिलेचा स्टंट चांगलाच पसंत केला जातोय. या महिलेनं साडी घालून हा स्टंट केलाय. हा स्टंट कौतुकास पात्र ठरत आहे आणि सोशल मीडियावरही प्रेक्षकांकडून अनेक कमेंट्सही केल्या जात आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही एक महिला साडी घालून बॅकफ्लिप, हेडस्टँड, स्प्लिट्स करताना पाहायला मिळते. या स्टंट करताना ती महिलेचा आत्मविश्वासही दिसून येतो.

महिलेचा स्टंटला लोकांची मोठी पसंत

हा स्टंट करणाऱ्या महिलेचं नाव रुक्मिणी विजयकुमार आहे. ती एक डान्सर आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ नुकताच पोस्ट केलाय. या व्हिडीओमध्ये ती साडी घालून स्टंट करताना दिसून येते. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. आतापर्यंत 7 लाखापेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय. तर 80 हजारापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ लाईक केलाय. हा व्हिडीओ लोकांच्या पसंतीला उतरत आहे. लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट्सही करत आहेत.

इतर बातम्या :

Video | जॅकी श्रॉफसोबत पूलमध्ये धमाल करताना दिसली लेक कृष्णा, पाहा व्हिडीओ

Video | काजोलच्या सुपरहिट गाण्यांवर लेक न्यासाचे ठुमके, व्हिडीओ पाहून चाहत्यांनी केले कौतुक!

Dancer Rukmini Vijaykumar’s stunt in saree

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें