Video : ‘मी मुथुवेल करुणानिधी स्टालिन’, शब्द ऐकताच स्टालिन यांच्या पत्नीला अश्रू अनावर

एम. के. स्टालिन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच दुर्गा स्टालिन यांना अश्रू अनावर झाले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.

Video : 'मी मुथुवेल करुणानिधी स्टालिन', शब्द ऐकताच स्टालिन यांच्या पत्नीला अश्रू अनावर
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांच्या पत्नी दुर्गा स्टालिन यांना अश्रू अनावर

चेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत AIADMK ला धूळ चारत DMK ने अभूतपूर्व विजय मिळवला. बहुमत मिळाल्यानंतर आज DMK अध्यक्ष एम. के. स्टालिन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात पार पडलेल्या सोहळ्यात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी स्टालिन यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या सोहळ्याला DMK नेत्यांसह स्टालिन यांच्या पत्नी दुर्गा स्टालिनही उपस्थित होत्या. एम. के. स्टालिन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच दुर्गा स्टालिन यांना अश्रू अनावर झाले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. हा व्हीडिओ पाहून अनेक लोकही भावूक होत आहेत. (Tears flowed to MK Stalin’s wife Durga Stalin)

तामिळनाडूच्या राजभवनात आज मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील 33 मंत्र्यांनाही शपथ देण्यात आली. स्टालिन यांच्याकडे मुख्यमंत्रीपदासह गृहमंत्रीपदही असणार आहे, असं सांगितलं जात आहे. 68 वर्षीय स्टालिन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना आपलं पूर्ण नाव मुखुवेल करुणानिधी स्टालिन असं घेतलं. त्यावेळी राजभवनात टाळ्यांचा एकच आवाज घुमला. तर दुसरीकडे स्टालिन यांच्या पत्नी दुर्गा स्टालिन आणि मुलगा उधैनिधी स्टालिन यांना अश्रू अनावर झाले.

गांधी, नेहरु स्टालिन यांना रिपोर्ट करणार!

दरम्यान, स्टालिन यांच्या मंत्रिमंडळाबाबत एक खास वैशिष्ट्य सांगितलं जात आहे. या मंत्रिमंडळात नेहरु, गांधी, स्टालिन असे सर्वजण एकत्र काम करणार आहेत! इतकंच नाही तर गांधी आणि नेहरु आता स्टालिन यांना रिपोर्ट करणार आहेत! राज्यपाल बनवारी लाल पुरोहित यांनी स्टालिन यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. शपथविधी समारोहासोबतच त्यांनी स्टालिन यांच्या मंत्रिमंडळावरही शिक्कामोर्तब केलं. MK स्टालिन यांची पहिल्यांदाच तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे. स्टालिन यांनी के. एन. नेहरु यांना नगरपालिका परिषद प्रशासन विभागाचा कारभार दिला आहे. तर गांधी यांच्याकडे हथकरधा, खादी ग्रामोद्योग मंत्री बनवण्यात आलं आहे.

एम. के. स्टालिन

तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या स्टालिन यांचं पूर्ण नाव मुथुवेल करुणानिधी स्टालिन आहे. सोव्हिएत संघ युनियनचे प्रसिद्ध नेते जोसेफ स्टालिन यांच्या नावावरुन एम. के. यांच्या नावामागे स्टालिन लावण्यात आलं. करुणानिधी यांनी स्टालिन यांना आपला उत्तराधिकारी घोषित केलं होतं. त्यानंतर त्यांना आपला भाऊ अलागिरी यांच्याशी सत्तासंघर्ष करावा लागला होता. करुणानिधी यांच्या निधनानंतर ऑगस्ट 2018मध्ये स्टालिन यांची DMKच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

संबंधित बातम्या :

तामिळनाडूत गांधी, नेहरु आता स्टालिनला रिपोर्ट करणार! राज्याचा कारभार कसा हाकला जाणार?

‘बंगालमधील राजकीय हिंसेत 16 जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाखांची मदत देण्याची ममता बॅनर्जींची घोषणा

Tears flowed to MK Stalin’s wife Durga Stalin