AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Waqf Amendment Bill : मोठी बातमी! लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक मंजूर

मोठी बातमी समोर येत आहे, अखेर वक्फ संशोधन विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाली आहे. मध्यरात्री उशिरा या विधेयकावर मतदान पार पडलं.

Waqf Amendment Bill : मोठी बातमी! लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक मंजूर
| Updated on: Apr 03, 2025 | 2:11 AM
Share

मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक सादर करण्यात आलं,  या विधेयकावर  मध्यरात्री उशिरा  लोकसभेत मतदान पार पडलं. अखेर हे विधेयक मंजूर झालं आहे. विधेयकाच्या बाजुनं 288  इतकी मतं पडली तर विधेयकाच्या विरोधात 232  इतकी मतं पडली आहेत.

संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक सादर केलं. वक्फ सुधारणा विधेयक संसदेमध्ये सादर होताच विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला.  “वक्फ विधेयकात धार्मिक स्थळांबाबत काहीही नाहीये. केंद्र सरकार कोणत्याही धार्मिक गोष्टीत हस्तक्षेप करत नाहीये. हा केवळ वक्फच्या संपत्तीच्या नियोजनाचा विषय आहे” अशी भूमिका हे विधेयक संसदेत सादर करताना संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी मांडली. त्यानंतर मध्यरात्रीपर्यंत या विधेयकावर चर्चा सुरू होती. चर्चेनंतर मतदान घेण्यात आलं.

दरम्यान मतदानापूर्वी देखील किरेन रिजिजू यांनी या विधेयकावरून विरोधकांवर निशाणा साधला. विरोधक वक्फ संशोधन विधेयकाला असंवैधानिक का म्हणत आहेत ते माहीत नाही. हे विधेयक असंवैधानिक कसं आहे हे सांगण्यासाठी त्यांच्याकडे एकही कारण नाही असं किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे विरोधकांनी देखील या विधेयकाच्या चर्चेवेळी आक्रमक भूमिका मांडली त्यामुळे लोकसभेत चांगलाच गोंळध झाल्याच पाहायला मिळालं. एमआयएमचे खासदार असदुद्दीन औवेसी या विधेयकावरील चर्चेवेळी म्हणाले की, सरकार मदराशांना लक्ष्य बनवत आहे. आता वक्फची मालमत्ता ताब्यात घेतली जाणार आहे. मुस्लिमांच्या जमिनीचा निर्णय अधिकारी घेतील. बिगर मुस्लिम व्यक्ती वक्फ बोर्ड चालवतील, या विधेयकाचा मुस्लिमांना काहीही फायदा होणार नाही. दरम्यान यावेळी ओवैसी यांनी विधेयकाची प्रत देखील फाडली. तर दुसरीकडे सत्ताधारी खासदारांनी या विधेयकाचं जोरदार समर्थन केल्याचं पाहायला मिळालं. अखेर चर्चेनंतर या विधेयकावर लोकसभेत मतदान घेण्यात आलं. विधेयकाच्या बाजुनं 288 मत पडली तर विधेयकाच्या विरोधात 232 मत पडली. हे विधेयक लोकसभेत मंजूर झालं आहे. आता आज हे विधेयक राज्यसभेत सादर केलं जाणार आहे.

Follow Us
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद