AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Update : 2027 मधील पावसाचा पहिला अंदाज समोर, एल निनोने टेन्शन वाढवलं, मोठा इशारा

मोठी बातमी समोर येत आहे, एल निनोचा प्रभाव आता आणखी वाढत जाणार असून, जागतिक हवामान संस्थेकडून ऑक्टोबर ते डिसेंबर या काळातील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच पुढेच्या वर्षी एल निनोचा प्रभाव कधीपर्यंत राहु शकतो याची देखील माहिती देण्यात आली आहे.

Weather Update : 2027 मधील पावसाचा पहिला अंदाज समोर, एल निनोने टेन्शन वाढवलं, मोठा इशारा
Rainfall Forecast 2027Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 10, 2026 | 7:02 PM
Share

भारतामध्ये यंदा दुष्काळ पडला आहे, अनेक राज्यांमध्ये यावर्षी पुरेसा पाऊसच झाला नाही. पावसामध्ये प्रचंड प्रमाणात तूट निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात तर जून जुलैनंतर पाऊस झाला नाही. त्यामुळे खरीप हंगाम हातचा गेला आहे. शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्यात सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. निदान परतीचा पाऊस तरी पडेल, खरीप हंगाम गेला पण रब्बी हंगामामध्ये तरी थोडंफार पीक पाणी येईल, या आशेवर शेतकरी होते. परंतु त्यातच आता जागतिक हवामान विभागाकडून (WMO) एल नीनो संदर्भात पुन्हा एकदा भारताला मोठा इशारा देण्यात आला आहे.

पुढील काळात म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात एल निनोचं संकट अधिक गडद होईल, असं जागतिक हवामान विभागाने म्हटलं आहे. त्यामुळे भारतात पुढील काही महिने अत्यंत कमी पाऊस पडणार आहे, पावसाचं प्रमाण देखील असमान असेल काही भागात पाऊस होईल तर काही भागात पाऊस होणार नाही, असं जागतिक हवामान विभागाने म्हटलं आहे. याचा मोठा फटका आता रब्बी पिकांना बसण्याची शक्यता आहे. जर पाऊस झाला नाही तर रब्बीची पेरणी देखील होणार नाहीये.

1950 नंतर निर्माण झालेली ही एल निनोची पहिलीच सर्वात मजबूत स्थिती आहे, असं जागतिक हवामान संघटनेचे महासचिव सेलेस्ट साउलो यांनी म्हटलं आहे. या एल निनोचा प्रभाव फेब्रुवारी 2027 पर्यंत कायम राहणार असून, त्यानंतर मात्र पावसाचं प्रमाण सामान्य स्वरुपात राहण्याचा अंदाज आहे. समुद्राचं तापमान सरासरीपेक्षा 1.6 अंश सेल्सिअसने वाढल्यामुळे जगावर एल निनोचं संकट निर्माण झालं आहे. दरम्यान पुढच्या वर्षी  देखील फेब्रुवारी 2027 पर्यंत  एल निनोचं संकट कायम राहणार आहे. मात्र त्यानंतर पाऊस सामान्य राहू शकतो, असं देखील जागतिक हवामान संघटनेनं म्हटलं आहे.  दरम्यान त्यामुळे आता थोडी चिंता वाढली आहे. फेब्रुवारीपर्यंत एल निनोचं संकट कायम असल्यामुळे त्यानंतरच भारतात पावसाचं प्रमाण कसं राहणार याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे