AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“एक वेळ माझा गळा चिरा, पण…” ममता बॅनर्जी आक्रमक

राज्य सरकारकडून तातडीने मदत मिळावी यासाठी कोलकाता आणि इतर भागातील नागरिकांनी रस्त्यावर येऊन निदर्शनं केली. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वांना शांत होण्याचं आवाहन केलं (West Bengal CM Mamata Banerjee).

एक वेळ माझा गळा चिरा, पण... ममता बॅनर्जी आक्रमक
| Updated on: May 24, 2020 | 4:25 PM
Share

कोलकाता :  “एकवेळ माझा गळा चिरा, पण शांत राहा“, असं आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) यांनी राज्य सरकारविरोधात निदर्शने देणाऱ्या नागरिकांना केलं आहे. अम्फान चक्रीवादाळामुले पश्चिम बंगालमध्ये जवळपास 1 लाख कोटींचं नुकसान झालं आहे. यादरम्यान राज्य सरकारकडून तातडीने मदत मिळावी यासाठी कोलकाता आणि इतर भागातील नागरिकांनी रस्त्यावर येऊन निदर्शनं केली. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वांना शांत होण्याचं आवाहन केलं.

“राज्य सरकार दिवस-रात्र संपूर्ण परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. सर्व सुरळीत होईल. कृपया शांतता राखा. याव्यक्तीरिक्त मी तुम्हाला एकच सांगेल की, एकवेळ माझा गळा चिरा, पण शांत राहा”, असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या (West Bengal CM Mamata Banerjee).

अम्फान चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक भागांमध्ये वीज पूर्णपणे ठप्प झाली आहे. या परिस्थितीत पश्चिम बंगाल सरकारने तातडीने सोयीसुविधा पुरवाव्यात यासाठी कोलकाता आणि विविध भागातील शेकडो नागरकांनी रस्त्यावर येत पश्चिम बंगाल सरकारविरोधात निदर्शने दिली.

बैरकपूर-सोदेपूर बायपास परिसरात आंदोलनकर्त्यांची रस्त्यावर मोठी गर्दी उसळली होती. यावेळी पोलीस आणि नागरिकांमध्ये धक्काबुक्की झाली. दरम्यान, पश्चिम बंगालची परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकारला सर्वसामान्यांच्या सहकार्याची देखील आवश्यकता आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्वांना शांततेचं आवाहन केलं आहे.

अम्फान चक्रिवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये 86 जणांचा मृत्यू झाला आहे. चक्रीवादळामुळे कोलकाता विमानतळ आणि इतर परिसरातही पाणी साचलं होतं. चक्रिवादळाच्या तीन दिवसांनंतरही काही भागांमधील परिस्थिती पूर्ववत होऊ शकलेली नाही.

(West Bengal CM Mamata Banerjee)

हेही वाचा :

पॅकेज घोषित कशाला करत बसायचं? थेट मदत करायची : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

India Corona Update | 24 तासात देशात 6,767 नवे रुग्ण, 147 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.