AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलांना आजपासून मिळणार 3 हजार, अन्नपूर्णा योजनेला सुरूवात, पश्चिम बंगाल सरकारने..

पश्चिम बंगालमध्ये भाजपाची सत्ता आली. ममता बनर्जी यांना जोरदार धक्का देत एकहाती सत्ता भाजपाने मिळवली. या निवडणुकीदरम्यान अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. त्यामध्येच आजपासून पश्चिम बंगालमध्ये अन्नपूर्णा योजनेला सुरूवात होईल.

महिलांना आजपासून मिळणार 3 हजार, अन्नपूर्णा योजनेला सुरूवात, पश्चिम बंगाल सरकारने..
Annapurna Yojana
| Updated on: Jun 03, 2026 | 9:37 AM
Share

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. पश्चिम बंगालमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारत एक हाती सत्ता मिळवली. निवडणुकीदरम्यान काही मोठ्या घोषणा भाजपाकडून करण्यात आल्या. त्यात सर्वात महत्वाची म्हणजे राज्यातील महिलांना दर महिन्याला 3000 रूपये मिळतील, अशी घोषणा केली. आता भाजपाकडून दिलेले वचन पूर्ण केले जात आहे. आजपासून पश्चिम बंगालमध्ये अन्नपूर्णा योजनेला सुरूवात होईल. मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी या योजनेची घोषणा केली. महिलांना दरमहिन्याला 3000 हजार रूपये मिळणार आहेत. बॅंकेच्या खात्यात महिलांचे हे पैसे थेट जातील. महिला घरगुती खर्च आणि इतर गोष्टींकरिता सरकारकडून ही मदत दिली जात आहे. भारतीय जनता पक्षाने निवडणुकीदरम्यान काही घोषणा केल्या होत्या. त्यात ही अन्नपूर्णा योजना होती. ममता बनर्जींच्या लक्ष्मी भंडार योजनेची जागा आता या योजनेने घेतली.

लक्ष्मी भंडार योजनेत महिलांना दर महिन्याला सरकारकडून 1500 रूपये दिली जात होती. आता अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून महिलांना दुप्पट म्हणजेच 3000 रूपये सरकारकडून दिली जाणार आहेत. मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी सांगितले होते की, सरकारच्या लोक घरोघरी जाऊन या योजनेकरिता अर्ज भरण्याकरिता महिलांची मदत करत आहेत. 2 कोटी महिला या योजनेचा लाभ घेतील, असा अंदाज आहे.

यासोबतच मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या योजनेकरिता ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने महिला अर्ज करू शकतात. याकरिता विशेष टीम देखील तयार करण्यात आली. या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता सरकारकडून काही नियम आणि अटी लागू करण्यात आल्यात. या योजनेकरिता अर्ज फक्त महिलाच करू शकतात. यासोबतच महिला ही पश्चिम बंगालची रहिवासी असावी. यामध्ये 25 ते 60 वयोगटापर्यंतच्या महिला अर्ज करू शकतात.

अर्ज करणाऱ्या महिला या आयकर भरणाऱ्या नसाव्यात. यासोबतच रिटायर्ड कर्मचाऱ्यांनाही या योजनेकरिता अर्ज भरता येणार नाही. या योजनेच्या माध्यमातून पश्चिम बंगालच्या महिलांना दरमहिन्याला 3000 हजार रूपये मिळणार आहेत. महाराष्ट्र सरकारने देखील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अशाच प्रकारची योजना सुरू केली. त्या योजनेमधून महिलांना दरमहिन्याला 1500 रूपये मिळतात. मात्र, आता या योजनेतून तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात