AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Mandir | ते सध्या काय करतात? अयोध्या रामजन्मभूमीचा निकाल देणारे ते पाच न्यायाधीश

2019 साली रामजन्मभूमीचा ऐतिहासिक निकाल दिला गेला. हा निकाल देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींना राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. अयोध्येचा निकाल देणारे पाच न्यायाधीश आता कुठे आहेत? चला जाणून घेऊ...

Ram Mandir | ते सध्या काय करतात? अयोध्या रामजन्मभूमीचा निकाल देणारे ते पाच न्यायाधीश
RAM MANDIR Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jan 20, 2024 | 3:10 PM
Share

नवी दिल्ली | 20 जानेवारी 2024 : अयोध्येत राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची मोठ्या उत्साहात तयारी सुरु सुरु आहे. 22 जानेवारी रोजी होणारी या सोहळ्याचे निमंत्रण अनेक सेलेब्रिटी कलाकार, उद्योगपती, राजकीय नेते यांना देण्यात आले आहे. तयच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने 2019 साली रामजन्मभूमीवर ऐतिहासिक निकाल देणार्‍या सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांना प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात आमंत्रित केले आहे. 2019 मध्ये निर्णय देणाऱ्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठात न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती एसए बोबडे, न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांचा समावेश होता.

2019 मध्ये रामजन्मभूमी वादात हिंदूंच्या बाजूने निकाल देणाऱ्या पाच न्यायाधीशांपैकी चार न्यायाधीश निवृत्त झाले आहेत. तर एक न्यायाधीश अजूनही सर्वोच्च न्यायालयात आहे.

न्यायमूर्ती रंजन गोगोई

2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला त्यावेळी न्यायमूर्ती रंजन गोगोई हे देशाचे सरन्यायाधीश होते. ते ही पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाचे एक भाग होते. निकाल दिला त्याच वर्षी म्हणजेच 2019 मध्ये ते निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनंतर अवघ्या चार महिन्यांनी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना राज्यसभेवर नामनिर्देशित केले.

न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठात न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांचाही समावेश होता. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या निवृत्तीनंतर बोबडे देशाचे सरन्यायाधीश झाले. 23 एप्रिल 2021 रोजी सेवानिवृत्तीनंतर ते महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलपती झाले. त्यांचे नाव आजही या विद्यापीठातील एमेरिटस प्राध्यापकांमध्ये समाविष्ट आहे.

न्यायमूर्ती अशोक भूषण

अयोध्येचा निकाल देणाऱ्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठात न्यायमूर्ती अशोक भूषण हे जुलै 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले. यानंतर केंद्र सरकारने त्यांना राष्ट्रीय कंपनी कायदा अपीलीय न्यायाधिकरणाचे (एनसीएलएटी) अध्यक्ष केले.

न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर

अयोध्येबाबत निकाल देणाऱ्या घटनापीठात न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर यांचाही समावेश होता. जानेवारी २०२३ मध्ये ते सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले. अवघ्या एका महिन्यानंतर त्यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, त्यांच्या नियुक्तीवरून बराच वादंग आणि राजकीय गदारोळ निर्माण झाला होता.

न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड

न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड हे या पाच खंडपीठाचे एक भाग होते. सध्या ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत. नोव्हेंबर 2024 पर्यंत ते या पदावर असतील.

हजारो आदिवासी व शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मंत्रालयाच्या दिशेने
हजारो आदिवासी व शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मंत्रालयाच्या दिशेने.
महाराष्ट्र हिरवा करण्याची कुणाची हिंमत नाही; मोहोळ स्पष्टच बोलले
महाराष्ट्र हिरवा करण्याची कुणाची हिंमत नाही; मोहोळ स्पष्टच बोलले.
मलाड रेल्वे स्थानकातील हत्या प्रकरणाचा नवा CCTV समोर
मलाड रेल्वे स्थानकातील हत्या प्रकरणाचा नवा CCTV समोर.
मालाड रेल्वेस्थानक हत्या प्रकरण; आरोपीला अटक, काय होणार शिक्षा?
मालाड रेल्वेस्थानक हत्या प्रकरण; आरोपीला अटक, काय होणार शिक्षा?.
डोंबिवलीत मराठी मुलीच्या एकाच स्टॉलवर कारवाई, नेमकं काय घडलं?
डोंबिवलीत मराठी मुलीच्या एकाच स्टॉलवर कारवाई, नेमकं काय घडलं?.
मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर
मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर.
संजय राऊतांचा न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर खटल्यात दिरंगाईचा आरोप
संजय राऊतांचा न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर खटल्यात दिरंगाईचा आरोप.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक.
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी.
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका.