What India Thinks Today : सॉफ्ट पॉवर आणि आर्थिक क्षेत्रात ब्रॅड इंडिया कसा मजबूत होणार?; टीव्ही9चे एमडी आणि सीईओ बरूण दास यांनी मांडली रुपरेषा

2016मध्ये जेव्हा इस्रायल आणि पॅलेस्टाी शांततेसाठी एक संधी दिली होती. पिंक फ्लॉईडच्या रोजर वाटर्स, जॉन बॉन जोवी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो सारख्या बड्या लोकांच्या सांगण्यावरूनच हे आपण विसरताकामा नये. कदाचित शांतता निर्माण झाली नसेल, पण लोकांच्या मनात सद्भावना... बॉम्ब आणि बंदुकींचा अत्यंत चांगला पर्याय झाली आहे, असं टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास म्हणाले.

What India Thinks Today : सॉफ्ट पॉवर आणि आर्थिक क्षेत्रात ब्रॅड इंडिया कसा मजबूत होणार?; टीव्ही9चे एमडी आणि सीईओ बरूण दास यांनी मांडली रुपरेषा
TV9 Network MD And CEO Barun DasImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 25, 2024 | 5:30 PM

नवी दिल्ली | 25 फेब्रुवारी 2024 : देशातील सर्वात मोठं नेटवर्क असलेल्या टीव्ही9ने व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समीटचं आयोजन केलं आहे. या समीटचं आज अत्यंत शानदार उद्घाटन झालं. यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरूण दास उपस्थित होते. या शानदार सोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित आहेत. विविध सत्रात हे दिग्गज आपले विचार मांडणार आहेत. यावेळी अनेक मान्यवरांच्या मुलाखतीही पार पडणार आहे. कान्क्लेव्हच्या उद्घाटनापूर्वी टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी मंत्री अनुराग ठाकूर यांना शाल देऊन त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर बरुण दास यांनी सोहळ्याचं प्रास्ताविक करत उपस्थितांशी संवाद साधला.

आजची संध्याकाळ अत्यंत चांगली आणि विशेष ठरणार आहे, याचा मला खास आनंद होतोय. आज ग्लॅमरस असेल आणि अनेकांचा गौरव होणार आहे. या हॉलमध्ये मला क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील अनके मान्यवर दिसले. हे सर्व मान्यवर एका उद्देशाने या ठिकाणी आले आहे. आज आपण भारताच्या साहसी दृष्टीकोणावर मंथन करणार आहोत. केवळ आर्थिक किंवा सैन्य शक्तीवरच चर्चा होणार नाहीतर सॉफ्ट पॉवरही चर्चा होणार आहे, असं टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास म्हणाले.

योग, वेद आणि आयुर्वेदाचा देश

भारताच्या Soft Power for Hard Gains वर आजची चर्चा केंद्रीत होणार आहे. या सॉफ्ट पॉवर काय आहे? असं वारंवार म्हटलं जातं. अमेरिकेचे दिग्गज राजकारणी जोसेफ नी यांनी सॉफ्ट पॉवरची परिभाषा केली होती. जेव्हा कोणत्याही देशाला जबरदस्तीने आणि बळाच्या जागी आकर्षित करून आणि समजावून आपलं म्हणणं मांडलं गेलं तर त्याला सॉफ्ट पॉवर म्हणतात, असं जोसेफ म्हणतात. प्रलोभन नेहमी जबरदस्तीपेक्षा अधिक प्रभावी असतं, असंही ते म्हणाले होते. म्हणजे बऱ्यापैकी हॉलिवूडच्या माध्यमातून अमेरिका जगभरात स्वप्न विकत असतो. त्याचप्रकारे ब्राझिल आणि अर्जेंटिना सारख्या देशांनी फुटबॉलच्या मैदानात आपली उक्तृष्टतेच्या माध्यमातून जगभरात नाव कमावले आहे, असंही एमडी आणि सीईओ बरुण दास म्हणाले.

यावेळी त्यांनी योग आणि वेदांचाही उल्लेख केला. भारत नेहमी योग, वेद आणि आयुर्वेदाची जन्मभूमी राहिला आहे. सध्या जगातील सर्वात्कृष्ट सिनेमातील कहाणी सांगणारा देश म्हणून भारताकडे पाहिलं जात आहे. इथे बॉलिवूड आहे, परंतु नुकतेच सँडलवूड, कॉलिवूड आणि टॉलिवूडचीही जादू चालणार आहे. सर्वांचीच जय असो, नाटू नाटू, असंही बरुण दास म्हणाले.

क्रीडा जगतामुळेही भारताची नवी ओळख निर्माण होत आहे. आपले क्रिकेटपटू गेल्या काही दशकांपासून देशाला गौरव मिळवून देत आहेत. इतर खेळांमध्येही भारताने आपलं स्थान निर्माण केलं आहे. धैर्य, महत्त्वकांक्षा आणि दृढनिश्चय आणि आपल्या पंतप्रधानांची दूरदृष्टी… आणि आपल्या क्रीडा मंत्र्याच्या कुशल प्रशासनाला याबाबतचे धन्यवाद. बॅडमिंटन, टेनिस, निशाणेबाजी, कुस्ती, अॅथलिटिक्स आदी काही खेळ आहेत… धन्यवाद अनुरागजी, असंही ते म्हणाले.

जग आपल्याला कसं दिसतं?

भारत वैश्विक स्तरावर जसजसा फुढे जात आहे… वैश्विक स्तरावरील उच्च तालिकेत आपण आपलं स्थान निर्माण केलं आहे. क्रीडा, फिल्म आणि संगीत जगतात उत्कृष्टतेच्या माध्यमातून भारताने हे स्तर वाढवण्यासाठी अपार मेहनत घेतली आहे. जग आपल्याला कसं पाहतं, यावर भारत विचार करतो. एक देश म्हणून आपण विजेता बनतो… पॉवरफुल, सेरिब्रल कंटेट आणि विश्वविजेता… तर आपण विश्व व्यवस्थेतही वेगाने पुढे सरकतो. आपण अधिक लाभ मिळवू शकतो. मग वस्तुंचा व्यापार असेल अथवा सेवांचा, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ही रोमांचक संध्याकाळ

आज संध्याकाळी आपण धोरण निर्माते, प्रसिद्ध लोक, क्रीडा चॅम्पियन आणि ब्रँड गुरुंना ऐकणार आहोत. ब्रँड इंडियाला अधिक चमकवण्यासाठी रोडमॅप विकसित करणार आहोत. नि:संशयपणे… यासारख्या एखाद्या संध्याकाळी… कोणत्याही उत्सवाशिवाय पूर्ण होऊ शकते. त्यामुळे आज रात्री आपण क्रीडा आणि ब्रँड गुरुंना ऐकणार. मनोरंजन क्षेत्रातील काही असाधारण महिला आणि पुरुषांना टीव्ही9 नेटवर्क नक्षत्र सन्मान पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. तेव्हा, देवींनो आणि सज्जन गृहस्थांनो… आपल्यासमोर आज एक रोमांचक संध्याकाळ आहे… या लगेच हा सोहळा सुरू करूया… एकवेळ पुन्हा इथे आल्याबद्दल तुमचे धन्यवाद.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.