WITT 2024 : ऑलिम्पिकमध्ये भारताची जादू चालणार; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना विश्वास

मीडिया खेळाडूंना ओळख मिळवून देऊ शकतो. तसाच पैसाही महत्त्वाचा आहे. मला क्रिकेट सोडायचं नव्हतं. पण कुटुंबाची परिस्थिती अशी झाली की मला खेळ सोडावा लागला. मी 25 व्या वर्षीच हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष बनलो होतो. वयाच्या 26 व्या वर्षी मी धर्मशालामध्ये क्रिकेट स्टेडियम बनवलं. त्यानंतरच राजकारणाचे दरवाजे उघडले. कदाचित तो स्टेडियम बनला नसता तर आज मी चार वेळा खासदार म्हणून निवडून आलो नसतो, असं अनुराग ठाकूर म्हणाले.

WITT 2024 : ऑलिम्पिकमध्ये भारताची जादू चालणार; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना विश्वास
union Minister Anurag Thakur Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 25, 2024 | 5:59 PM

नवी दिल्ली | 25 फेब्रुवारी 2024 : देशाच्या राजधानीत व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समीट सुरू झाली आहे. देशातील या सर्वात मोठ्या महाइव्हेंटमध्ये देशातीलच नव्हे तर जगातील दिग्गज सामील झाले आहेत. यावेळी गियरिंग अप फॉर स्पोर्ट्स असेन्डन्सी या परिसंवादात केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी भाग घेतला. यावेळी अनुराग ठाकूर यांनी देशातील स्पोर्ट्स रिव्होल्यूशनवर चर्चा केली. क्रिकेटच नव्हे तर इतर खेळांनाही केंद्र सरकार कशी मदत करत आहे आणि त्यामुळे खेळाडूंनी देशाचं नाव कसं उंचावलं आहे, याची माहिती देताना खासगी क्रीडा संस्थांनाही केंद्राकडून मदत दिली जात असल्याचं अनुराग ठाकूर यांनी सांगितलं.

1983मध्ये क्रिकेटमध्ये एवढा पैसा नव्हता. बीसीसीआयकडेही एवढा पैसा नव्हता. पण प्रसार भारती आणि ब्रॉडकास्टिंगची केस बोर्डाने जिंकली, त्यानंतर क्रिकेटमध्ये पैसा आला. आज आपले क्रिकेटपटू जगातील स्टार बनले आहेत. त्यामुळेच आता क्रिकेटशिवाय इतर खेळातही आपले खेळाडू नाव कमावत आहेत. देशाचा गौरव वाढवत आहेत, असं अनुराग ठाकूर म्हणाले.

सरकारच्या स्किमने फायदा

खेलो इंडियासहीत अनेक योजना सरकारने सुरू केल्या आहेत. सरकार खेळाडूंसाठी सर्व सुविधा देत आहे. दुसरीकडे खेळाडूही त्याचा रिझल्ट देत आहेत. भारताने आशिया गेम्समध्ये 100 मेडल्स जिंकले हे पहिल्यांदाच झालं आहे. आज भारत आपलं कर्म करत आहे आणि त्याची फळे आपोआप मिळत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

पूर्वी खेळाडूंना अनेक अडचणींना सामना करावा लागत होता. पण आज खेलो इंडिया आणि टॉप्स स्कीममुळे खेळाडूंचा सर्व खर्च सरकार उचलत आहे. एवढेच नव्हे तर सहा लाख रुपये वेगळे दिले जात आहेत. आमच्या सरकारने एक हजाराहून अधिक स्पोर्ट्स सेंटर बनवले आहेत. ही केवळ सुरुवात आहे. राज्य सरकारांकडून आम्हाला मदत मिळाली तर आम्ही अजून मोठी झेप घेऊ शकतो, असंही त्यांनी सांगितलं.

मीडियाचा रोल महत्त्वाचा : बरूण दास

यावेळी टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरूण दास यांनी या सेशनमध्ये भूमिका मांडली. मीडिया सुद्धा क्रीडा जगतातील सुपरपॉवर होण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो. सर्वात आधी लोकांच्या माइंडसेटला बदलण्यात येत आहे. लोकांमध्ये विजयाची भावना निर्माण केली जात आहे. आपल्यासमोर गोपीचंद पुलेला यांचं उदाहरण आहे. पुलेला यांनी स्वत: इतिहास रचला आणि त्यानंतर त्यांनी नव्या पिढीला सपोर्ट केला, असं बरुण दास यांनी सांगितलं.

ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवू

गेल्या ऑलिम्पिकवेळी कोरोनाच्या काळात आपण खेळाडू तयार केले. यापूर्वीही आपण खेळाडूंना विदेशात ट्रेनिंग दिलं. मीराबाई चानू दुखापतग्रस्त झाल्या होत्या. त्यांचा उपचार अमेरिकेत करण्यात आला. त्यानंतर त्यांनी मेडलही जिंकलं होतं. केवळ टोक्यो ऑलिम्पिकमध्येच नाही तर पॅरा ऑलिम्पिकमध्येही आपल्या खेळाडूंनी इतिहास रचला आहे. यावेळीही आपण ऑलिम्पिकमध्ये विश्वास घडवू, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.