Sir Creek Dispute : साप, विंचू, दलदलीचा प्रदेश असलेल्या सर क्रीकसाठी भारताने पाकिस्तानला इतिहास-भूगोल बदलण्याची धमकी का दिली?
Sir Creek Dispute : सर क्रीक हा गुजरातचं कच्छ क्षेत्र आणि पाकिस्तानच्या सिंध प्रांतात पसरलेला 96 किलोमीटरचा भाग आहे. यात दलदल, चिखलाने भरलेला भाग आहे. ही जागा पहायला निर्जन आणि दलदलीची वाटते. पण त्याचं महत्व जमिनीच्या तुकड्यापेक्षा जास्त आहे.

भारत-पाकिस्तान संबंधात अनेक चॅलेंजेस आहेत. दोन्ही देशांमध्ये जे वादाचे मुद्दे आहेत, त्यामध्ये सुद्धा तितकाच पेच आहे. सर क्रीकचा मुद्दा अशाच वादांपैकी एक आहे. हा पेच सोडवणं खूप आव्हानात्मक आहे. अलीकडेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सर क्रीकच्या मु्द्यावरुन पाकिस्तानला कठोर संदेश दिला आहे. सर क्रीकमध्ये पाकिस्तानने कुठलही दुस्साहस केलं, तर भारताची प्रतिक्रिया इतकी कठोर असेल की, पाकिस्तानचा इतिहास-भूगोल दोन्ही बदलून जाईल. हा इशारा केवळ राजकीय वक्तव्य नाही, तर त्यातून या वादाची गंभीरता समोर येते. सर क्रीक हा गुजरातचं कच्छ क्षेत्र आणि पाकिस्तानच्या सिंध प्रांतात पसरलेला 96 किलोमीटरचा भाग आहे. यात दलदल, चिखलाने भरलेला...
