AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात साक्षर शहरात मुंबई, पुणे यांचा नंबर कितवा, कोणतं आहे देशात सर्वात जास्त साक्षर शहर

शिक्षणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. स्वातंत्र्यापूर्वी भारतात प्रत्येक वर्गाला शिक्षणाची संधी मिळत नव्हती. आता आपल्याला शिक्षणाची दारे उघडी झाली आहेत. देशातील कोणते शहर सर्वाधिक सुशिक्षित आहे, ते पाहूया..

देशात साक्षर शहरात मुंबई, पुणे यांचा नंबर कितवा, कोणतं आहे देशात सर्वात जास्त साक्षर शहर
csmtImage Credit source: socialmedia
| Updated on: Feb 10, 2023 | 4:02 PM
Share

मुंबई : कोणत्याही शहरातील लोकसंख्या किती उच्च शिक्षित आहे, त्यावर त्या शहराची आणि देशाची प्रगती होत असते. कोणत्याही शहराच्या शैक्षणिक उत्कृष्टतेचे मोजमाप हे त्या शहरात शिक्षणाच्या किती सुविधा आहेत त्यावर ते अवलंबून असते. गेल्या 2-3 दशकांमध्ये, भारतातील आयटी अभियंते आणि मॅनेजमेंंटच्या विद्यार्थ्यांनी जगभरातील उद्योगांना कसे काबीज केले ते आपण पाहत आहोत. भारतीय अनेक मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सीईओ बनत आहेत. भारतीय वंशाचे लोकही आता अनेक देशांत मंत्री आणि पंतप्रधान बनत आहेत. आपल्या देशातील रहाणीमान सुधारत असल्याने अधिकाधिक लोक शिकत आहेत. तर आपल्या देशातील टॉप – 10 सुशिक्षित शहरांची नावे आणि क्रमांक पाहूया

ही आहे देशातील टॉप टेन सुशिक्षित शहरांची यादी…

1 ) बंगळुरू, कर्नाटक : स्वातंत्र्यानंतर सर्वच क्षेत्रात कर्नाटक राज्यातील बंगळुरू शहराने अचाट कामगिरी केली आहे. कारण येथील शिक्षणाचा दर्जा देशात सर्वात चांगला आहे. बंगळूरू येथे अनेक प्रतिष्ठीत शिक्षण संस्था आहेत.

2) पुणे, महाराष्ट्र : पुणे शहराला विद्येचे माहेर म्हटले जाते. कारण पुण्यात असलेल्या शैक्षणिक संस्था. पुणे शहराला पुर्वेकडील ऑक्सफर्ड मानले जाते. लॉ आणि मॅनेजमेंटच्या शिक्षणासाठी पुण्याला बेस्ट मानले जाते.

3 ) हैदराबाद, तेलंगणा : आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्था , जवाहरलाल नेहरु औद्योगिक विश्व विद्यालय, विधी विश्व विद्यालय अशा नावाजलेल्या शिक्षण संस्था येथे असल्याने ते सुशिक्षित असणे क्रमप्राप्तच आहे. त्यामुळे हैदराबादचा सुशिक्षितांमध्ये क्रमांक तिसरा आहे.

4) मुंबई , महाराष्ट्र : मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असेही मुंबईला म्हटले जात आहे. मुंबई जगभरातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे प्रमुख केंद्र आहे. नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ फॅशन एंड टेक्नोलॉजी, टाटा इन्स्टीट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि अन्य संस्था येते आहेत. ज्या तरूणांची पहिली पसंत आहेत. मुंबईत खाजगी, सार्वजनिक आणि आंतरराष्ट्रीय कॉलेजांची की एक साखळी आहे. त्यामुळे येथे शिक्षणाचे प्रमाण जास्त आहे.

5 ) दिल्ली, एसीटी : दिल्ली देशाची राजधानी असून येथील दिल्ली जागतिक विद्यापीठ, जवाहर लाल नेहरू जागतिक विद्यापीठ, जामिया मिलिया इस्लामिया, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय आदी संस्था विद्यार्थ्यांना आर्कषित करत असतात. दिल्लीच्या एनसीटी सरकारच्या डॉ.बी.आर. आंबेडकर जागतिक विद्यापीठ, दिल्ली तांत्रिक जागतिक विद्यापीठ, इंदिरा गांधी दिल्ली तांत्रिक जागतिक विद्यापीठ असे शिक्षणासाठी अनेक पर्याय आहेत. दिल्लीत एम्स आहे तर आयआयटी दिल्ली सारख्या प्रतिष्ठीत संस्था आहेत.

6 ) चेन्नई, तामिळनाडू : आयआयटी मद्रास सारख्या प्रतिष्ठीत संस्था आहेत, चेन्नईच शहरात अनेक संशोधन संस्था आहेत त्यात मद्रास विद्यापीठ, अण्णा युनिव्हर्सिटी इ. ज्यामुळे हे शहर शैक्षणिक समुदायामध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून, हे शहर विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आकर्षित करते.

7 ) कोलकाता, पश्चिम बंगाल: कोलकाता हे ऐतिहासिकदृष्ट्या देशातील एक महत्वाचे शिक्षणाचे केंद्र राहिले आहे. जादवपूर विद्यापीठ, कलकत्ता विद्यापीठ, प्रेसिडेन्सी कॉलेज आणि इतर अनेक प्रतिष्ठित संस्था उमेदवारांना आकर्षित करतात.

8) अहमदाबाद, गुजरात : अहमदाबाद हे एक शैक्षणिक शहर आहे येते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, निरमा युनिव्हर्सिटी, गुजरात युनिव्हर्सिटी, विश्वकर्मा इंजिनीअरिंग कॉलेज आणि इतर अनेक उत्कृष्ट संस्था आहेत. नवीन पिढीच्या विद्यार्थ्यांच्या वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण करणारी उच्च श्रेणीची सार्वजनिक आणि खाजगी महाविद्यालये या शहरात आहेत.

9) जयपूर, राजस्थान : देशातील गुलाबी शहर शिक्षणासाठी सर्वात प्रसिद्ध केंद्रांपैकी एक आहे. बनस्थली विद्यापीठ, इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटरिंग टेक्नॉलॉजी आणि अप्लाइड न्यूट्रिशन आदी संस्था येथे आहेत.

10)  सुरत, गुजरात : सुरत येते शैक्षणिक संस्था तयार होत आहेत. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाईन, सरदार वल्लभभाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वीर समद दक्षिण गुजरात युनिव्हर्सिटी इत्यादीसारख्या सुरतमधील अनेक खाजगी आणि सार्वजनिक संस्था शिक्षण योजनांसाठी एक स्मार्ट पर्याय बनवतात.

कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?.
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!.
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी.
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!.
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.