AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील मोठ्या पदावर SC-ST चे किती उमेदवार? आरक्षण संपवण्याचा डाव? धक्कादायक आकडेवारीसह बड्या नेत्याचा काय दावा?

Tejashwi Yadav on SC-ST Reservation: देशातील प्रत्येक राज्यात आरक्षणावरून वादळ उठलं आहे. राज्यात मराठा-ओबीसी आरक्षणाचा वाद पेटला आहे. त्याचवेळी देशातील मोठ्या पदावर एससी, एसटी प्रवर्गातील किती उमेदवार आहेत? यावरून या बड्या नेत्याने मोठा दावा केला आहे. देशात आरक्षण संपवण्याचा डाव सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

देशातील मोठ्या पदावर SC-ST चे किती उमेदवार? आरक्षण संपवण्याचा डाव? धक्कादायक आकडेवारीसह बड्या नेत्याचा काय दावा?
देशातील मोठ्या पदावर SC-ST चे किती उमेदवार?Image Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 02, 2026 | 8:04 AM
Share

भारतातील अनेक राज्यात जातीय आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. आरक्षण धोरणात बदल करण्याची सातत्याने मागणी होत आहे. अनेक जातींना ओबीसीमध्ये दाखल व्हायचे आहे. काहींची मागणी रास्त आहे, काही जातींचे मागासलेपण आता समोर येत आहे. पण आरक्षणाच्या या वादळादरम्यान राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांनी मोठे वक्तव्य केले आहे. तेजस्वी यादव यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा धरला आहे. त्यांनी काही आकडेवारी समोर करत देशात आरक्षण संपवण्याचा डाव खेळला जात असल्याचा आरोप केला. देशातील अनेक मोठ्या पदावर SC-ST-OBC प्रवर्गातील उमेदवारच नसल्याचा दावा त्यांनी केला. SC-ST-OBC या प्रवर्गातील 10 उमेदवार सुद्धा नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांनी एकच खळबळ उडाली आहे.

SC-ST-OBC वरून सरकारवर निशाणा

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी केंद्र सरकारवर निशाणा सादला आहे. देशभरातील विद्यापीठांमध्ये SC-ST-OBC प्रवर्गातील एकूण 10 कुलगुरू नाहीत. केंद्र सरकारमध्ये या समुदायातील 10 सचिव सुद्धा नाही. तर न्यायपालिकेचा उल्लेख करत मागासवर्गीय आणि एससी, एसटी प्रवर्गातील त्या त्या हायकोर्टात 10 सुद्धा न्यायाधीश नसल्याचा दावा यादव यांनी केला आहे.

रामदास आठवले, चिराग पासवान, मांझी आणि कुशवाहा यांच्यावर निशाणा

आरक्षणाच्या मुद्दावर बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील NDA सरकारवर जोरदार निशाणा साधला. तेजस्वी यादव म्हणाले की, आरक्षणाच्या मुद्यावरून एनडीएतील एक नेते त्यांच्या पक्षात आले. तर एक विरोधात गेला. राजकारणात आता लोक भूमिका घेत असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. RJD नेत्याने दावा केला की, भाजपला ना आरक्षण हवंय ना संविधान. त्यांनी चिराग पासवान, नितीश कुमार, जीतनराम मांझी असो वा उपेंद्र कुशवाहा यांच्यासह अनुप्रिया पटेल, ओम प्रकाश राजभर, संजय निषाद, रामदास आठवले यांच्यावर निशाणा साधला. यातील अनेक जण आरक्षणाचा फायदा घेत आहे. तर यामधील काही जण आरक्षण संपवायला निघालेल्या पार्टीचे समर्थक असल्याचा निशाणा त्यांनी साधला. आरक्षण, संविधानाशी त्यांना काहीऐक देणे घेणे नाही, त्यांना केवळ खुर्ची प्रिय असल्याचा निशाण यादव यांनी साधला.

Follow Us
नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल
Sanjay Raut | नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल; पुढे म्हणाले, देशाचे कॅबिनेट...
श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले
Sanjay Gaikwad | श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले...
रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची...
Maratha Reservation | रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची महत्त्वाची बैठक; फडणवीसांसह...
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...