AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तान हादरला; ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये कोणती शक्तिशाली शस्त्रे वापरली? 25 मिनिटांत 21 ठिकाणे उडवली

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताने चोख उत्तर दिलं आहे. भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर लक्ष्य करत थेट ती ठिकाणंच उडवून दिली. या कारवाईत भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाने मिळून 25 मिनिटांत 21 ठिकाणी हल्ले केलेत. पण या हल्ल्यात भारताने नेमकी कोणती शस्त्रे वापरली माहितीयेत? जाणून भारताच्या शक्तीची कल्पना नक्कीच येईल

पाकिस्तान हादरला; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोणती शक्तिशाली शस्त्रे वापरली? 25 मिनिटांत 21 ठिकाणे उडवली
What weapons did India use in Operation Sindoor?Image Credit source: TV9 Malayalam
| Updated on: May 07, 2025 | 5:35 PM
Share

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा भारताने अखेर बदला घेतला आहे. भारताने पाकिस्तानला असा धडा शिकवला आहे की तो तो वर्षानुवर्षे लक्षात ठेवेल. शूर भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील 9 ठिकाणी हल्ला केला आहे आणि 100 हून अधिक दहशतवाद्यांना ठार मारले आहे. या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे. या हल्ल्यात भारताने अशी शस्त्रे वापरली की अक्षरश: पाकिस्तानचे तुकडे तुकडे झाले.

या हल्ल्यांमध्ये भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या तिन्ही सेवांच्या अचूक स्ट्राइक शस्त्र प्रणालींचा वापर करण्यात आला, ज्यामध्ये लोटेरिंग शस्त्रांचा समावेश होता. गुप्तचर संस्थांनी पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी छावण्यांवर हल्ल्यांबद्दल माहिती दिली होती. हे हल्ले भारतीय भूमीवरून करण्यात आले. त्यामुळे पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारताने नेमके कोणते शस्त्र वापरली याबद्दल नक्कीच सर्वांना जाणून घेण्यासाठी उत्सुकता आहे.

हल्ल्यात या क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला होता.

भारताने पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी स्कॅल्प क्षेपणास्त्राचा उपयोग करण्यात आला होता. हे क्षेपणास्त्र राफेल विमानातून सोडण्यात आले. स्कॅल्प क्षेपणास्त्राचा वेग मॅक पॉइंट 8 आहे. ते 560 ते 600 किलोमीटरपर्यंत मारा करण्यास सक्षम आहे. हे शत्रूच्या रडारला चकमा देण्यास सक्षम आहे. स्कॅल्प क्षेपणास्त्र ‘किल वेब’ धोरणाचा एक भाग आहे. भारताकडे 300 हून अधिक स्कॅल्प क्षेपणास्त्रे आहेत.

तसेच या हल्ल्यात भारताने स्टँड-ऑफ शस्त्रे, ड्रोन आणि दारूगोळा तसेच इतर शस्त्रे वापरली असल्याचेही समजते.

25 मिनिटांत 21 ठिकाणी हल्ला

लष्कराच्या म्हणण्यानुसार, भारताने मध्यरात्री 1 वाजून 5 मिनीटांनी हा हल्ला केला. मध्यरात्री सुरु असेला हा हल्ला 1.30 वाजेपर्यंत सुरुच होता. या 25 मिनिटांत पाकिस्तानात 21 ठिकाणी हल्ले करण्यात आले. दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं. या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. भारताच्या या स्ट्राइकमध्ये दहशतवादी मसूद अझहरचे कुटुंबही नष्ट झाले. त्याच्या कुटुंबातील 10 सदस्यांचा मृत्यू झाला आहे.

पहलगाम हल्ल्याचा बदला

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दोन आठवड्यांनंतर भारताने ही कारवाई केली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, पहलगाम येथील क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने ही पावले उचलली आहेत. या कारवाईनंतर लगेचच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक्स वर भारत माता की जय असे पोस्ट केले.

धर्म आणि नाव विचारल्यानंतर पर्यटकांना मारण्यात आलं होतं 

पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये लोकांना त्यांची नावे आणि धर्म विचारून गोळ्या घातल्या होत्या. ज्या लोकांवर गोळीबार झाला ते पर्यटक होते. या हल्ल्यात विशेषतः पुरूषांना लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यानंतर भारतात संतापाचे वातावरण होते. पाकिस्तानवर कारवाईची मागणी करण्यात आली. पंतप्रधान मोदींनी 23 एप्रिल रोजी याची सुरुवात केली होती. त्यांनी सिंधू पाणी करार रद्द केला. याशिवाय राजनैतिक संबंध तोडण्यात आले. एवढेच नाही तर त्यांनी पाकिस्तानसोबतचा व्यापारही थांबवला.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.