Knowledge News : जगातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? 99 टक्के लोकांना नाही माहीत, जो आहे महाराष्ट्रापेक्षाही मोठा
तुम्हाला माहीत आहे का? जगातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तो? या जिल्ह्याचं क्षेत्रफळ हे महाराष्ट्रापेक्षा अधिक असून, लोकसंख्या देखील मोठी आहे.

तुम्हाला माहीत आहे का? जगातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? याचं उत्तर तुम्हाला नक्कीच माहीत नसणार, कारण या प्रश्नावर एआयचा देखील गोंधळ उडाला आहे, अनेक लोकांनी यावर उत्तर देताना म्हटलं आहे की, सर्वात मोठा जिल्हा हा रशियामध्ये आहे, मात्र ज्या लोकांनी सर्वात मोठा जिल्हा हा रशियामध्ये आहे, असा दावा केला आहे, तो चुकीचा आहे, कारण रशियामध्ये ज्या बद्दल सर्वात मोठा जिल्हा म्हणून दावा करण्यात येतो, तो जिल्हा नसून ते एक राज्य आहे. जगातील सर्वात मोठा जिल्हा हा चीनमध्ये आहे. छेतान असं या जिल्ह्याचं नाव आहे, काही ठिकाणी याचा उल्लेख खोतान असा देखील केला जातो. या जिल्ह्याचं क्षेत्रफळ हे महाराष्ट्रापेक्षाही मोठं आहे.
जगातील हा सर्वात मोठा जिल्हा चीनच्या शिनजियांग प्रांतामध्ये आहे. या जिल्ह्याचं क्षेत्रफळ जवळपास 67,870 वर्ग किलोमीटर आहे, या जिल्ह्याचं क्षेत्रफळ हे महाराष्ट्रापेक्षाही जास्त आहे. तसेच हा जिल्हा यूनायटेड किंगडमपेक्षाही जास्त मोठा आहे. चीनमध्ये जिल्ह्यांना काउंटी असं म्हटलं जातं. चीनमध्ये जवळपास 1,300 ते 1,400 काउंटी अर्थात जिल्हे आहेत, याची संख्या वेळोवेळी कमी -अधिक होत असते, तर चीनमध्ये प्रातांला किंवा राज्याला प्रोविंस असं म्हटलं जातं, त्यानंतर विभाग स्तर येतो इथे विभाग स्तराला प्रीफेक्टर असं म्हटलं जातं, तिसरा क्रमांक हा काउंटी अर्थात जिल्ह्याचा येतो, मग शहर गाव असा क्रमांक लागतो.
चीनमध्ये प्रत्येक काउंटीला एक काउंटीप्रमुख असतो, जसा भारतामध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हाधिकारी असतो, तोच दर्जा चीनमध्ये काउंटीप्रमुखाचा असतो. काउंटीचे सर्व अधिकार या अधिकाऱ्याकडे असतता. जिल्ह्यातील सर्व प्रमुख निर्णय हा अधिकारीच घेतो, तसेच याच्या समकक्ष आणखी एक अधिकारी देखील काउंटीमध्ये असतो, सर्व प्रमुख प्रशासकीय कामांची जबाबदारी ही या दोन अधिकाऱ्यांवर असतो. हे अधिकारी जिल्हा स्थरावर कोणतेही निर्णय घेवू शकतात. अर्थात त्यावर त्यांच्यापेक्षा वरच्या यंत्रणांचं नियंत्रण हे असंतच.
