AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वातंत्र्याआधी आणि नंतर झालेली आतापर्यंतची सर्वात मोठी जनआंदोलने कोणती ?

कोणतेही आंदोलन आपल्या लोकशाहीसाठी पोषकच असते. देशाला स्वतंत्र करण्यासाठी आपल्याला 1857 चा स्वातंत्र्य लढ्यापासून ते थेट 1947 पर्यंत मोठा काळखंड पाहावा लागेल. जेव्हा आपण पारतंत्र्यातून मुक्त झालो तेव्हा देखील आंदोलने झाली ती कोणती हे पाहूयात.

स्वातंत्र्याआधी आणि नंतर झालेली आतापर्यंतची सर्वात मोठी जनआंदोलने कोणती ?
chipko andolan
| Edited By: | Updated on: Aug 14, 2024 | 3:30 PM
Share

भारताचा स्वातंत्र्य दिन आपण दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी साजरा करीत असतो. ब्रिटीशांना व्यापारासाठी भारतात प्रवेश मिळवितनंतर प्लासीच्या लढाईनंतर देशाचा ताबा घेतला. यास 1857 मध्ये क्रांतिकारकांनी संघटीत विरोध केला परंतू त्याला यश आले नाही.त्यानंतर स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. स्वातंत्र्याआधी आणि स्वातंत्र्य मिळाल्या नंतर देशात कोणती मोठी आंदोलने झाली होती हे आपण पाहूयात…

1. 1857 चा सशस्र उठाव –

स्वातंत्र्याचे पहिले समर म्हणून 1857 च्या उठावाकडे पाहिले जाते. दोन वर्षे भारताच्या विविध भागात ब्रिटीशांविरोधात सशस्र उठाव झाला होता. तात्या टोपे, झाशीची राणी यांचे या लढ्यात मोठे योगदान होते.

2. असहकार आंदोलन –

साल 1929 पर्यंत ब्रिटीश आपल्या देशातून जाण्याची शक्यता धूसर होत चालली होती. त्यामुळे महात्मा गांधी आणि भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरु झाले. सप्टेंबर 1920 ते फेब्रुवारी 1922 पर्यंत हे आंदोलन चालले. जालियनवाला बाग हत्याकांडानंतर ब्रिटीश सरकारविरोधातला संताप वाढल्याने हे आंदोलन सुरु झाले.

3. संपूर्ण स्वराज्याची मागणी –

सन 1929 लाहोर मध्ये रावी नदीच्या किनारी कॉंग्रेसच्या अधिवेशनात ब्रिटीश सरकारकडे पहिल्यांदा संपूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली. त्यावेळी ब्रिटीशांना मोठा झटका बसला.

मिठाचा सत्याग्रह म्हणून ओळखला जाणारा  दांडी मार्च  महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली साबरमती आश्रमापासून दांडी गावापर्यंत झाला.

4. दांडी सत्याग्रह –

12 मार्च 1930 रोजी गुजरातच्या साबरमती आश्रमातून दांडी गावापर्यंत महात्मा गांधींनी 24 दिवसाची पदयात्रा काढली यालाच मिठाचा सत्याग्रह म्हणतात. मिठावरील करामुळे हे आंदोलन सुरु झाले. ब्रिटीशांचा मिठावरील एकाधिकार नाकारण्यात आला.

5. भारत छोडो आंदोलन –

8 ऑगस्ट 1942 रोजी सायंकाळी मुंबईतील गवालिया टॅंक येथे महात्मा गांधी यांनी इंग्रजांना शेवटचा इशारा देत ‘भारत छोडो’चा नारा दिला आणि संपूर्ण देशात ब्रिटीशांविरोधात आंदोलन सुरु झाले.

स्वातंत्र्यानंतरची जनआंदोलने

1. सेव्ह सायलेंट व्हॅली आंदोलन –

सेव्ह सायलेंट व्हॅली आंदोलन हे स्वतंत्र भारताचे पहिले मोठे आंदोलन होते. केरळातील वर्षा वने वाचविण्यासाठी हे आंदोलन झाले.येथे जलविद्युत प्रकल्पाला झालेला प्रचंड विरोध पाहून इंदिरा गांधी यांनी 1984 या क्षेत्राला नॅशनल पार्कचा दर्जा दिला.

2.चिपको आंदोलन –

वृक्षांना वाचविण्यासाठी लोक झाडांना मिठ्या मारुन उभे राहीले यास चिपको आंदोलन म्हणतात. उत्तराखंडातील अलकनंदा खोऱ्यातील मंडल गावातून  गौरादेवीने 1973 मध्ये या आंदोलनाला सुरुवात केली होती. हिमालयाच्या पर्वत रांगात कंत्राटदार झाड कापण्यास आला की लोक झाडाला मिठी मारुन उभे रहात. याला भारतातील सर्वात मोठे पर्यावरणवादी आंदोलन म्हटले जाते. सुंदरलाल बहुगुणा यांनी हे आंदोलन व्यापक केले.

3.जेपी आंदोलन –

जयप्रकाश नारायण यांनी बिहारमधून या आंदोलनास सुरुवात केली. 1974 मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन बिहारच्या मुख्यमंत्र्यांना हटविण्यासाठी सुरु झालेल्या या आंदोलनात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. नंतर इंदिरा गांधी यांनी आंदोलन दडपण्यासाठी इमर्जन्सी लागू केली. इंदिरा गांधी यांचे सरकार या आंदोलनात वाहून गेले.

4.नर्मदा बचाओ आंदोलन –

1985 साली मेधा पाटकर यांनी नर्मदा धरण प्रकल्पापासून मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील आदिवासींच्या जमीनी वाचविण्यासाठी हे आंदोलन सुरु केले होते.

5. अण्णा हजारे यांचे आंदोलन –

भारतात उदारीकरणाचे फळे मिळाल्यानंतर कॉंग्रेस सरकारच्या भ्रष्ट्राचाराविरोधात दिल्लीच्या जंतरमंतरवर हे आंदोलन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी हे आंदोलन केल्याने अरविंद केजरीवाल यांचे नेतृत्व जन्माला आले. आणि केंद्रात भाजपाचे सरकार आले.

'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.