Operation Sindoor: कोण आहेत कर्नल सोफिया कुरेशी? ज्यांनी जगासमोर पाकिस्तानची केली पोलखोल
Colonel Sophia Qureshi: पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचे दहशतवाद्यांसोबतचे संबंध पुन्हा एकदा समोर... पाकिस्तानची पोलखोल करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी कोण आहेत? घ्या जाणून

Colonel Sophia Qureshi: लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी पाकिस्तानी दहशतवादी छावण्यांवर भारतीय हवाई हल्ल्याच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी होत्या. सोफिया कुरेशी या गुजरात येथे राहणाऱ्या आहेत. त्यांचा जन्म 1981 मध्ये गुजरातमधील वडोदरा येथे झाला. त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पोस्ट ग्रेज्युएशन केलं आहे. रिपोर्टनुसार, सोफिया यांचे आजोबा देखील भारतीय सैन्यात होते. तर त्यांच्या वडिलांनी काही वर्ष भारतीय सैन्यात धार्मिक शिक्षक म्हणून काम केलं आहे. अन्य एका रिपोर्टनुसार, सोफिया यांचं लग्न मेकॅनाइज्ड इन्फंट्रीचे आर्मी ऑफिसर मेजर ताजुद्दीन कुरेशी यांच्याशी झालं आहे. त्यांच्या मुलाचं नाव समीर कुरेशी असं आहे.
1999 मध्ये झालं सिलेक्शन
सोफिया कुरेशी यांची 1999 मध्ये भारतीय सैन्य दलात एन्ट्री झाली. त्यांनी 1999 मध्ये त्यांनी चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमधून प्रशिक्षण घेतलं आहे. यानंतर, सोफिया यांना सैन्यात लेफ्टनंट म्हणून कमिशन मिळालं. 2006 मध्ये, सोफिया यांनी काँगोमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत लष्करी निरीक्षक म्हणून काम केले. 2010 पासून त्या शांतता मोहिमांमध्ये सहभागी आहेत.
हे सुद्धा वाचा : भारताने पाकिस्तानाला दाखवली लायकी… सिंधूपासून सिंदूरपर्यंत…, पहलगाम हल्ल्यानंतर भारताचे महत्त्वाचे 15 निर्णय, पाकिस्तानचा थरकाप उडाला
सोफिया कुरेशी यांना ऑफिसर कमांडिंग-इन-चीफकडून प्रशंसा पत्र देखील मिळालं आहे. उत्तर – पूर्व भारतातील पूर मदत कार्यादरम्यान त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना सिग्नल ऑफिसर इन चीफ प्रशंसा पत्र देखील देण्यात आलं. त्यांना फोर्स कमांडरकडून प्रशंसापत्रही मिळालं आहे.
सांगायचं झालं तर, लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी चर्चेत आल्या जेव्हा त्यांनी एका बहुराष्ट्रीय लष्करी सरावात भारतीय संघाचे नेतृत्व केलं. तेव्हा अशी कामगिरी करणाऱ्या सोफिया एकमेव महिला अधिकारी होत्या. या सरावाला ‘एक्सरसाइज फोर्स 18’ असं नाव देण्यात आलं. त्यावेळी भारताने आयोजित केलेला हा सर्वात मोठा परदेशी लष्करी सराव होता.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या सरावात सहभागी झालेल्या 18 तुकड्यांमध्ये लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी या एकमेव महिला अधिकारी होत्या. भारतीय संघात एकूण 40 सदस्य होते. त्यावेळी त्या भारतीय सैन्याच्या सिग्नल कोरमध्ये अधिकारी होत्या.
