AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण आहेत एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन? असा आहे राजकीय प्रवास

एनडीएकडून सीपी राधाकृष्णन यांच्या नावाची उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाली आहे. सीपी राधाकृष्णन कोण आहेत ते जाणून घेऊयात.

कोण आहेत एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन? असा आहे राजकीय प्रवास
cp-radhakrishnan
| Updated on: Aug 17, 2025 | 9:58 PM
Share

जयदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपतीपद रिकामे झाले आहे. यासाठी लवकरच निवडणूक होणार आहे. अशातच आता एनडीएकडून सीपी राधाकृष्णन यांच्या नावाची उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाली आहे. आज झालेल्या एनडीएच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या बैठकीला हजर होते. बैठकीनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी याबाबत घोषणा केली. सीपी राधाकृष्णन कोण आहेत ते जाणून घेऊयात.

सीपी राधाकृष्णन हे तामिळनाडूतील भाजपचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांचे पूर्ण नाव चंद्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन आहे. राधाकृष्णन यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1957 रोजी तामिळनाडूतील तिरुपूर येथे झाला. त्यांनी कोइम्बतूर येथील चिदंबरम कॉलेजमधून बीबीए केले आहे. राधाकृष्णन 1973 मध्ये वयाच्या 1 व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाले. कालांतराने ते जनसंघात सामील झाले आणि सक्रिय राजकारणात आले. ते सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत.

दक्षिण भारतातील भाजपचे महत्वाचे नेते

सीपी राधाकृष्णन हे दक्षिण भारतातील भाजपच्या महत्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत. ते भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्यही आहेत. ते केरळचे प्रभारी देखील होते. 2016 ते 201 पर्यंत ते अखिल भारतीय कॉयर बोर्डाचे अध्यक्ष होते. 2004, 2012 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते कोइम्बतूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार होते. त्यांचा राजकीय प्रवास खालीलप्रमाणे…

राज्यपाल

  • महाराष्ट्र- 31 जुलै 2024 पासून आतापर्यंत
  • झारखंड – 18 फेब्रुवारी 223 ते 30 जुलै 2024 पर्यंत
  • तेलंगणा – मार्च ते जुलै 202 पर्यंत अतिरिक्त कार्यभार.
  • पुदुच्चेरी- मार्च ते ऑगस्ट 2024 पर्यंत उपराज्यपाल (अतिरिक्त कार्यभार).

खासदार

  • 1998 आणि 1999 मध्ये कोइम्बतूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले.

उल्लेखनीय काम

  • 2004-2007 या काळात तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष असताना राधाकृष्णन यांनी 93 दिवसांची रथयात्रा काढली होती, याचा उद्देश नद्या जोडणे हा होता.
  • दहशतवादाला विरोध.
  • अस्पृश्यतेचे निर्मूलन.
  • संसदेत वस्त्रोद्योगावरील स्थायी समितीचे अध्यक्ष होते.
  • आर्थिक आणि सार्वजनिक उपक्रमांशी संबंधित अनेक समित्यांमध्ये काम केले आहे.

दरम्यान, सी.पी. राधाकृष्णन हे दक्षिण भारतातील भाजपचे प्रमुख नेते आहे. तामिळनाडू, केरळ आणि इतर दक्षिणेकडील राज्यांमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. आता ते उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनले आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.