कोण आहे शमा परवीन, गुजरात ATS ने पकडले, अल-कायदाशी काय कनेक्शन ?
गुजरात एटीएसने अल-कायदाशी संबंधित एका मोठ्या मॉड्युलचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात एका महिला आरोपीसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

गुजरात एटीएसने अल-कायदा इन दि इंडियन सबकॉन्टीनेंट (AQIS) मोठी अतिरेकी मॉड्युलचा पर्दाफाश केला आहे. एटीएसने शमा परवीन सह ५ आरोपींना अटक केली आहे. हे सोशल मीडियाद्वारे कट्टरपंथी विचारधारेचा प्रचार करत होते. ‘गज्वा-ए-हिंद’ चा कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या आरोपींकडून कागदपत्रं आणि डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. बंगळुरुहून एटीएसने अटक केलेली शमा परवीन ही या मॉड्युलची मास्टरमाईंड म्हटली जात आहे.
एटीएसने या प्रकरणात खूप काळापासून तपास करीत होती. टीमच्या वतीने या संदर्भात अनेक ठिकाणी छापे टाकले होते. तर २३ जुलै रोजी अलकायद्याशी संबंधित चार अतिरेक्यांना अटक केले होते. जेव्हा यांची चौकशी केली गेली तेव्हा सर्वांनी शमा परवीन हीचे नाव सांगितले.
एक आठवड्याच्या सखोल तपासानंतर अखेर एटीएसने बंगलुरुहून शमा परवीन ही अटक करण्यात आले आहे. त्याच्याकडून अनेक कागदपत्रे, मॅप,मोबाईल नंबर्स, लोकेशनची माहिती मिळाली आहे. पाकिस्तानी लोकांशी तिचा थेट संपर्क आहे. गुजरातच्या गृहमंत्रीच्या मते ही महिला खूपच सक्रीय आहे.
कोण आहे शमा परवीन ?
गुजरात एटीएसने दिलेल्या माहितीनुसार शमा परवीन ३० वर्षांची असून बंगलुरु येथील रहाणारी आहे. तपासात असे पुढे आले आहे की गेल्या अनेक महिन्यांपासून ती पाकिस्तानच्या संपर्कात होती. शमाला AQIS च्या विचारधारेचा प्रसार करण्यासाठी दिल्ली आणि उत्तर भारतची जबाबदारी सोपवली होती.
गुजरात एटीएसच्या मते शमा परवीन या संपूर्ण मॉड्युलची मुख्य सूत्रधार होती. आणि लोकांना कट्टरपंथी बनवून अतिरेकी कारवायांसाठी तयार करीत होती. शमा इंस्टाग्राम सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर असा कंटेंट शेअर करत होती. ज्यात दहशतवादाला प्रोत्साहित करणारे व्हिडीओ, भाषणे आणि पोस्टचा समावेश होतो.
गुजरात एटीएसला काय सापडले?
गुजरात एटीएसला शमा परवीनजवळ पाकिस्तानशी संबंधित दस्तावेज, मॅप, मोबाईल नंबर्स, लोकेशन आदी माहिती सापडली आहे.या प्रकरणात अटक केलेले पाचही आरोपी एकमेकांशी सोशल मीडियाद्वारे कनेक्टेड होते.हे संघटीत रित्या ऑनलाईन टेरर मॉड्यूल चालवत होते. यांचे हॅण्डलर पाकिस्तानात बसून हे मॉड्युल चालवत होते अशीही माहीती उघडकीस आली आहे.
या सर्व आरोपींवर गुजरात एटीएसने UAPA ( बेकायदेशीर गतिविधी नियंत्रण कायदा ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शमाकडून लॅपटॉप, मोबाईल, हार्ड डिस्क, AQIS संबंधित डिजिटल लिटरेचर, एन्क्रीप्टेड चॅट्स, सोशल मीडिया अकाऊंट्स आदींची डिजिटल फॉरेन्सिंक टीम तपासणी करीत आहे. त्यामुळे अन्य साथीदारांची माहीती उघडकीस येण्याची शक्यता आहे.
असे प्रकरण उघड झाले
ATSला इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म काही संदिग्ध आणि देश विरोधी कारवाया सुरु असल्याची माहीती मिळाली होती. त्यानूसार 10 जून रोजी गुजरात ATS च्या डेप्युटी SP हर्ष उपाध्याय यांनी तपास केला. त्यानंतर काही अकाऊंट्स भारतात कट्टरता पसरवत असल्याचे उघड झाले.तपासात AQIS चा प्रसार करणारे काही अकाऊंट्स सोबत काही लोक सक्रीय असल्याचे उघड झाले, त्यानंतर या चार आरोपींचे नेटवर्क समोर आले.
