दोन्हीही देश खास मित्र? युद्धात कोणाला पाठिंबा इराण की इस्रायल? भारताचा मोठा निर्णय
इराण आणि इस्रायलमध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढलं आहे. मध्य पूर्व पुन्हा एकदा युद्धाचं मैदानं बनलं आहे. या पार्श्वभूमीवर भारतानं आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

इराण आणि इस्रायलमध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढलं आहे. मध्य पूर्व पुन्हा एकदा युद्धाचं मैदानं बनलं आहे. इस्रायलच्या 200 फायटर जेट्सने इराणला उद्ध्वस्त केलं आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्यामध्ये इराणच्या आर्मी चीफसह अनेक टॉप कमांडर आणि न्यूक्लियर शास्त्रज्ञ मारले गेले आहेत. इराणने देखील इस्रायला इशारा दिला आहे, या हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी लागेल असं इराणने म्हटलं आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं तटस्थ भूमिका घेतली आहे. या युद्धाचं आम्हाला काही देणं घेणं नसल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. त्यानंतर आता भारतानं देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबत मोठं वक्तव्य करण्यात आलं आहे.
काय आहे नेमकी भारताची भूमिका?
इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबत भारतांनं चिंता व्यक्त केली आहे. इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे चिंता वाढली आहे. आम्ही प्रत्येक घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहोत. दोन्ही देशांनी आक्रमक भूमिका न घेतला, तणाव कसा कमी होईल, यावर आता लक्ष देण्याची गरज आहे. दोन्ही देश भारताचे चांगले मित्र आहेत, त्यामुळे आम्ही दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी देखील तयार आहोत असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलं आहे.
दोन्ही देशांमधील भारतीय नागरिकांना सूचना
इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे, या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाकडून युद्ध क्षेत्रात असलेल्या भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे. भारतीय नागरिकांनी काळजी घ्यावी, स्थानिक प्रशासनाने युद्धाच्या पार्श्वभूमीवर ज्या काही सूचना केल्या आहेत त्याचं पालन करावं. दोन्ही देशातील दूतावास तेथील भारतीय नागरिकांच्या संपर्कात आहे, अशी माहिती देखील परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
भारतानं आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलं आहे की, या युद्धाच्या परिस्थितीमध्ये भारत कोणत्या एका देशासोबत नाहीये, तर भारत शांततेच्या बाजुने आहे, दोन्ही देशांनी अधिक आक्रमक भूमिका न घेता तणाव कमी केला पाहिजे.तसेच भारताकडून या तणावाच्या पार्श्वभूमीवर मध्यस्थीची देखील तयारी दर्शवण्यात आली आहे.
