AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ एका कारणामुळे एअर स्ट्राईक नेहमी रात्रीच होतात; तुम्हाला माहितीये का?

असा प्रश्न निर्माण होतो की, एअर स्ट्राईक हे नेहमी रात्रीच का होतात? याबाबत तुम्हालाही उत्सुकता असेलच चला तर मग जाणून घेऊयात.

'या' एका कारणामुळे एअर स्ट्राईक नेहमी रात्रीच होतात; तुम्हाला माहितीये का?
| Updated on: May 09, 2025 | 4:35 PM
Share

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये 25 भारतीय तर 1 नेपाळी व्यक्तीचा समावेश होता. दरम्यान भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून या हल्ल्याचा बदला घेतला आहे. मंगळवारी मध्यरात्री भारतानं पाक व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. भारतानं केलेल्या या हल्ल्यामध्ये एकूण 9 दहशतवाद्यांची ठिकाणं उद्ध्वस्त झाली आहेत. ज्यामध्ये पाक व्याप्त काश्मीरमधील पाच तर पाकिस्तानमधील चार दहशतवादी ठिकाणांचा समावेश आहे. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे.

पाकिस्तानने त्यानंतर भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला देखील भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं, भारतानं पाकिस्तानवर ड्रोन हल्ला केला, या हल्ल्यामध्ये पाकिस्तानची रडार सिस्टिम पूर्णपणे उद्धवस्त झाली आहे. तरी देखील पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत, गुरुवारी रात्रीच्या वेळी पाकिस्तानने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताच्या तीन राज्यांमध्ये जम्मू काश्मीर, राजस्थान आणि पंजाबमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आला, मात्र भारताच्या डिफेंस यंत्रणेनं हा हल्ला यशस्विरित्या परतून लावला आहे, पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर अपटला आहे. मात्र आता असा प्रश्न निर्माण होतो की, एअर स्ट्राईक हे नेहमी रात्रीच का होतात? याबाबत तुम्हालाही उत्सुकता असेलच चला तर मग जाणून घेऊयात.

एअर स्ट्राईक रात्रीच केले जातात त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे रात्रीच्या वेळी शत्रू हवा तेवढा सतर्क नसतो, त्यामुळे लक्ष्यभेद करायला अनुकूल परिस्थिती असते. तसेच रात्री दृष्यमानता कमी असते, त्यामुळे शत्रूच्या डिफेंस यंत्रणेला हल्ला नेमका कुठून सुरू आहे, याचा अचूक अंदाज लवकर येत नाही, तसेच रात्रीच्या वेळी एअर ट्राफिक देखील खूप कमी असते, त्यामुळे कोणताही अडथळा न येता असे हल्ले करता येतात, त्यामुळे एअर स्ट्राईक हे नेहमी रात्रीच्या वेळीच होतात. रात्री जेव्हा एअर स्ट्राईक होतो, तेव्हा अधिक अचूक लक्ष्यभेद करता येतो. रात्रीच्या वेळी शत्रू  गाफील असतात, याचा फायदा होतो.

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.