ओदिशा रेल्वे अपघातानंतर शाळेत जायला का घाबरत आहेत मुलं, काय कारण आहे ?

शाळेच्या व्यवस्थापन समितीने सांगितले की शाळेच्या काही मोठ्या मुलांनी आणि एनसीसी कॅडेटच्या विद्यार्थ्यांनी बचाव कार्यात देखील सहभाग घेतला होता.

ओदिशा रेल्वे अपघातानंतर शाळेत जायला का घाबरत आहेत मुलं, काय कारण आहे ?
Odisha-accidentImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 9:16 PM

बालासोर : ओदिशाच्या बहनगा उच्च विद्यालयाचे विद्यार्थी त्यांच्या शाळेत जाण्यासाठी घाबरत आहेत. या शाळेत अपघातानंतर सुरुवातीला रेल्वे अपघातातील मृतदेहांना ठेवण्यात आले होते. शुक्रवार दि. 2 जूनच्या सायंकाळी ओदिशा ( Odisha Railway Accident ) येथील बालासोर जिल्ह्यातील ( Balasore Train Accident )  रेल्वेच्या झालेल्या भीषण अपघातात 275 प्रवासी ठार झाले तर 1100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. तर अनेक मृतदेहांची अद्याप ओळखही पटलेली नाही.

ओदिशाचा रेल्वे अपघाताची घटना घडली तेव्हा लागलीच 65 वर्षीय जुन्या असलेल्या या शाळेत मृतदेहांना ठेवण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची भीती वाटत आहे. शाळेच्या व्यवस्थापन समितीने राज्य सरकारला ही इमारत जुनी झाली असल्याने तिला पाडण्याची मागणी सरकारकडे केली आहे. बहनगा उच्च विद्यालयाचे प्रिन्सिपलनी मान्य केले की विद्यार्थी घाबरले आहेत. त्यामुळे शाळेत आम्ही पुजा आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

शाळेच्या पुनर्विकासाची मागणी 

शाळेच्या व्यवस्थापन समितीने सांगितले की शाळेच्या काही मोठ्या मुलांनी आणि एनसीसी कॅडेटच्या विद्यार्थ्यांनी बचाव कार्यात देखील सहभाग घेतला होता. शाळा आणि लोकशिक्षण विभागाच्या निर्देशानंतर शाळेचा दौरा करणारे बालासोरचे जिल्हाधिकारी दत्तात्रय भाऊसाहेब शिंदे यांनी सांगितले की आपण शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी, प्रिन्सिपल, अन्य कर्मचारी आणि स्थानिक लोकांची भेट घेतली आहे. ते शाळेच्या जुन्या इमारतीला पाडून तिचा पुनर्विकास करू इच्छीत आहे. म्हणजे मुलांना त्यांच्या वर्गात या कसलीही भिती वाटणार नाही.

मुलांनी टीव्हीवर पाहिले 

शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्याने जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की अपघातानंतर स्कूलमध्ये मृतदेहांना ठेवल्याचे विद्यार्थ्यांनी टीव्हीवर पाहीले. त्यामुळे मुले स्वाभाविकपणे घाबरली आहेत. आणि 16 जूनला शाळा सुरु होणार आहे. पण मुले आणि पालक शाळेत येण्यास चाचरत आहेत. वास्तविक अपघातानंतर लागलीच शाळेत ठेवलेले मृतदेह लागलीच हलविले. नंतर शाळेचे वर्ग आणि परिसर साफ करण्यात आला होता. परंतू विद्यार्थी आणि त्यांचे पालक घाबरलेले आहेत.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.