AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Noida Supertech Twin Towers Demolition : असं काय घडलं? ज्यामुळे ट्विन टॉवर जमीनदोस्त करावा लागतोय; जाणून घ्या 5 मुद्द्यातून!

Noida Supertech Twin Towers Demolition : कंपनीच्या या बांधकामाला रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनने विरोध केला. 2010 मध्ये RWA ने ट्विन टावर विरोधात कोर्टात धाव घेतली. मानकानुसार दोन्ही टॉवरच्या दरम्यान 16 फुटाचं अंतर असलं पाहिजे होतं. मात्र, ही मानके धाब्यावर बसून टॉवरमध्ये केवळ 9 मीटरचं अंतर ठेवलं गेलं.

Noida Supertech Twin Towers Demolition : असं काय घडलं? ज्यामुळे ट्विन टॉवर जमीनदोस्त करावा लागतोय; जाणून घ्या 5 मुद्द्यातून!
असं काय घडलं? ज्यामुळे ट्विन टॉवर जमीनदोस्त करावा लागतोय; जाणून घ्या 5 मुद्द्यातून!Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 28, 2022 | 11:34 AM
Share

नोएडा: अखेर नोएडातील सुपरटेकचा ट्विन टॉवर (Noida Supertech Twin Towers) जमीनदोस्त करण्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. आज दुपारी 2.30 वाजता एक ब्लास्ट घडवून 102 मीटर ऊंच ही गगनचुंबी इमारत (building) जमीनदोस्त होणार आहे. ही इमारत जमीनदोस्त करण्यासाठी ज्या कंपनीकडे काम दिलं आहे. ती कंपनी आणि स्थानिक प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे. वॉटर फॉल इम्प्लोजन तंत्रानुसार ही इमारत सुरक्षितपणे पाडली जाणार असल्याचं एडफिस इंजिनीयरिंगच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं. नोएडाच्या (Noida) सेक्टर 93 A मध्ये हा 32 मजली टॉवर बनलेला आहे. मात्र, आता हा टॉवर जमीनदोस्त केला जाणार आहे. हा टॉवर का पाडण्यात येत आहे? तो पाडल्यानंतर काय होणार आहे? टॉवर पाडण्याची गरज का पडलीय? या सर्व प्रश्नांवर खालील पाच मुद्द्यांवर टाकलेला हा प्रकाश.

ट्विन टॉवर पाडण्यामागचं कारण काय?

>> 2002मध्ये नोएडा अथॉरिटी सोसायटी बनवण्याची परवानगी दिली होती. त्यात 14 टॉवर, एक शॉपिंग कॉम्प्लेक्स बनवण्याची परवानगी देण्यात आली होती.

>> त्यानंतर सेक्टर 93Aमध्ये सुपरटेकला भूखंड देण्यात आला होता. जून 2006मध्ये अतिरिक्त भूखंड देण्यात आला होता. तसेच हौसिंग सोसायटीत बदल करण्याचीही परवानगी देण्यात आली होती.

>> मात्र, मूळ योजनेत बदल केल्यावर खरेदीदारांची सहमती घेण्यात आली नाही. या योजनेत आपल्या ग्राहकांना ग्रीन एरिया दाखवण्यात आला. 2009मध्ये बेकायदेशीरपणे ट्विन टॉवर बनवण्याचं काम सुरू झालं. त्यानंतर कंपनीने दिशाभूल करत ग्रीन एरियावर दोन टॉवर उभे केले.

>> कंपनीच्या या बांधकामाला रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनने विरोध केला. 2010 मध्ये RWA ने ट्विन टावर विरोधात कोर्टात धाव घेतली. मानकानुसार दोन्ही टॉवरच्या दरम्यान 16 फुटाचं अंतर असलं पाहिजे होतं. मात्र, ही मानके धाब्यावर बसून टॉवरमध्ये केवळ 9 मीटरचं अंतर ठेवलं गेलं. या प्रकरणाची पूर्ण सुनावणी झाल्यानंतर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट 2021मध्ये टॉवर पाडण्याचे आदेश दिले.

दोन्ही टॉवरची ऊंची किती?

  • एपेक्स टॉवर 102 मीटर
  • सियेन टॉवर 95 मीटर
  • कुतुबमीनार 73 मीटर
  • इंडिया गेट 42 मीटर

धुळधाण होणार, आजारपण येणार?

>> टॉवर पाडल्यानंतर होणाऱ्या धुळीमुळे डोळ्यात जळजळ, खाज येण्याची समस्या जाणवण्याची शक्यता आहे.

>> श्वसनाचा विकार असलेल्या रुग्णांना धुळीचा त्रास होऊ शकतो

>> डोकेदुखी, क्रॉनिक ब्रोंकायटिस, स्किन रॅशेस येण्याची शक्यता

>> नाक गळणे, गळ्यात खवखवणे, कफ वाढणे आदी समस्याही होऊ शकतात

>> दम्याचा अटॅक, ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता

>> गर्भवती महिलांना लवकर लेव्हर पेन होण्याची शक्यता आहे

>> प्री-मॅच्युर डिलिव्हरीची भीती

>> अॅलर्जिक सायनुसाईटिस सारखे विकार

ढिगाऱ्याचा डोंगर

  • दोन्ही इमारती पाडल्यानंतर 55 हजार टनाहून अधिक ढिगाऱ्यांचा डोंगर वाढणार आहे.
  • हा ढिगारा हटवण्यासाठी तीन महिने लागणार आहेत.
  • दोन्ही टॉवर पाडल्याने 3000 ट्रक ढिगारा निघणार आहे.
  • टॉवर पाडल्यानंतर 10 मिनिटापर्यंत परिसरात धुळीचं साम्राज्य राहणार आहे.
  • ढिगारा हटवण्यासाठी 1200 ते 1300 ट्रकांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
  • 21000 क्यूबिक मीटर ढिगारा नोएडा वेगवेगळ्या ठिकाणी डंप केला जाणार आहे.
  • ढिगारा टाकण्यासाठी 5-6 हेक्टर जागा शोधण्यात आली आहे.
  • ढिगाऱ्यातून जवळपास 4000 टन स्टील आणि लोखंड निघणार आहे.

स्फोट कसा होणार?

>> दोन्ही टॉवरमध्ये एकाचवेळी स्फोट केला जाणार आहे.

>> स्फोटासाठी दोन्ही टॉवरमध्ये 9640 होल तयार करण्यात आले आहेत.

>> प्रत्येक होलमध्ये 40 ग्रॅमपासून ते 160 ग्रॅम स्फोटके भरण्यात आली आहेत.

>> काही कॉलममध्ये 4 होल, काही कॉलमध्ये 5 होल केले आहेत.

>> दोन्ही टॉवरमध्ये 3700 किलो स्फोटके भरण्यात आली आहेत.

>> एपेक्स टॉवरच्या प्रत्येक मजल्यावर 170 कॉलम

>> सियान टॉवरच्या प्रत्येक मजल्यावर 60 कॉलम

>> टॉवरमध्ये 2650 कॉलममध्ये स्फोटके भरण्यात आली आहेत.

>> 10 भारतीय, 7 विदेशी ब्लास्टर्स ब्लास्ट घडवून आणणार

>> 100 मीटर लांबून इलेक्ट्रिक वायरच्या माध्यमातून होणार ट्रिगर

काऊंटडाऊन… आकड्यात!

  1. 9-12 सेकंदात Twin Tower जमीनदोस्त होणार
  2. Twin Towerची ऊंची 100 मीटर
  3. 3,700 किलो स्फोटकांनी होणार टॉवर जमीनदोस्त
  4. 30 पैकी एकूण 18 मजले स्फोटकांनी उडवून देणार
  5. स्फोटके जोडण्यासाठी 20 हजाराहून अधिक कनेक्शन
  6. 300 मीटरवर पर्यंत ढिगाऱ्याची धूळ साचणार
  7. 50 हजार टन ढिगारा निघणार
  8. ढिगाऱ्यातून 4 हजार टन स्टील निघणार
  9. 1200 ट्रकांतून ढिगारा वाहून नेणार
  10. टॉवर पाडण्याचा खर्च 20 कोटी
  11. टॉवर पाडण्याच्या खर्चापैकी 5 कोटी रुपये सुपरटेक देणार आणि 15 कोटी रुपये ढिगारा विकून मिळवण्यात येणार.
  12. ट्विन टॉवरच्या आसापास 7 हजार लोक राहतात.

Follow Us
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम