14 नोव्हेंबर बालदिन म्हणून का साजरा केला जातो?

मुंबई : बालदिनाच्या दिवशी देशभरातील शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. सोशल मीडिया आल्यापासून बालदिनाच्या आता मेसेजद्वारे शुभेच्छाही दिल्या जात आहेत. पण बालदिनाची सुरुवात कशी झाली आणि बालदिन का साजरा केला जातो, यामागचा उद्देश काय आहे, या प्रश्नांचा तुम्ही कधी शोध घेतलाय का? याचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु […]

14 नोव्हेंबर बालदिन म्हणून का साजरा केला जातो?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

मुंबई : बालदिनाच्या दिवशी देशभरातील शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. सोशल मीडिया आल्यापासून बालदिनाच्या आता मेसेजद्वारे शुभेच्छाही दिल्या जात आहेत. पण बालदिनाची सुरुवात कशी झाली आणि बालदिन का साजरा केला जातो, यामागचा उद्देश काय आहे, या प्रश्नांचा तुम्ही कधी शोध घेतलाय का? याचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिन म्हणजे 14 नोव्हेंबर बालदिन साजरा केला जातो. नेहरुंचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी झाला होता.

भारताचं परराष्ट्र धोरण – नेहरुंनी दिलेला अनमोल वारसा

नेहरुंचं मुलांविषयीचं प्रेम संपूर्ण जगाला माहित होतं. मुलं त्यांना प्रेमाने नेहरु चाचा म्हणायचे. नेहरुंनी मुलांवर जे प्रेम केलं, ते देशातील कानाकोपऱ्यात त्यांच्या मृत्यूनंतरही बालदिनाच्या रुपाने पाहायला मिळतं. या दिवशी मुलांना विविध भेटवस्तू दिल्या जातात.

महाराष्ट्रासह देशभरातील शाळांमध्ये बालदिनाच्या दिवशी चर्चासत्र, प्रश्नोत्तर, डान्स यांसह विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. शिवाय कपडे, चॉकलेट आणि इतर खाद्यपदार्थांचं वाटपही केलं जातं.

भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी संयुक्त राष्ट्राने ठरवल्याप्रमाणे बालदिन हा 20 नोव्हेंबर रोजी साजरा केला जायचा. पण 1964 साली नेहरुंच्या निधनानंतर त्यांच्या मुलांविषयीच्या प्रेमाला मानवंदना म्हणून बालदिन 14 नोव्हेंबर रोजी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Non Stop LIVE Update
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली, उद्या काय घडणार?
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली, उद्या काय घडणार?.
रोहित पवार यांचं सोशल मीडिया अकाऊंट बंद? भाजपवर गंभीर आरोप करत म्हणाले
रोहित पवार यांचं सोशल मीडिया अकाऊंट बंद? भाजपवर गंभीर आरोप करत म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात अपशब्द, नंतर अटक; कोण आहेत दत्ता दळवी?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात अपशब्द, नंतर अटक; कोण आहेत दत्ता दळवी?.
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, परीक्षा पास झाल्यावर मुलाखती आधी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, परीक्षा पास झाल्यावर मुलाखती आधी....
राणे, त्यांची दोन नेपाळी पोरं खुलेआम शिव्या देतात, कुणाची जळजळीत टीका?
राणे, त्यांची दोन नेपाळी पोरं खुलेआम शिव्या देतात, कुणाची जळजळीत टीका?.
ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम,उपचारांची गरज; जिव्हारी लागणारी टीका कुणाची
ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम,उपचारांची गरज; जिव्हारी लागणारी टीका कुणाची.
नालायक लोकांना तो शब्द वापरला पाहिजे, ठाकरे अन राऊतांवर कुणाचा पलटवार?
नालायक लोकांना तो शब्द वापरला पाहिजे, ठाकरे अन राऊतांवर कुणाचा पलटवार?.
छगन भुजबळ पदाला चिकटून बसणारे, गरळ ओकणारे मंत्री, कुणी केली जहरी टीका?
छगन भुजबळ पदाला चिकटून बसणारे, गरळ ओकणारे मंत्री, कुणी केली जहरी टीका?.
नाशकात गारपीट आणि अवकाळीनं सारं काही हिरावलं, बळीराजाला अश्रू अनावर
नाशकात गारपीट आणि अवकाळीनं सारं काही हिरावलं, बळीराजाला अश्रू अनावर.
आज आनंद दिघे असते तर त्यांनी चाबकानं फोडल असतं, राऊतांनी कुणाला फटकारल
आज आनंद दिघे असते तर त्यांनी चाबकानं फोडल असतं, राऊतांनी कुणाला फटकारल.