…म्हणून मग नाना पाटेकर यांना थेट कारगिल युद्धावर पाठवण्याचा निर्णय संरक्षण मंत्र्यांनी घेतला, अंगावर काटा आणणारा किस्सा
नाना पाटेकर यांचं निधन झालं, त्यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते फक्त एक अभिनेतेच नव्हते तर त्यांनी कारगिल युद्धात देखील भाग घेतला होता. त्याचाच एक किस्सा त्यांनी आपल्या जुन्या मुलाखतीमध्ये सांगितला आहे.

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन झालं आहे, त्यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी भारतीय चित्रपट सृष्टीला अनेक हीट चित्रपट दिले. नाना पाटेकर हे केवळ अभिनेतेच नव्हते तर त्यांनी कारगिलच्या युद्धात देखील सहभाग घेतला होता. त्यांनीच आपल्या एका मुलखतीमध्ये याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी तो प्रसंग सांगितला होता.
काय आहे तो युद्धाचा किस्सा?
‘प्रहारच्या वेळी मी सेंट्रल गव्हर्रमेंटकडून परवानगी घेतली होती, आणि मी जवळ जवळ तीन वर्ष तिकडे मराठा लाईट नन्फंट्रीमध्ये होतो. त्यावेळी तिथे असताना मला तो सगळा अनुभव मिळाला. मला तिथे कमांडो कोर्स करता आला. नेमबाजी करता आली. तुमचं कमिशन हल्ली सहा महिने किंवा आठ महिन्यामध्ये जे काय होत असेल ते. परंतु जेव्हा कारगिल युद्ध सुरू झालं तेव्हा, आमची एक फुटबॉलची मॅच ठरली होती ती दिल्लीला होती. कपिल देव खेळाडूंना रिप्रेझेंट करणार होते. तर मी अभिनेत्यांना रिप्रेझेंट करणार होतो. त्यामध्ये आम्ही सगळेच होतो, शाहरूख वगैरे मंडळी होती. पण कारगिल युद्ध सुरू झालं, त्यामुळे मला तिथे काही खेळणं पटलं नाही. त्यावेळी जॉर्ज फर्नांडिस संरक्षण मंत्री होते, त्यांना मी फोन केला. माझी आणि त्यांची चांगली मैत्री होती. मी त्यांना म्हटलो सर मला युद्धभुमीवर जायचं आहे. तेव्हा ते म्हणाले अरे नाना असं कसं जाता येईल? तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी तिकडे तीन वर्ष होतो. तेव्हा ते म्हणाले मला हे माहिती नव्हतं, असं या मुलाखतीमध्ये नाना पाटेकर यांनी सांगितलं होतं.
पुढे याच मुलाखतीमध्ये बोलताना ते म्हणाले की, ‘मग त्यांनी मला विचारलं की तिकडे कधी जायचं, तर मी त्यांना म्हणाले आज, आणि त्याच दिवशी संध्याकाळी मी तिकडे गेलो. मला घेण्यासाठी श्रीनगरच्या एअरपोर्टवर कर्नल बदाणी आले होते. कुंपवाड्याला जाण्यासाठी दोन मार्ग होते. कुंपवाडापासून पाकिस्तानची बॉर्डर ही खूपच जवळ. तिथून पाकिस्तानमधील घरं देखील दिसतात. श्रीनगरमधून कुंपवाड्याला जाण्यासाठी दोन मार्ग होते, एक जवळचा आणि दुसार थोडा लांबचा होता. जवळच्या मार्गाने बॉर्डरवर जाताना तिथे खूप सारे सुरुंग दहशतवाद्यांनी पेरले होते, त्यामुळे कर्नल बदानी म्हणाले की नाना आपण बारामुल्लाहून कुपवाड्याला जाऊ, मग मी त्यांना विचारलं तुम्ही कसे आलात तर ते म्हणाले आम्ही याच जवळच्या मार्गाने आलो. तेव्हा मी त्यांना म्हणाले की तुम्हाला काही नाही झालं तर मग मला पण काही होणार नाही, आपण सगळे याच मार्गाने जाऊ, झालं तर सगळ्यांना होईल, असा आपल्या कारगिल युद्धाचा किस्सा नाना पाटेकर यांनी या मुलाखतीमध्ये सांगितला होता.
