AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुत्रा, मांजर हे स्वत:भोवतीच गोल गोल का फिरतात? तुम्हाला माहितीये का खरं कारण?

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, प्राणी स्वत:भोवती गोल-गोल फिरतात. परंतु ते असं का करतात? याच कारण तुम्हाला माहिती आहे का? मांजर, कुत्रा असे प्राणी अनेकदा स्वत: भोवतीच फिरताना दिसतात.

कुत्रा, मांजर हे स्वत:भोवतीच गोल गोल का फिरतात? तुम्हाला माहितीये का खरं कारण?
PetsImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 04, 2026 | 9:14 PM
Share

भारतामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, तुम्हाला प्रत्येक शहरात, खेडे गावात भटके कुत्रे दिसून येतील. तसं पाहायला गेलं तर ही एक फार मोठी गंभीर समस्या आहे. कारण अनेकदा अशा भटक्या कुत्र्यांकडून माणसावर हल्ला झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. या हल्ल्यामध्ये अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत, तर काही जणांचा तर मृत्यू देखील झाला आहे. या भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्या -त्या शहरातील किंवा गावातील स्थानिक प्रशासन यंत्रणेकडून अनेक उपाय योजना राबवण्यात येतात, जसं की अशा भटक्या कुत्र्यांना पकडून शहराबाहेर सोडलं जातं. अनेकदा त्यांचं इजेक्शन देऊन निर्बिजीकरण देखील केलं जातं. मात्र तरी देखील अशा भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

दरम्यान अनेकदा अशा कुत्र्यांमुळे अपघात देखील घडतात. अचानक भरधाव वाहनाला कुत्रा अडवा गेल्यामुळे त्याला वाचवण्याच्या नादात आतापर्यंत अनेक वाहनांचा अपघात घडल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. त्यातच एक मोठी समस्या म्हणजे काही कुत्र्यांना रेबीजची लागण झालेली असते. असा कुत्रा एखाद्या व्यक्तीला किंवा दुसऱ्या प्राण्याला जर चावला तर त्यामुळे त्या प्राण्याला देखील रेबीजची लागणं होते, रेबीज हा जीवघेणा आजार आहे. कारण या आजारावर अजूनही कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत. खबरदारीचा उपाय म्हणून कुत्रा चावल्यानंतर लगेचच प्रतिबंधात्मक लस घेतली पाहिजे.

दरम्यान तुम्ही कधी असं पाहिलं आहे का? की कधी-कधी कुत्रा स्वत:भोवतीच गोल-गोल फिरत राहतो, अनेकदा असं म्हटलं जातं की जी कुत्री स्वत:भोवती गोल-गोल फिरतात त्यांना रेबीजची लागण झालेली असते, मात्र हा चुकीचा समज आहे, कारण अशा प्राण्यांना कॅनाइन डिस्टेंपर नावाचा आजार असू शकतो, जेव्हा एखाद्या प्राण्याला कुत्रा, मांजर यांना हा आजार होतो, तेव्हा ते अशा पद्धतीने स्वत:भोवतीच गोल-गोल फिरू लागतात. हा प्राण्यांच्या मज्जासंस्थेशी एक आजार आहे, अशा आजारामध्ये त्यांना योग्य उपचार न मिळाल्यास त्यांचा मृत्यू देखील होतो.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात