AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोरांची गरज का भासतेय? आतली बातमी आली समोर

प्रशांत किशोर यांनी तीन महिन्यात दोन वेळा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. .या भेटीमागचं नेमकं कारण काय, याची चर्चा सुरू झाली आहे.

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोरांची गरज का भासतेय? आतली बातमी आली समोर
| Updated on: Aug 07, 2026 | 9:51 AM
Share

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही महिन्यांपूर्वी राजकीय रणनीतीकार नरेश अरोरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील करार संपुष्टात आला. दोघांमधील करार संपल्यानंतर आता राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची एन्ट्री झाली आहे. प्रशांत किशोर यांनी बिहारच्या बांकीपूरमध्ये पोटनिवडणूक जिंकल्यानंतर थेट महाराष्ट्रात पोहोचले. मागील काही दिवसांत प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची दुसऱ्यांदा भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला प्रशांत किशोर यांच्या रणनीतीची गरज का भासली, यावरून चर्चांना उधाण आलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे कमान सुनेत्रा पवार यांनी सांभाळली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसंचं विलीनीकरण होणार नसल्याचंही बोललं जात आहे. त्यात आता पार्थ पवार आणि जय पवार यांचीही राजकारणात एन्ट्री झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीसमोर अनेक आव्हाने समोर उभी असणार आहेत.

पार्थ पवार हे राष्ट्रवादीसाठी प्रशांत किशोर यांच्या कंपनीची मदत घेऊ इच्छित आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची भेट झाली. प्रशांत किशोर यांनी स्वत:हून आयपॅक कंपनीपासून वेगळं केलं आहे. परंतु पडद्याच्या मागून महत्त्वाची भूमिका निभावत असल्याचं बोलले जात आहे. राष्ट्रवादीच्या वाढीसाठी पार्थ पवार यांनीच सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट घडवून आणल्याचे सांगितले जात आहे.

राष्ट्रवादीला प्रशांत किशोर यांची गरज का भासतेय?

महाराष्ट्राच्या राजकारणा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीमधील तिन्ही पक्ष संघटनासाठी वाढीसाठी प्रयत्न करत आहे. काही दिवसांपासून शरद पवारांची राष्ट्रवादी भाजप प्रणित ‘एनडीए’शी हातमिळवणी करणार असल्याची चर्चा आहे. त्यात बांकीपूरच्या पोटनिवडणुकीनंतर काही दिवसांनी प्रशांत किशोर आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट झाली. दोघांच्या भेटीवरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे.

पार्थ पवार यांच्या भूमिकेवरून ‘एनडीए’मधील काही नेत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. दुसरीकडे सुनेत्रा पवार देखील राष्ट्रवादीच्या संघटनवाढीसाठी प्रशांत किशोर यांची सहकार्य घेऊ इच्छित आहे. या माध्यमातून सुनेत्रा पवारांनाही एक राजकीय संदेश द्यायचा आहे. त्यात मागील तीन महिन्यात दोन वेळा प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांची भेट झाली आहे.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...