‘माझा पती तलावात बुडाला’, राजा रघुवंशीपेक्षाही भयानक हत्याकांड, कारण ऐकून पोलिसांचा डोक्याला हात
एक धक्कादायक घटना समोर आली आहे, पत्नीनेच आपल्या पतीची हत्या केली आहे, सत्य समोर येताच पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलं आहे.

इंदूरमधील राजा रघुवंशी हत्याकांड ताजं असतानाच आता मध्य प्रदेशमधून देखील अशीच एक घटना समोर आली आहे. जबलपूरमध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली आहे. जबलपूरमधील अधारताल पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या क्षेत्रात पत्नीनं आपल्या पतीची हत्या केली, त्यानंतर त्याला तलावात फेकून दिलं. ती एवढ्यावरच थांबली नाही, आपला पती तलावात बुडाल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा दावा देखील या महिलेनं केला. मात्र पोस्टमार्टम रिपोर्ट समोर येताच या महिलेचा पर्दाफाश झाला.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गणेशी बाई असं या आरोपी महिलेचं नाव आहे. तर अरविंद असं हत्या झालेल्या तिच्या पतीचं नाव आहे. ती जबलपूरमध्ये राहाते. तिने आधी आपल्या पतीची हत्या केली, त्यानंतर त्याला तलावात फेकून दिलं. त्यानंतर आपला पती बुडाल्याचं तिने सांगितलं. मात्र पोस्टमार्टम रिपोर्ट समोर येताच या महिलेचा खोटेपना समोर आला आहे.
जेव्हा या महिलेच्या पतीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला, त्यामध्ये असं दिसून आलं की त्याचा मृत्यू हा तलावात बुडाल्यामुळे नाही तर कोणीतरी त्याच्या डोक्यावर एखाद्या जड वस्तुने प्रहार केल्यामुळे झाला आहे. पोलिसांना त्याच्या पत्नीवर संशय आला, पोलिसांनी यासंदर्भात मृत व्यक्तीच्या पत्नीकडे कसून चौकशी केली, चौकशीमध्ये तीने हत्येची कबुली दिली आहे.
या हत्येबाबत माहिती देताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, गणेशी बाईने हत्येची कबुली दिली आहे. पती आणि तिच्यामध्ये सतत वाद होत होता. रोजच्या वादाला कंटाळून तिने आपल्या पतीच्या डोक्यात दगड टाकला त्यानंतर त्याला तलावात फेकून दिले. त्यानंतर तिने आपल्या पतीचा तलावात बुडून मृत्यू झाल्याचं सांगितलं. मात्र पोस्ट मार्टम रिपोर्टमुळे सत्य बाहेर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
घरगुती भांडणांमुळे हत्या
गणेशी बाई आणि तिचा पती अरविंद यांच्यामध्ये सतत भांडणं व्हायचे, रोजच्या भांडणाला कंटाळून अखेर तिने आपल्या पतीलाच संपवलं. तिने आधी पतीच्या डोक्यात दगड टाकला, त्यानंतर त्याला तलावात फेकून दिले.