AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काश्मीरचं नाव बदलणार? काय आहे नवं नाव? अमित शाहांचं मोठं वक्तव्य

मोठी बातमी समोर येत आहे, काश्मीरचं नाव आता बदललं जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून याबाबत संकेत देण्यात आले आहेत.

काश्मीरचं नाव बदलणार? काय आहे नवं नाव? अमित शाहांचं मोठं वक्तव्य
| Updated on: Jan 02, 2025 | 6:55 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, काश्मीरचं नाव आता बदललं जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून याबाबत संकेत देण्यात आले आहेत. ते ‘J&K and Ladakh Through the Ages’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की काश्मीरचं नावं कश्यपपासून असू शकतं. शंकराचार्य, सिल्क रूट आणि हेमिश मठ याच्यावरून हे सिद्ध होतं की भारतीय संस्कृतीचा पाया हा काश्मीमध्येच घालण्यात आला. इथे सुफी आणि बौद्ध संस्कृती देखील खूप चांगल्या पद्धतीने रूजली गेली.

काश्मिरी, डोगरी, बाल्टी, झंस्करारी या भाषांना सरकारने मान्यता दिली आहे. त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. पंतप्रधान मोदी काश्मीर संदर्भात खूप विचार करतात. काश्मीरमधील ज्या स्थानिक भाषा आहेत त्या जीवंत राहिल्या पाहिजेत, त्यांचं जतन झालं पाहिजे असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आग्रह होता, त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की,कलम 370 आणि 35 ए हा देशाच्या एकतेमधील सर्वात मोठा अडथळा होता. मात्र आता मोदी सरकारनं हा अडथळा दूर केला आहे. कलम 370 हटवण्यात आलं आहे. त्यानंतर जम्मू -काश्मीरमध्ये विकासाची नवी गंगा आली आहे. अनेक विकास प्रकल्प या ठिकाणी सुरू आहेत.

भारताच्या सीमा संस्कृती आणि परंपरेवर आधारीत

काश्मीरचा इतिहास पुस्ककाच्या रुपानं पुढे आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जगात भारत असा ऐकमेव देश आहे, जिथल्या सीमा या संस्कृती आणि परंपरेवर आधारीत आहेत. म्हणून काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत भारत एक आहे. जर तुम्हाला भारत समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला आधी तेथील संस्कृती, परंपरा समजून घ्याव्या लागतील, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.  आपल्या देशाला तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटकांना तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, चुकीच्या इतिहासाची मांडणी करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला, असा आरोपही यावेळी शाह यांनी केला आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं