हात जोडतो, पाया पडतो, ताईला दाखल करा, भावाच्या लाखो याचनेनंतरही बेड मिळाला नाही, बहिणीचा रुग्णालयाबाहेर तडफडून मृत्यू

कोरोनाबाधित महिला ऑक्सिजनसाठी याचना करत होती. मात्र, ऑक्सिजन न मिळाल्याने तिचा रुग्णालयाबाहेर तडफडून मृत्यू झाला (Woman death on street due to not get oxygen in Jaipur).

हात जोडतो, पाया पडतो, ताईला दाखल करा, भावाच्या लाखो याचनेनंतरही बेड मिळाला नाही, बहिणीचा रुग्णालयाबाहेर तडफडून मृत्यू
Oxygen Shortage
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 7:57 PM

जयपूर : कोरोना महामारीच्या या महाभयंकर संकाटापुढे आरोग्य यंत्रणा पूर्णपणे खिळखिळी झाली आहे. शेकडो रुग्णांना आज ऑक्सिजन बेड मिळणं कठीण झालं आहे. देशाची राजधानी दिल्लीसह अनेक शहरांमध्ये भयानक परिस्थिती आहे. राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर शहरात एका महिलेचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला. या महिलेच्या भावाने तिला वाचावण्याचा प्रचंड प्रयत्न केला. माझ्या बहिणीला रुग्णालयात दाखल करुन घ्या, अशी प्रचंड विनंती केली. मात्र, त्याच्या पदरात निराशा पडली. तो आपल्या बहिणीसाठी एक ऑक्सिजनचा सिलेंडरही मिळवू शकला नाही. त्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. यावेळी कोरोनाबाधित महिला ऑक्सिजनसाठी याचना करत होती. मात्र, ऑक्सिजन न मिळाल्याने तिचा रुग्णालयाबाहेर तडफडून मृत्यू झाला (Woman death on street due to not get oxygen in Jaipur).

अनेक रुग्णालयांच्या दारावर जाऊनही बेड मिळाला नाही

कोरोनाबाधित महिलेच्या भावाने तिला वाचवण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला. तो बहिणीला रिक्षाद्वारे जयपूरच्या अनेक रुग्णांलयांमध्ये घेऊन गेला. मात्र, सर्व रुग्णलयांमधून बेड खाली नाही, असं उत्तर मिळालं. बहिणीला श्वास घेण्यास अडथळा येत असल्याने त्याने ऑक्सिजन सिलेंडर मिळवण्याचाही प्रयत्न केला. पण सगळीकडे ऑक्सिजन संपला होता.

अर्धमेल्या अवस्थेत महिलेची ऑक्सिजनसाठी याचना

महिलेला घेऊन तिचा भाऊ फिरतफिरत शहरातील सवाई मानसिंह रुग्णालयाजवळ आला. मात्र, रुग्णालयाबाहेर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने त्याला आतमध्ये जाऊ दिलं नाही. अर्धमेल्या अवस्थेत महिलेने तिथे रस्त्यावर उपस्थित असलेल्यांना हात जोडून विनंती केली की, कुणीतरी मला ऑक्सिजन द्या. पण कुणीही तिला ऑक्सिजन देऊ शकलं नाही. महिलेचा ऑक्सिजन अभावी जागेवरच तडफडून मृत्यू झाला.

भावाने टाहो फोडला

भावाच्या डोळ्यांसमोर बहिणीचा मृत्यू झाला. तिला होणारा त्रास, जगण्यासाठी तिची असलेली कळकळ तो तिच्या डोळ्यांमध्ये बघत होता. तिला जगण्याची आस होती. पण भाऊ प्रयत्न करुनही हतबल होऊन तिचा प्राण वाचवू शकला नाही. त्यामुळे भावाने टाहो फोडला.

भावाकडून आक्रोश व्यक्त

आरोग्य मंत्री कुठे गेले? राज्यातील डॉक्टरांच्या संवेदना मेल्या का ज्यांनी माझ्या बहिणीला असंच रस्त्यावर तडफडू दिलं? तिचेही दोन लहान मुलं आहेत. आता त्यांचं काय होणार? त्यांना आता कुणाचा सहारा मिळेल? या प्रश्नांचं उत्तर आता कुणाकडेच मिळणार नाही, अशा शब्दात महिलेच्या भावाने आक्रोश व्यक्त केला (Woman death on street due to not get oxygen in Jaipur).

हेही वाचा : मोठमोठ्या भाषणांच्या जेव्हा ‘तिरड्या’ निघतात, आश्वासनाचं ‘स्मशान’ होतं आणि व्यवस्थेचा ‘अंत्यविधी’

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.