महिलेला मिळालं चुकीचं पार्सल, कंपनीचा वापस घेण्यास नकार,10 वर्षांनी उघडलं, आतली वस्तू पाहून बसला प्रचंड धक्का
ऑनलाईन शॉपिंग तुम्हाला ही सुविधा उपलब्ध करून देते की, जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही कुठेही असाल तुम्ही घरबसल्या कोणतीही वस्तू सहज ऑर्डर करू शकता. मात्र कधी-कधी चुकीचं पार्सल देखील भेटतं, असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ऑनलाईन शॉपिंग तुम्हाला ही सुविधा उपलब्ध करून देते की, जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही कुठेही असाल तुम्ही घरबसल्या कोणतीही वस्तू सहज ऑर्डर करू शकता. मात्र अनेकदा अशा शॉपिंगमध्ये चुका देखील होतात. जसं की तुम्ही मागवलेली असते एक वस्तू आणि तुम्हाला मिळते भलतीच वस्तू. मग तुम्ही अशा स्थितीमध्ये काय करता? ती वस्तू तुम्हाला ज्या कंपनीने पाठवली आहे, त्या कंपनीला परत करता. परंतु एका महिलेलेला चुकीचं पार्सल मिळालं, तेव्हा या महिलेनं त्या कंपनीला हे सामान वापस करण्यासाठी फोन केला, तेव्हा कंपनीने तिला सांगितलं की, ते पार्सल वापस करण्याची गरज नाही, तुम्ही ते पार्सल ठेवून घेऊ शकता. त्यानंतर या महिलेनं हे पार्सल आपल्या घराच्या एका कोपऱ्यामध्ये ठेवून दिलं आणि ती विसरून गेली. त्यानंतर तब्बल दहा वर्षांनंतर या महिलेची नजर या पार्सलवर गेली, जेव्हा तिने ते उघडलं तेव्हा त्याच्यामध्ये जी वस्तू होती, ती पाहून या महिलेला प्रचंड धक्का बसला.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, एक महिलेला 2015-16 साली एका कंपनीच्या चुकीमुळे एक पार्सल मिळालं होतं. तिने याबाबत कंपनीला फोन करून याची माहिती देखील दिली होती, मात्र कंपनीने तिला सांगितलं की ते पार्सल वापस करण्याची गरज नाही. त्यानंतर तब्बल दहा वर्षांनी या महिलेनं हे पार्सल उघडून पाहिलं तेव्हा तिला प्रचंड धक्का बसला, तीने हा आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तिच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.
या महिलेनं या संदर्भातील एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.ज्यामध्ये तीने म्हटलं आहे की, मी 2015 मध्ये एका ऑनलाईन वेबसाईटवरून कपडे ऑर्डर केले होते. मात्र मला कंपनीनं चुकीचं पार्सल दिलं. मी ते कंपनीला परत देऊ केलं पण त्यांनी ते घेण्यास नकार दिला, ते पार्सल तुमच्याकडेच ठेवा असं कंपनीने सांगितलं. त्यानंतर मी या पार्सलबाबत विसरून गेले होते. मात्र दहा वर्षांनी मला ते पार्सल माझ्या घरात मिळालं, उत्सुकता म्हणून मी ते उघडून पाहिलं तर त्यात एक क्रीम कलरचा बॉडीसूट होता. मात्र ही घटना दहा वर्षांपूर्वीची आहे, आता माझ्यात खूप बदल झाला आहे, मी गर्भवती आहे, त्यामुळे हा बॉडीसूट माझ्या काहीच कामाचा नाही असं या महिलेनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
या महिलेचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून, आतापर्यंत तब्बल 34 लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. या व्हिडीओवर युझर्सच्या कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे, अनेकांनी हा व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे.
