जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 लागू होईपर्यंत निवडणूक लढणार नाही; महबूबा मुफ्तींची भीष्म प्रतिज्ञा

केंद्र सरकारने कलम 370 हटवून जम्मू-काश्मीरची स्वायत्ता काढून घेतल्याने जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचा केंद्र सरकारवरील राग अजूनही गेलेला नाही. (Won't Fight Elections Till Article 370 Restored: Mehbooba Mufti)

जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 लागू होईपर्यंत निवडणूक लढणार नाही; महबूबा मुफ्तींची भीष्म प्रतिज्ञा
Follow us
| Updated on: Dec 23, 2020 | 6:22 PM

श्रीनगर: केंद्र सरकारने कलम 370 हटवून जम्मू-काश्मीरची स्वायत्ता काढून घेतल्याने जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचा केंद्र सरकारवरील राग अजूनही गेलेला नाही. जोपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये 370 कलम लागू होत नाही आणि जम्मू-काश्मीरला स्वायत्ता बहाल केली जात नाही, तोपर्यंत कोणतीही निवडणूक लढणार नाही, अशी प्रतिज्ञाच महबूबा मुफ्ती यांनी दिली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरला स्वायत्ता मिळण्यासाठीचा मुफ्ती यांचा लढा अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Won’t Fight Elections Till Article 370 Restored: Mehbooba Mufti)

एका वृत्तवाहिनीशी बोलताना महबूबा मुफ्ती यांनी ही प्रतिज्ञा केली आहे. जोपर्यंत जम्मू-काश्मीरचं संविधान बहाल केलं जात नाही. जोपर्यंत राज्यात 370 कलम लागू होत नाही, तोपर्यंत मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असं त्या म्हणाल्या.

उद्या गुपकार आघाडीने विधानसभेची एकत्र निवडणूक लढवल्यास नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून वाद निर्माण होणार नाही का? असा सवाल त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना मुफ्ती यांनी हे विधान केलं. नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी एकमेकांचे राजकीय स्पर्धक आहेत. पण जम्मू-काश्मीरसाठी आम्ही एकत्र आलो आहोत. शेवटी आम्ही काश्मीरी आहोत. आम्ही केवळ निवडणुकीचा विचार करत नाही. तर आमच्याकडून जे हिसकावून घेतलं गेलं आहे, त्यावर आम्ही बोलत आहोत. त्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत, असंही त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत नाही

विधानसभा निवडणुका होतील तेव्हा आम्ही सर्वजण एकत्र बसू, चर्चा करू आणि निर्णय घेऊ. मी मात्र मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत नाहीये, असं त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी त्यांचे वडील मुफ्ती मोहम्मद सईद यांनी भाजपबरोबर केलेल्या युतीचं समर्थन केलं. माझ्या वडिलांनी राक्षसासोबत एक करार केला होता. काश्मीरच्या समस्या सोडवण्यासाठी माझ्या वडिलांनी मोदींसोबत हात मिळवला नाही. तर भारताच्या पंतप्रधानांशी हात मिळविला होता. माझ्या वडिलांनी आघाडी करून भाजपला सोबत घेण्याचा प्रयत्न केला. आमचा अजेंडा ठरलेला होता. तसेच आमच्या अटीवर आम्ही भाजपशी हातमिळवणी केली होती. त्यांनाही ते मान्य होते. पण सरकार पडल्यानंतर त्यांना जे हवं होतं तेच त्यांनी केलं, असं त्या म्हणाल्या. (Won’t Fight Elections Till Article 370 Restored: Mehbooba Mufti)

संबंधित बातम्या:

जम्मू-काश्मीरमध्ये गुपकार गटाची आघाडी; भाजप दुसऱ्या क्रमांकावर; वाचा संपूर्ण रिपोर्ट!

Photo ! जम्मू-काश्मीरमध्येही निवडणुकीचे वारे; जिल्हा विकास परिषदेसाठी शांततेत मतदान

अलिगढ मुस्लिम विद्यापीठात ‘मिनी इंडिया’, मोदींकडून पुन्हा ‘सबका साथ’चा नारा

(Won’t Fight Elections Till Article 370 Restored: Mehbooba Mufti)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.