AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांचे ‘वर्क फ्रॉम जेल’; हायकोर्टात याचिका, मागितल्या या सुविधा

अरविंद केजरीवाल यांना सरकार आता तुरुंगातूनच चालवू द्या, अशी विनंती करणारी याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. एका वकिलाने ही याचिका सादर केली आहे. त्यांना तुरुंगातून प्रशासन चालविता यावे, यासाठी याचिकेत काही मागण्या पण करण्यात आल्या आहेत...

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांचे 'वर्क फ्रॉम जेल'; हायकोर्टात याचिका, मागितल्या या सुविधा
Arvind Kejriwal
| Updated on: Apr 18, 2024 | 4:38 PM
Share

दिल्लीतील कथित मद्य घोटाळाप्रकरणात अरविंद केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात आहेत. सक्तवसुली संचालनालयाने (ED) 21 मार्च रोजी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयने त्यांची कोठडीत रवानगी केली आहे. आता केजरीवाल यांना तुरुंगातूनच दिल्ली राज्याचा कारभार हाकू द्या अशी विंनती करणारी याचिका हायकोर्टात सादर करण्यात आली आहे. एका वकिलाने ही याचिका सादर केली आहे. कोर्ट या याचिकेवर सुनावणी घेणार की नाही, हे समोर आलेले नाही.

दिल्ली हायकोर्टातील वकील श्रीकांत प्रसाद यांनी ही याचिका सादर केली आहे. तिहार तुरुंग प्रशासनाला, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्व सुविधा पुरविण्याचे निर्देश देण्याची विनंती प्रसाद यांनी याचिकेद्वारे केली आहे. याचिकेनुसार, आमदार आणि मंत्र्यांशी संवाद साधण्यासाठी केजरीवाल यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा देण्याची विनंती करण्यात आली आहे.

काय म्हटले आहे याचिकेत

श्रीकांत प्रसाद यांनी याचिकेत म्हटल्यानुसार, दिल्लीतील सध्याची परिस्थिती ही घटनेच्या 21,14 आणि 19 अंतर्गत नागरिकांचे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारी आहे. गेल्या 7 वर्षांपासून दिल्लीतील आरोग्य आणि शैक्षणिक दर्जा खूप सुधरला आहे. देशातील कोणता पण कायदा एखाद्या मुख्यमंत्र्याला, पंतप्रधानाला त्याचे काम करण्यापासून रोखू शकत नसल्याचा युक्तीवाद करण्यात आला आहे. याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेण्याची विनंती करण्यात आली आहे.

जामीनासाठी गोड पदार्थ

दरम्यान ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात एक खळबळजनक दावा केला आहे. त्यानुसार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जाणीवपूर्वक गोड पदार्थ खात आहेत. केजरीवाल यांना त्यांच्या घरून डबा येतो त्यात आंबे, मिठाई हे जेवण दिलं जात आहे. केजरीवाल यांना मधुमेह असल्याने त्यांनी गोड खाऊ नये हे सांगितल असतानाही ते हे पदार्थ खात आहेत.केजरीवाल हे जाणीवपूर्वक गोड पदार्थ खात आहेत की यांच्या आधारे ते मेडिकल कारणासाठी जामीन मागू शकतात असा दावा ED ने दिल्ली उच्च न्यायालयात केला आहे. ED च्या दाव्या नंतर हायकोर्टाने तिहार जेल प्रशासनाकडून केजरीवाल यांचा डाएट चार्ट मागवला आहे.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.