Year Ender 2024 : कब्रस्तानापासून ट्रेनमध्ये बलात्कार आणि हत्या; ‘या’ सायकोकिलर्सची कहाणी वाचून अंगाचा थरकाप होईल
2024 हे वर्ष भारतात अनेक भयानक सायको किलिंगच्या घटनांनी हादरले. गोवा, उत्तर प्रदेश, बरेली, कोलकाता आणि कर्नाटकमधील क्रूर हत्याकांडांनी जनमानसाला हादरवलं. यातील काही गुन्हेगारांनी महिलांना विशेष लक्ष्य केलं, तर काहींनी वैयक्तिक वादातून हत्या केल्या. या घटनांमधील सायको किलर्सची मनोस्थिती आणि त्यांच्या गुन्ह्यांचा तपशील या लेखात आहे.

Year Ender 2024 : जगात असंख्य प्रकारची माणसं असतात. काही माणसं साक्षात देवासारखी असतात. त्यांच्या सहवासात कायम राहावसं वाटतं. ही लोक समाजाला सुधारतात. समाजाला चांगल्या मार्गाला घेऊन जातात. तर काही माणसं जनावरासारखी असतात. नराधम शब्द कमी पडेल इतकी विकृत आणि अत्यंत वाईट असतात. त्यांना बघितल्यावर अंगाचा थरकाप होतो. अशाच काही लोकांनी 2024मध्ये अंगाचा थरकाप उडवला. सायको किलिंग करून या लोकांनी भारतच नव्हे तर संपूर्ण जग हादरवलं. कोण आहेत हे सायको किलर? त्यांची कहाणी काय आहे? याचा आज आपण आढावा घेणार आहोत. गोव्यापासून ते कर्नाटकपर्यंत अनेक गुन्हेगारांनी अत्यंत क्रूर गुन्हे केले आहेत. त्यांनी अनेकांची...
