
Jyoti Malhotra Father: हिसार येथील ज्योती मल्होत्रा नावाच्या एका युट्यूबर आणि ट्रॅव्हल व्लॉगरला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. असा आरोप आहे की ती पाकिस्तानच्या अनेक उच्च अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती आणि भारताची गुप्त माहिती पाकिस्तानला देत होती. ही माहिती समोर आल्यानंतर ज्योतीचे कुटुंबिय देखील हैराण आहे. ज्योतीवर लावण्यात आलेले आरोप तिच्या कुटुंबियांनी पुर्णपणे फेटाळले आहे.
ज्योतीच्या वडिलांवर यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ‘जर एखादी व्यक्ती कुठेतरी फिरायला गेली तर त्याचा अर्थ असा नाही की ती हेरगिरी करायला सुरुवात करेल. ज्योती दूतावासाची परवानगी घेऊन, पासपोर्ट आणि व्हिसा घेऊन गेली, ती स्वतःच्या मर्जीने गेली नव्हती.’
‘ज्योतीला व्हिसा देण्यापूर्वी तिची घरी चौकशी करण्यात आली. सर्वकाही व्यवस्थित असल्याचं आढळल्यानंतरच ज्योतीला पाकिस्तानला जाण्याची परवानगी देण्यात आली. दोन लोकांना साक्षीदार बनवण्यात आलं, सर्व काही कायदेशीर प्रक्रियेतून घडलं आहे.’ असं देखील ज्योतीच्या वडिलांनी सांगितलं आहे.
यावर ज्योतीचे वडील म्हणाले, ‘ज्योती 2-3 वर्षांपूर्वी पाकिस्तानला गेली होती. तिच्या अटकेबद्दल मला काहीही सांगण्यात आलं नव्हतं. गेल्या गुरुवारी घरी बरेच लोक आले होते, जेव्हा मला तिच्या अटकेची बातमी मिळाली तेव्हा मी तिला भेटून आली. मग ती म्हणाली बाबा… काही हरकत नाही, ते मला उद्या किंवा परवा सोडतील.’
यावेळी ज्योतीच्या वडिलांनी तिच्याकडे असणाऱ्या पैशांबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. ‘ज्योतीच्या खात्यात पैसे नाही. सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला 15 – 20 किंवा 25 हजार रुपयांची कमाई करते..’ सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत ज्योती पैसे कमावते.
वडिलांनी सांगितल्या नुसार, ज्योती हिसारमध्ये राहते, कधीकधी ती दिल्लीला जाते पण 3 ते 4 दिवसांत परत येते. ज्योतीच्या वडिलांना वाटतं की तिला फसवलं जात आहे. तिने बाहेर कोणत्याही प्रकारची माहिती किंवा तपशील शेअर केला नाही… सध्या सर्वत्र ज्योती प्रकरणाची चर्चा सुरु आहे.