AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लसीबाबत ब्रिटनची वर्णद्वेषी वृत्ती, भारतात संताप, सध्या इंग्लंडला न जाणे उत्तम?

ब्रिटनचा कोविशील्डबाबत नकारात्मक दृष्टिकोन का आहे? त्यांना पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या कोविशील्ड लसीमध्ये काही कमतरता दिसतेय का? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.

लसीबाबत ब्रिटनची वर्णद्वेषी वृत्ती, भारतात संताप, सध्या इंग्लंडला न जाणे उत्तम?
| Edited By: | Updated on: Sep 22, 2021 | 4:41 PM
Share

मला असे वाटते की, यूकेने आपल्याला रेड लिस्टमधून काढल्याशिवाय कोणत्याही भारतीयाने युनायटेड किंगडममध्ये (United Kingdom) जाऊ नये. परंतु, ब्रिटनच्या नवीन कोविड प्रवास धोरणातील (कोविड ट्रॅव्हल पॉलिसी) केवळ वर्णद्वेषी वृत्तीवरुन टीका करण्याऐवजी आपण काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. खरं तर, कोरोना महामारी सुरु झाल्यापासून, ब्रिटनने आपल्या देशातील प्रवासासाठी वेगवेगळ्या देशांच्या तीन श्रेणी निर्धारित केल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी, आपल्याला रेड लिस्टमधून उचलून केवळ दिखावा म्हणून Amber लिस्टमध्ये (दुसरी लिस्ट) ठेवले गेले. (तिसरी श्रेणी ग्रीन लिस्टची आहे.) आपण असे गृहीत धरत होतो की, लवकरच आम्हाला ग्रीन लिस्टमध्ये टाकले जाईल. आणि आम्ही इंग्लंडच्या रस्त्यावर फिरताना दिसू. पण असे घडले नाही. अगदी उलट आम्हाला पुन्हा रेड लिस्टमध्ये टाकण्यात आले.

यात काही शंका नाही की, हे न्याय्य नाही. कारण ब्रिटिश आणि भारतीय लोकांना समान प्रकारची कोविडशील्ड/अॅस्ट्राझेनेका लस मिळत आहे. असे असूनही, तेथे गेल्यावर आम्हाला 10 दिवस क्वारन्टीन ठेवले जाते, जे योग्य नाही. युरोपच्या नऊ देशांनी भारतीय लसीला ग्रीन सिग्नल दिला आहे, मग ब्रिटनला काय अडचण आहे?

बनावट प्रमाणपत्र मिळवणारे लोक स्वतःचं आयुष्य धोक्यात घालतायत

कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांना येथे येण्यापासून रोखले जात आहे, ही बाब काही अंशी मान्य करता येईल, कारण अद्याप जागतिक आरोग्य संघटनेने त्याला मान्यता दिलेली नाही. पण ब्रिटनचा कोविशील्डबाबत नकारात्मक दृष्टिकोन का आहे? त्यांना पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या कोविशील्ड लसीमध्ये काही कमतरता दिसतेय का? गेल्या आठवड्यात भारतात बनावट लस प्रमाणपत्र वितरीत केल्याच्या बातम्या आल्या. यानुसार, 5,500 रुपयांमध्ये, लस न घेता, तुम्ही प्रमाणपत्र मिळवू शकता, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. मला माहित नाही की हे किती खरे आहे, परंतु मी अशा लोकांचा विचार करीत आहे जे असे बनावट प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत आहेत. विचार करा, असे करून लोक आपला जीव धोक्यात घालत नाहीत का?

बनावट लस प्रमाणपत्र बनवणाऱ्यांना ताबडतोब पकडले पाहिजे आणि त्यांच्यावर नियोजित हत्येचा खटला चालवला पाहिजे. असे न केल्याने आपण स्वतःच उपहासाचे कारण बनू. सध्या ज्या लोकांना कोविन अॅप किंवा अशा कोणत्याही अॅपद्वारे लस मिळाली आहे त्यांची नोंदणी केली जात आहे. या अॅप्समध्ये अशी फसवणूक शोधण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. यासाठी आपण आपल्या प्रतिभाशाली आयटी व्यावसायिकांचा वापर केला पाहिजे.

फसवणुकीच्या या बातमीत किती तथ्य आहे ते मला माहित नाही, परंतु ज्यांना लस मिळाली नाही त्यांनाही लसीकरण पूर्ण झाल्याचे संदेश मिळत आहेत. ही एक तांत्रिक त्रुटी असू शकते, परंतु सुरक्षिततेच्या नावाखाली चुकीच्या अर्थाने पैसे उकळण्याची कृती लज्जास्पद आहे. इथे आपल्याला प्रामाणिकपणा दाखवावा लागेल आणि फक्त व्यवस्थेला दोष देणे थांबवावे लागेल. इतरांकडे बोट दाखवण्याऐवजी आपल्याला आधी आपले घर स्वच्छ करावे लागेल.

सध्या ब्रिटनला जाणे हे एका भयानक स्वप्नासारखे

जर तुम्ही देखील ब्रिटनच्या या वृत्तीमुळे नाराज असाल तर, तुम्ही एक गोष्टी लक्षात घेतली पाहिजे की, असेही ब्रिटनला जाणे हे एक भयानक स्वप्न ठरू शकते. इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या एका वृत्तपत्रानुसार, ज्या भारतीय लोकांकडे कोविशील्ड लस घेतलत्याचे प्रमाणपत्र आहे आणि ते यूकेला गेले असतील, त्यांना इंग्लंडला जाण्यापूर्वी तीन दिवस आधी कोविड चाचणी करावी लागेल, याशिवाय तिथे पोहोचल्यनंतर आठव्या दिवशी पुन्हा एकदा चाचणी केली जाईल. हे एवढ्यावरच थांबणार नाही, तर पुन्हा 10 दिवस होम क्वारंटाईन राहावे लागेल.

तथापि, दिलेल्या वेळेआधी तुम्ही क्वारंटाईन कालावधी पूर्ण करु शकता, परंतु यासाठी तुम्हाला ‘टेस्ट टू रिलीज’ योजनेअंतर्गत पैसे देऊन खासगी कोविड चाचणी करावी लागेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही सोमवारी इंग्लंडला पोहोचलात, तर संपूर्ण मंगळवार तुम्हाला क्वारंटाईन राहावे लागेल. त्यानंतर तुम्ही पाच दिवस पूर्ण होईपर्यंत पुन्हा चाचणी करू शकत नाही. परंतु शनिवारी केलेल्या चाचणीमध्ये तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह आढळला तर तुमचा क्वारंटाईन कालावधी समाप्त होऊ शकतो, परंतु आठव्या दिवशी तुम्हाला पुन्हा चाचणी करुन घ्यावी लागेल.

(लेखक बिक्रम वोहरा हे संपादक, स्तंभलेखक आहेत)

हे ही वाचा

पाकिस्तानात आता पहिली हिंदू महिला अधिकारी, सना गुलवानी पहिल्याच प्रयत्नात सर्वात कठीण CSS परीक्षा पास

Canada Election Results: जस्टिन ट्रूडोंच्या लिबरल पक्षाला सर्वाधिक जागा, बहुमत मिळवण्यासाठी अजूनही रस्सीखेच सुरुच

अफगाणिस्तानात आता तालिबान्यांवर आयसीसचा हल्ला, जलालाबाद स्फोटांची जबाबदारी स्वीकारली

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.