अफगाणिस्तानात आता तालिबान्यांवर आयसीसचा हल्ला, जलालाबाद स्फोटांची जबाबदारी स्वीकारली

जलालाबादच्या या स्फोटांची जबाबदारी आता आयएसआयएस-खोरासानने घेतली आहे. या हल्ल्यात महिला आणि लहान मुलंही जखमी झाल्याचं तालिबानी अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

अफगाणिस्तानात आता तालिबान्यांवर आयसीसचा हल्ला, जलालाबाद स्फोटांची जबाबदारी स्वीकारली
अफगाणिस्तानमध्ये बॉम्बहल्ला करुन तालिबानला निशाणा बनवण्यात आलं

काबुल:अफगानिस्‍तान (Afghanistan) च्या जलालाबादमध्ये (Jalalabad City) शनिवारी आणि रविवार झालेल्या हल्ल्याची जबाबदारी आयएसआयएस खोरसान (ISIS K) ने घेतली आहे. या हल्ल्यामध्ये (Taliban) ला निशाणा बनवण्यात आलं होतं. आयएसआयएस-के ने जलालाबादमध्ये तालिबानच्या 3 वाहनांवर हल्ला केला होता. इथं एका पाठोपाठ एक 3 स्फोट घडवण्यात आले. ज्यामध्ये 3 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 20 लोक जखमी झाले. जलालाबादच्या या स्फोटांची जबाबदारी आता आयएसआयएस-खोरासानने घेतली आहे. या हल्ल्यात महिला आणि लहान मुलंही जखमी झाल्याचं तालिबानी अधिकाऱ्याने सांगितलं आहे. ( ISIS attacks on Taliban in Afghanistan now. ISIS-K claimed responsibility for the Jalalabad blasts )
35 तालिबान्यांना मारल्याचा दावा

दरम्यान या स्फोटांची तालिबानकडून सध्या चौकशी सुरु आहे. याबद्दल बोलताना ISIS-K ने सांगितलं आहे की, या हल्लात कमीत कमी 35 तालिबानी मारले गेला आहे किंवा जखमी झाले आहेत. दरम्यान, ISIS-Kच्या दाव्यावर अद्याप तालिबानकडून कुठलीही प्रतिक्रीया आलेली नाही.

तिकडे नंगरहा प्रांतातील आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, जलालाबाद ही इस्लामिक स्टेट खोरासानची राजधानी आहे. याच संघटनेने काबुल विमानतळाबाहेर बॉम्बब्लास्ट केला होता, ज्यात अमेरिकी नागरिकांसह अफगाणी नागरिकांचाही मृत्यू झाला. या हल्ल्यात तब्बल 100 लोकांनी आपला जीव गमावला आहे. जलालाबाद ही नंगरहार प्रांताची राजधानी आहे, जो भाग ISIS-खुरासानचा गढ समजला जातो. आणि त्यातच आयएसआयएआय हा तालिबानला आपला शत्रू मानतो.

कसा आहे हल्ल्यांचा घटनाक्रम?

जलालाबाद शहरात एकापाठोपाठ एक 3 ब्लास्ट झाले, यामुळे शहरात अफरातफरी माजली होती. तालिबानच्या ताफ्याला यावेळी निशाणा बनवण्यात आलं आहे. असाच एक हल्ला काहीच दिवसांपूर्वी कैर केंच भागात करण्यात आला होता. इथं रॉकेट हल्ला झाला होता. या हल्ल्यात कुणी मृत पावलं नव्हतं, आतापर्यंत या हल्लांची जबाबदारी कुणीही घेतली नाही, तरी या हल्ल्यामागे आयएसआयए चाच असल्याचं बोललं जात आहे.
असाच हल्ला काबुल विमानतळाबाहेर झाला होता, त्यावेळी एखा हिरव्या रंगाच्या पिकअप ट्रकला निशाणा बनवलं गेलं, ज्यावर तालिबानचा पांढरा झेंडा लावण्यात आला होता. काबुलमध्ये झालेल्या हल्ल्यात 13 यूएस मरीन जवानांसह 180 अफगाण लोकांचा जीव गेला होता.

अपहरण केल्याच्या नावाखाली 2 लोकांची हत्या

तिकडे काबूलमध्ये पूर्वीच्याच तालिबानचं राज्य जाणवायला सुरुवात झाली आहे. कारण, नवीन तालिबान म्हणून सत्तेत आलेल्या तालिबानच्या राज्यात महिलांचे सगळे अधिकार तर गेलेच आहेत. शिवाय, शिक्षा देण्याचं नवं सत्रही सुरु झालं आहे. काबुलमध्ये दिवसा ढवळ्या 2 लोकांना मारुन चौकात फेकण्यात आलं. बीबीसीने ही माहिती दिली आहे. त्यांनी लहान मुलांचं अपहरण केलं असा आरोप करण्यात आला होता. आणि या आरोपानंतर त्यांना चौकात मारुन फेकण्यात आलं. या 2 व्यक्तींनी कुणी मारलं हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, मारणाऱ्यांने एक नोट लिहून हे 2 मृतदेह चौकात फेकून दिले होते.

तो ड्रोनहल्ला आमची चूक होती- अमेरिका

दरम्या, काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेरच्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात एक ड्रोन हल्ला केला होता. हा हल्ला ISIS खुरासान संघटनेच्या दहशतवाद्यावरच केला असल्याचं आधी अमेरिकेने सांगितलं. मात्र, आता अमेरिकेने आपली चूक कबूल केली आहे. या हल्ल्यात 7 लहान मुलांसह 10 जण मारले गेले होते. आता अमेरिकी सुरक्षा विभागाच्या पेंगागन कार्यालयातील मध्य कोअरचे कमांडर जनरल फ्रॅंक मॅक्केजी समोर आले. आणि त्यांनी हा हल्ला चुकीच्या टार्गेटवर झाल्याचं मान्य केलं. शिवाय हल्ल्याबद्दल माफी मागत असतानाच हल्ल्यात मृत झालेल्या लोकांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI