गडचिरोली नगर पंचायतीवर काँग्रेसचं वर्चस्व; सर्वाधिक नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात, तर नगरसेवकांच्या संख्येत भाजप पहिला!

गडचिरोली जिल्ह्यातील नगर पंचायतींवर काँग्रेसचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. तर राज्यातील सर्वाधिक नगर पंचायती या राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्या आहेत. मात्र, सर्वाधिक नगरसेवक हे भाजपचे निवडून आले आहेत.

गडचिरोली नगर पंचायतीवर काँग्रेसचं वर्चस्व; सर्वाधिक नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात, तर नगरसेवकांच्या संख्येत भाजप पहिला!
Nagar Panchayat Election
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 10:07 PM

मुंबई : नगर पंचायत निवडणुकीचे सर्व निकाल (Nagar Panchayat Election Result) आज लागले. महाराष्ट्राच्या शेवटचे टोक असलेल्या सिरोंचा नगरपंचायत इतर स्थानिक पक्ष असलेला आदिवासी विद्यार्थी संघटनेने एकतर्फी बाजू मारली. यात आदिवासी विद्यार्थी संघटनेचे दहा, राष्ट्रवादीचे पाच व शिवसेनेचे 2 असे उमेदवार विजयी झाले. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) 6 नगरपंचायतीत वर्चस्व स्थापन केला. कुरखेडा भाजप पक्षाने एकतर्फी सत्ता हासील केली. घराण्याची नगरी असलेली अहेरी नगरपंचायत त्रिशंकू निकाल लागलेला आहे. अहेरी या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे मूळ गाव आहे. भाजप पक्षाचे नेते माजी राज्यमंत्री अमरीशराव आत्राम (Amrish Atram) यांच्या मुळगाव अहेरीच आहे. पण हा राष्ट्रवादी किंवा भाजप पक्षाला इथे सत्ता असेल करता आलेली नाही. अहेरी नगरपंचायत पहिल्यांदाच आदिवासी विद्यार्थी संघटनेने पाच नगरसेवक जिंकून खाता उघडला.

गडचिरोलीतल्या 9 नगर पंचायतीच्या निकालात काँग्रेसनं बाजी मारलीय

काँग्रेसला सर्वाधिक 4 नगरपंचायती मिळाल्यात भाजपकडे 2 नगरपंचायती आल्यात राष्ट्रवादीच्या वाट्याला 1 नगरपंचायत आलीय अपक्षांच्या हाती एक नगरपंचायत आलीय एका भामरागडमध्ये त्रिशंकू परिस्थिती आहे.

9 पैकी कोणती नगर पंचायत कोणाकडे गेली?

धानोरा नगरपंचायत काँग्रेसनं एक हाती जिंकलीय. काँग्रेसला 13 जागा भाजपला 3 तर एका ठिकाणी अपक्ष निवडून आला

चामोर्शी नगरपंचायत भाजकडून काँग्रेसनं हिसकावलीय.

चार्मोशी नगरपंचायतीत काँग्रेसला 8 जागा मिळाल्या राष्ट्रवादीला 8 जागा मिळाल्या भाजपला 3 तर एक जागा अपक्षाला मिळाली काँग्रेसला स्पष्ट बहुमत नसलं तर अपक्ष किंवा राष्ट्रवादीच्या मदतीनं काँग्रेसची आरामात सत्ता येईल

कोरची नगरपंचायतीवर काँग्रेसचं वर्चस्व

कोरची नगरपंचायतीतही काँग्रेसला 8 जागा मिळाल्या भाजपला 6 जागा मिळाल्यात राष्ट्रवादी 1 आणि अपक्ष 2 ठिकाणी निवडून आलेत. इथंही काँग्रेसला स्पष्ट बहुमत नसलं..तरी 2 अपक्ष असल्यानं काँग्रेसची सत्ता निश्चित आहे

एटापल्लीत याआधी काँग्रेसची सत्ता कायम राहणार?

एटापल्लीत काँग्रेसला 5 जागा मिळाल्यात आदिवासी विकास आघाडीला 6 जागा आहेत राष्ट्रवादी 3 आणि भाजपलाही 3 जागा मिळाल्यात आदिवासी विकास आघाडी काँग्रेससोबत जाणार असल्यानं इथंही काँग्रेसचीच सत्ता येईल

 कुरखेड्यात भाजपची एकहाती सत्ता

भाजपनं 9 जागा मिळवल्यात शिवसेनेला 5 तर काँग्रेसला 3 जागा मिळाल्यात

भाजपच्या हातून अहेरीतील नगराध्यक्षपद जाणार?

अहेरीत भाजपला 6 जागा मिळाल्यात अपक्षही 6 आहेत शिवसेनेला 2 तर राष्ट्रवादीला 3 जागा मिळाल्या त्यामुळं अपक्ष इथं किंगमेकर असून, अपक्षांची साथ मिळाल्यास भाजपती सत्ता येईल शकते

सिंरोच्यात अपक्षांचा आकडा बहुमताच्या पार!

अपक्षांना 10 जागा मिळाल्यात राष्ट्रवादी 5 आणि शिवसेनेला 2 जागा मिळाल्यात

भामरागडमध्ये त्रिशंकू परिस्थिती

भाजपला 5 जागा मिळाल्या राष्ट्रवादीला 3 काँग्रेस 2 आणि शिवसेनेला 1 जागा मिळाली तर अपक्षांना 3 जागा मिळाल्या. त्यामुळं अपक्ष ज्यांच्या बाजूनं जातील त्यांची सत्ता येईल

राष्ट्रवादीच्या ताब्यात 1 नगरपालिका

मुलचेरा नगर पंचायतीत राष्ट्रवादीला 7 जागा मिळाल्या अपक्षांकडे 5 जागा आहेत शिवसेना 4 तर भाजपला 1 जागा मिळाली. त्यामुळं अपक्षांच्या मदतीनं राष्ट्रवादीची सत्ता आरामात येणार.

एकूणच गडचिरोलीतल्या 9 नगरपालिकांचा विचार केला तर, काँग्रेसचा दबदबा राहिलाय

राज्यातील 106 नगरपंचायतीच्या निकालाचं चित्र स्पष्ट

राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष ठरला असून राष्ट्रवादीकडे 28 नगरपंचायती आल्यात दुसऱ्या स्थानी काँग्रेसनं झेप घेतलीय. काँग्रेसच्या ताब्यात 25 नगरपंचायती आल्यात तिसऱ्या क्रमांकावर भाजप आहे…भाजपची 24 नगरपंचायतीत सत्ता आलीय चौथ्या क्रमांकावर शिवसेना आहे…शिवसेनेकडे 17 नगरपंचायती आल्यात तर इतरांच्या ताब्यात 12 नगरपंचायती आल्यात

नगरपंचायतींच्या बाबतीत राष्ट्रवादीची बाजी, सर्वाधिक नगरसेवक भाजपचे

भाजपचे 447 नगरसेवक आलेत राष्ट्रवादीचे 400 काँग्रेसचे 346 सदस्य आलेत इतरांचे 305 नगरसेवक आहेत तर शिवसेनेचे 293 नगरसेवक आलेत

नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल पाहिला तर, राष्ट्रवादीचीच चांदी झालीय…मात्र चिंताजनक बाब ही शिवसेनेसाठी आहे…कारण शिवसेना चौथ्या आहे.

इतर बातम्या :

Goa Election 2022 : उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच भाजपमध्ये बंडाळी, 3 बड्या नेत्यांनी थोपटले दंड! डोकेदुखी वाढणार?

Goa Assembly Election : गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र, महाराष्ट्रामधील भविष्यातील युतीची गोव्यातून सुरुवात ?

Non Stop LIVE Update
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.