Corona Third Wave: कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेहून कमी धोकादायक; मात्र लाटेचा वेग कैक पटीने मोठा

आतापर्यंतच्या 3 कोरोना लाटांमध्ये कमी दिवसात जास्तीत-जास्त रुग्णसंख्यावाढीचं प्रमाण कसं वाढत गेलं, ते सुद्धा समजून घ्या. पहिल्या लाटेत दिवसाला 1 लाख रुग्ण निघण्यासाठी 119 दिवस लागले होते. दुसऱ्या लाटेत तोच आकडा 1 लाख पर्यंत जाण्यासाठी 45 दिवस लागले. आणि सध्याच्या लाटेत दिवसाला 1 लाख रुग्ण होण्यासाठी फक्त 11 दिवस लागले.

Corona Third Wave: कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेहून कमी धोकादायक; मात्र लाटेचा वेग कैक पटीने मोठा
Follow us
| Updated on: Jan 07, 2022 | 11:22 PM

मुंबई : असं म्हटलं जातंय की कोरोनाची संभाव्य तिसरी लाट, ही दुसऱ्या लाटेहून कमी धोकादायक आहे. मात्र सध्याच्या लाटेचा वेग हा दुसऱ्या लाटेहून कैक पटीनं मोठा आहे. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात फेब्रुवारी 2021 मध्ये झाली. फेब्रुवारीत सरासरी 15 हजार रुग्ण निघत होते. तो आकडा 1 लाखांपर्यंत जाण्यास एप्रिल महिना उजाडावा लागला होता. म्हणजे दुसऱ्या लाटेत 15 हजार ते 1 लाखांपर्यंतचा टप्पा गाठण्यासाठी दीड महिने लागले होते. मात्र सध्या तेच अंतर फक्त 7 दिवसात पार झालंय. 30 डिसेंबरला भारतात 16 हजार रुग्ण निघाले होते आणि फक्त 7 दिवसातच तोच दैनंदिन रुग्णवाढीचा आकडा 1 लाख 17 हजारांवर गेलाय.

आतापर्यंतच्या 3 कोरोना लाटांमध्ये कमी दिवसात जास्तीत-जास्त रुग्णसंख्यावाढीचं प्रमाण कसं वाढत गेलं, ते सुद्धा समजून घ्या. पहिल्या लाटेत दिवसाला 1 लाख रुग्ण निघण्यासाठी 119 दिवस लागले होते. दुसऱ्या लाटेत तोच आकडा 1 लाख पर्यंत जाण्यासाठी 45 दिवस लागले. आणि सध्याच्या लाटेत दिवसाला 1 लाख रुग्ण होण्यासाठी फक्त 11 दिवस लागले.

जिथं कोरोना संपण्याच्या उंबरठ्यावर आला होता, तिथंही पुन्हा रुग्णवाढ

मुंबई, पुणे, नागपूर तर हॉटस्पॉट आहेतच. मात्र ज्या जिल्ह्यांनी फक्त 15 दिवसांपूर्वी कोरोनाला हद्दपार केलं होतं, किंवा जिथं कोरोना संपण्याच्या उंबरठ्यावर आला होता, तिथंही पुन्हा रुग्णवाढ होऊ लागलीय. उदाहरणार्थ 25 डिसेंबरला मुंबईतल्या सक्रीय रुग्णांची संख्या फक्त 3703 इतकीच होती. ती आता 79 हजारांवर गेलीय. जळगाव जिल्हयात कोरोनाचे फक्त 9 रुग्ण होते, तो आकडा आता 91 वर गेलाय. धुळ्यात 15 दिवसांपूर्वी फक्त 4 रुग्ण होते, तोच आकडा कालपर्यंत 29 वर पोहोचलाय. 25 डिसेंबरला संपूर्ण अमरावती जिल्हयात कोरोनाचे फक्त 6 सक्रीय रुग्ण होते. बुलडाण्यात फक्त 7 रुग्ण होते, तो आकडा 31 वर पोहोचलाय. मात्र या रुग्णवाढीतली एक चांगली गोष्ट म्हणजे, रुग्णवाढ झालेली असली तरी रुग्णालयात भर्ती होण्याचं किंवा भर्ती झालेल्या रुग्णांना ऑक्सिजन लागण्याच्या प्रमाणात वाढ झालेली नाही.

ज्या दिवशी दिवसाला 700 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल त्यादिवशी लॉकडाऊन लागेल

जेव्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं 1 लाखांचा टप्पा गाठला होता, तेव्हा अनेकांना रुग्णालयात बेड मिळणं मुश्किल झालं होतं. मात्र सध्या दिवसाला 1 लाख रुग्ण येत असले, तरी रुग्णालयातले बहुतांश बेड अजूनही रिकामे आहेत. महाराष्ट्रातल्या रुग्णालयातले अद्याप फक्त 10 ते 15 टक्के बेड कोरोना रुग्णांनी व्यापले आहेत. रुग्ण वाढीबरोबर अद्याप तरी राज्यातल्या मृत्यूदर वाढलेला नाही. मात्र ज्या दिवशी महाराष्ट्रात दिवसाला 700 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल किंवा 40 टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी वापरात येतील, त्यादिवशी लॉकडाऊन लागेल, हे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट केलंय. पण, एकीकडे आरोग्यमंत्री दिलासा देत असले, तरी जागतिक आरोग्य संघटना ओमिक्रॉनला हलक्यात न घेण्याचा इशारा देतंय.

ओमिक्रॉन डेल्टाहून दुप्पटीनं वाढतोय

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार लस घेतलेल्या लोकांसाठी ओमिक्रॉन नक्की कमी धोकादायक ठरतोय. मात्र याचा अर्थ ओमिक्रॉनला दुर्लक्षित करुन चालणार नाही. अनेक देशांत ओमिक्रॉनमुळे रुग्णभर्ती वाढलीय, आणि लोकांचे मृत्यू सुद्दा होतायत. ओमिक्रॉन डेल्टाहून दुप्पटीनं वाढतोय. ज्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या या दाव्यात तथ्य आहे, कारण नेतेमंडळी असोत, डॉक्टर असोत की मग सरकारी कार्यालयं, ज्या झपाट्यानं कोरोना पसरत चाललाय, तो वेग चिंतेत भर घालणारा आहे.

डॉक्टरांनाही कोरोना संसर्ग

महाराष्ट्रातील 338 निवासी डॉक्टरांना कोरोना संसर्ग झाला आहे. विशेष म्हणजे या 338 डॉक्टरांना मागच्या फक्त 4 दिवसातच कोरोनाची लागण झालीय. चंदीगडमध्ये फक्त 3 दिवसात 196 डॉक्टरांना कोरोना झालाय. मुंबईत फक्त 1 महिन्यात तीन हजार 516 मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये फक्त मागच्या 6 दिवसात 6 पटीनं कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांच्या कार्यालयात 21 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झालीय. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 15 कर्मचाऱ्यांना कोरोना झालाय. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, ओडिशाचे आरोग्यमंत्री नबा किशोर दास, कोरोनाबाधित झालेयत.

कानपूर आयआयटीच्या प्राध्यापकाच्या दाव्यानुसार तिसऱ्या लाटेत भारतातली रोजची रुग्णसंख्या 4 ते 8 लाखांच्या घरात जाऊ शकते. ज्यात एकट्या मुंबईत जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला 30 ते 60 हजार रुग्ण निघू शकतात. त्या काळात मुंबईतल्या दवाखान्यांमध्ये 10 हजार बेड्सची गरज लागेल आणि मार्च महिन्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाट ओसरायला सुरुवात होईल. (The third wave of the corona is less dangerous than the second wave)

इतर बातम्या

World Corona : युरोप, अमेरिकेत कोरोनाचं थैमान सुरुच; अमेरिकेत रोज लाखो नव्या रुग्णांची नोंद

India Corona Update : कोरोना रुग्णांसाठी केंद्रीय आरोग्य खात्याच्या महत्वाच्या सूचना, काय आहेत नव्या गाईडलाईन्स?

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.