AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Corona : युरोप, अमेरिकेत कोरोनाचं थैमान सुरुच; अमेरिकेत रोज लाखो नव्या रुग्णांची नोंद

जगभरात कोरोनाचं थैमान सुरु असतानाच आता भारतातही कोरोनाची तिसरी लाट धडकलीय. अवघ्या आठवड्याभरात भारतात कोरोना रुग्णांची संख्या लाखांमध्ये पोहोचलीय. भारतात रुग्णसंख्येची वाढ पाहता आरोग्य यंत्रणा सतर्क झालीय. दिल्लीसारख्या ठिकाणी विकेंन्ड लॉकडाऊन लावण्यात आलाय. देशात रुग्णवाढीचा वेग वाढत राहिला तर कडक निर्बंधही लागू शकतात

World Corona : युरोप, अमेरिकेत कोरोनाचं थैमान सुरुच; अमेरिकेत रोज लाखो नव्या रुग्णांची नोंद
कोरोना
| Edited By: | Updated on: Jan 07, 2022 | 11:05 PM
Share

नवी दिल्ली : महिन्याभरापूर्वी दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर आता जगभरात ओमिक्रॉनचा फैलाव झालाय. मात्र ओमिक्रॉनपेक्षा युरोप आणि अमेरिकेत कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटनच थैमान मांडलंय. अमेरिकेत तर 3 दिवसांपूर्वी एकाच दिवशी तब्बल 10 लाख कोरोनाचे नवे रुग्ण आढळले.

अमेरिकेत धडकी भरवणारी रुग्णसंख्या

3 जानेवारीला तब्बल 10 लाख 18 हजार 935 रुग्णांची नोंद झाली तर 1 हजार 648 रुग्णांचा मृत्यू 4 जानेवारीला 8 लाख 85 हजार 906 रुग्णांची नोंद आणि 2 हजार 366 रुग्णांचा मृत्यू 5 जानेवारीला 7 लाख 4 हजार 64 रुग्णांची नोंद आणि 2 हजार 113 रुग्णांचा मृत्यू 6 जानेवारीला 7 लाख 27 हजार 863 रुग्णांची नोंद आणि 1 हजार 843 रुग्णांचा मृत्यू झाला.

अमेरिकेत कोरोनाचे दररोज लाखो रुग्ण आढळत असल्याने रुग्णालयांमध्ये दाखल होण्याचंही प्रमाण अधिक आहे. व्हेंटिलेटर्स आणि आयसीयू बेड्सबाबत न्यूयॉर्क, टेक्सास आणि फ्लोरिडा या राज्यांमध्ये गंभीर परिस्थिती आहे. लाखो रुग्ण आढळत असले तरी अमेरिकेतल्या बऱ्याच राज्यांमध्ये लॉकडाऊन किंवा निर्बंध लादण्यात आले नाहीयेत. दरम्यान अमेरिकेतले महामारी तज्ज्ञ डॉ. फहीम योनुस यांनी ओमिक्रॉन व्हेरिएंटला हलक्यात घेऊ नका असा इशारा दिलाय. तिकडे युरोपातही युनायटेड किंगडम, स्पेन, इटली, जर्मनी, फ्रान्स या देशांमध्येही डेल्टा व्हेरिएंटने धुमाकूळ घातलाय. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच काही देशांमध्ये डेल्टाचे लाखो रुग्ण सापडत आहेत.

युरोपात कोरोनाचा धुमाकूळ

युनायटेड किंगडममध्ये गेल्या 3 दिवसात 5 लाख 92 हजार 250 रुग्णांची नोंद झाली तर 547 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. इटलीमध्ये 3 दिवसात 5 लाख 79 हजार 355 रुग्णांची नोंद झालीय तर 688 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. फ्रान्समध्ये 3 दिवसात तब्बल 8 लाख 45 हजार 865 रुग्ण आढळले तर 782 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. स्पेनमध्ये 6 लाख 27 हजार 721 रुग्णांची नोंद तर 432 रुग्णांचा मृत्यू झालाय.

अमेरिकेत आणि युरोपात याआधीच्या कोरोनाच्या लाटेत रोज आढळणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणात रोज मृत्यू होणाऱ्या रुग्णांचं प्रमाणही अधिक होतं. मात्र त्यावेळी लसीकरणाला नुकताच सुरुवात झाली होती. सध्याच्या घडीला युरोपात दररोज कोरोनाचे लाखो रुग्ण आढळत असले तर लसीकरणामुळे मृत्यूचं प्रमाण कमी आहे.

युरोपात निर्बंधांची स्थिती काय?

इंग्लंडमध्ये लॉकडाऊन नाहीये. मात्र वर्क फ्रॉम होमवर भर देण्यात आलाय.. स्कॉटलंडमध्ये मात्र पब आणि कॅफे बंद ठेवण्यात आलेत. युनायटेड़ किंगडम आणि दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांवरची निर्बंध जर्मनीने हटवली आहेत. मात्र जर्मनीमध्ये नाईटक्लब्स बंद करण्यात आलेत. फूटबॉलचे सामने प्रेक्षकांविना भरवले जात आहेत. फ्रान्समध्ये पब, क्लब्समध्ये क्षमतेऐवढ्यांनाच परवानगी देण्यात आलीय. इटलीमध्ये लस न घेतलेल्यांना सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास मज्जाव घालण्यात आलाय. इटलीमध्ये 31 जानेवारीपर्यंत नाईटक्लब्सही बंद करण्यात आलेत.

चीनमध्ये लॉकडाऊन

ज्या चीनमधून पहिल्यांदा कोरोना संसर्गाला सुरुवात झाली. त्या चीनमध्ये कोरोनाबाबत अत्यंत खबरदारी बाळगली जातीय. कारण चीनच्या यूत्झू या शहरात कोरोनाचे अवघे 3 रुग्ण आढळले मात्र तिथे लॉकडाऊन लावण्यात आला. सर्वात गंभीर आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आतापर्यंत खाण्या-पिण्याच्या पदार्थांमध्ये कोरोना विषाणू आढळून आला नव्हता. मात्र चीनमध्ये ड्रॅगन फ्रूटमध्ये कोरोना विषाणू आढळल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. हे ड्रॅगन फ्रूट्स व्हिएतनाममधून चीनमध्ये आणले गेले होते. त्यामुळे खबरदारी म्हणून चीनमध्ये आता सर्व सुपरमार्केट बंद करण्यात आले आहेत. शिवाय व्हिएतनाममधून ड्रॅगन फ्रूट आयात करण्यावरही बंदी घालण्यात आलीय.

जगभरात कोरोनाचं थैमान सुरु असतानाच आता भारतातही कोरोनाची तिसरी लाट धडकलीय. अवघ्या आठवड्याभरात भारतात कोरोना रुग्णांची संख्या लाखांमध्ये पोहोचलीय.

भारतात कोरोनाची तिसरी लाट

भारतात 1 जानेवारीला 27 हजार 553 कोरोना रुग्ण आढळले होते. तर 284 रुग्णांचा मृत्यू झाला. 4 जानेवारीला 58 हजार 97 रुग्णांची नोंद झाली. 534 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. 6 जानेवारीला 1 लाख 17 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली तर 302 रुग्णांचा मृत्यू झाला.

भारतात रुग्णसंख्येची वाढ पाहता आरोग्य यंत्रणा सतर्क झालीय. दिल्लीसारख्या ठिकाणी विकेंन्ड लॉकडाऊन लावण्यात आलाय. देशात रुग्णवाढीचा वेग वाढत राहिला तर कडक निर्बंधही लागू शकतात. (After South Africa, now the corona spreads all over the world, including Europe and America)

इतर बातम्या

India Corona Update : कोरोना रुग्णांसाठी केंद्रीय आरोग्य खात्याच्या महत्वाच्या सूचना, काय आहेत नव्या गाईडलाईन्स?

विद्या चव्हाण यांच्या ‘डान्सिंग डॉल’ला अमृता फडणवीसांचं अब्रुनुकसानीच्या दाव्यानं उत्तर, नेमकं प्रकरण काय?

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.