10 ग्रॅमचा दागिना बनवताना किती सोनं वाया जातं माहितीये? एका दागिन्यामागे इतकं होतं नुकसान
सोन्याच्या वाढत्या किमतींमध्ये दागिने खरेदी करताना आपलं नुकसान होतं का? तर त्याचं उत्तर आहे हो. 10 ग्रॅम दागिने बनवताना काही ग्रॅम सोन्याचे नुकसान होते ज्याची कधी आपल्याला कल्पनाही नसते नाही ही गोष्ट फार आपल्या लक्षात येत पण पैसे देताना मात्र 10 ग्रॅम च्या दागिन्याचेच पैसे द्यावे लागतात. कसं ते पाहुयात.

why is 1 gram of gold wasted in 10 gramsImage Credit source: tv9 marathi
- सोन्याच्या किमती जवळपास आता 1.20 लाख रुपयांपेक्षा जास्त आहेत. पण आता लग्नाचे दिवस असल्याने लोक सोन्याचे दागिने बनवतातच. पण तुम्हाला माहितये का की जेव्हा 10 ग्रॅमचं जरी सोन बनवलं तर त्यामागे किती सोने वाया जाते. होय, सोन्याचा 10 ग्रॅमचा कोणाताही दागिना घ्या त्यामागे त्यामागे काही ग्रॅम सोने वायाच जाते.
- जसं की जर तुम्ही 10 ग्रॅमची सोन्याची साखळी बनवली तर तेव्हा तुम्हाला प्रत्यक्षात 9 ग्रॅमचीच साखळी मिळते. पण पैसे देताना मात्र पूर्ण 10 ग्रॅमचेच द्यावे लागतात. याचा अर्थ प्रत्येक 10 ग्रॅमसाठी 1 ग्रॅम सोने वाया जाते.
- तुम्हाला कदाचित 24 कॅरेट (शुद्ध) सोने सर्वोत्तम वाटत असेल, पण ते खरे नाही. 24 कॅरेट सोने इतके मऊ आणि लवचिक असते की तुम्ही ते हातांनी वाकवू शकता. त्यापासून दागिने बनवता येत नाहीत. जरी ते बनवले तरी ते काही दिवसांत तुटण्याची शक्यता असते. म्हणूनच त्यात भेसळ करावी लागते.
- दागिने मजबूत करण्यासाठी, सोनार शुद्ध सोन्यात तांबे, जस्त किंवा चांदी घालतात. यामुळे 22-कॅरेट किंवा 18-कॅरेट सोने तयार होते. दागिने बनवण्याच्या प्रक्रियेदरम्यान जसे की कटिंग दागिन्यांची घडणावळ असेल किंवा पॉलिश कराताना जे सोन्याचे बारीक तुकडे पडतात किंवा उरलेला चुरा असतो त्याला “कचरा” म्हणतात. सोनार प्रत्येक 10 ग्रॅमसाठी या कचऱ्याचा 1 ग्रॅम वजा करतात.
- जेव्हा तुम्ही तुमचे जुने दागिने बदलता तेव्हाही तुमचे सोने त्याचे मूल्य गमावते. कारण सोनार ते वितळवतो. वितळल्यावर, तांबे किंवा जस्त त्यात मजबूतीसाठी वापरतो. त्यावेळी ते बऱ्यापैकी कमी होते. परिणामस्वरूप तुमचे सोन्याचे वजन पुन्हा कमी होते.
- जर तुम्ही गुंतवणुकीसाठी सोने ठेवत असाल तर दागिने करमे टाळा. जुने दागिने वितळवून ते शुद्ध सोन्याचे बिस्किट बनवणे किंवा सोन्याचे नाणे बनवणे सर्वात फायदेशीर ठरते. यामुळे मेकिंग चार्जेसचा तोटा कमी होतो. पुढच्या वेळी दागिने खरेदी करताना हॉलमार्क आणि वजन देखील नक्की तपासा.
